पावसाळा सुरू होताच विविध प्रकारच्या रानभाज्या बाजारात पाहायला मिळतात. ज्या आरोग्यासाठी एकदम पौष्टिक असतात. यात कुंजराची रानपालेभाजीदेखील बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरीतील अनेक भागांत ही भाजी आवडीने खाल्ली जाते. वर्षातून एकदाच ही भाजी खाण्याचा आनंद घेता येतो. आज आपण चमचमीत कुंजराची रान पालेभाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. चला तर मग पाहूया कुंजराची रान पालेभाजी बनवण्याची रेसिपी…

कुंजराची रान पालेभाजी साहित्य

१ पाव कुंजर भाजी
२ कांदे
२-३ लाल मिरची
१/३ कप तेल
१/२ टीस्पून जिर मोहरी
१/२ टीस्पून हळद
चवीनुसार मीठ
१/२ टीस्पून धनेपूड

कुंजराची रान पालेभाजी कृती

१. सर्वप्रथम भाजी स्वच्छ धुवून घेतली. कापुन घेतली. कांदा, मिरची कट करून घेतली.

२. कढई गरम करून त्यात तेल घाला, तेल गरम करून जिर मोहरी घातली. कांदा मिरची घालून परतुन घेतलं. नंतर त्यात हळद, मीठ, धनेपूड घालून परतुन घेऊन भाजी घातली. भाजीवर डीश ठेवून एक वाफ काढून घ्या.

हेही वाचा >> पावसाळ्यात असा चमचमीत मसालेदार ‘खिमा पाव’ घरी केल्यावर हॉटेलचं खाणं विसरून जाल; नोट करा सोपी रेसिपी

३. यानंतर थोडे पाणी टाकून १० मिनिटे मध्यम आचेवर ही भाजी चांगली शिजू द्या. जास्त पाणी टाकू नका, नाही तर भाजीची चव बदलते. १० मिनिटांनी ही भाजी चपाती किंवा भाकरीसोबत सर्व्ह करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही सुके सोडे किंवा कोळंबीमध्येदेखील ही भाजी बनवू शकता, जी चवीला एकदम जबरदस्त होते.  ही रेसिपी आपण कुकपॅडवरुन घेतली आहे.