रोजच्या भाजीचं टेन्शन त्यात रोज रोज वाटण बनवा, त्यात बराच वेळ गृहीणींचा जातो. रोजचं जेवण बनवताना वाटण किंवा ग्रेव्ही एकदाच तयार करून ठेवली असेल तर रोजचं जेवण तयार होण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. फ्रिजमधून काढून वाटणं भाजीत घातलं की १० मिनिटात चवदार, भाजी तयार होते. मात्र तरीही काही गृहिणींची अशी तक्रार असते की, वाटण खराब होतं. पण आता चिंता नको कारण, एक थेंबही पाणी न वापरता बनवा महिनाभर टिकणारं रस्सा भाजीचं वाटण कसं करायचं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात..

रस्सा भाजीचं वाटण बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • १ कप किसलेलं सुकं खोबरं
  • १ चमचा तेल
  • २५० ग्रॅम स्लाईस केलेला कांदा
  • १० लसूण पाकळ्या
  • १/२” आल्याचे तुकडे
  • २ मोठे चमचे संडे मसाला
  • २ मोठे चमचे लाल तिखट
  • १/४ कप पंढरपुरी डाळं / डाळवं

कृती :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • सर्वप्रथम १ कप किसलेलं सुकं खोबरं घ्या, ते तांबूस होईपर्यंत भाजून घ्या. भाजल्यानंतर ते एका डीशमध्ये काढून घ्या आणि त्याचं पॅनमध्ये १ चमचा तेल टाका.
  • यानंतर तेलात २५० ग्रॅम स्लाईस केलेला कांदा भाजून घ्या, यामध्ये १० लसूण पाकळ्या, १/२” आल्याचे तुकडे टाका. सर्व मिश्रणाला सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घ्या.
  • आता या मिश्रणात आपल्या घरातला २ मोठे चमचे लाल तिखट टाका, त्यानंतर भाजून घेतलेलं खोबर त्यात घाला. नंतर १/४ कप पंढरपुरी डाळं घाला आणि सर्व एकत्र करा.
  • हे सर्व मिश्रण थंड करु घ्या, थंड झालेलं मिश्रण आता मिक्सरमध्ये थोडं थोडं बारीक करुन घ्या, यावेळी आपल्याला पाण्याचा एक थेंबही त्यामध्ये टाकायचा नाहीये.
  • हे वाटण महिनाभर आपल्याला टिकवायचं असल्यामुळे पाण्याचा वापर यामध्ये करायचा नाही.

हेही वाचा >> चमचमीत आणि चटपटीत “दोडका मसाला”; अशा पद्धतीने बनवा घरातील प्रत्येक जण आवडीनं खाईल…

  • अशाप्रकारे आपलं महिनाभर टिकणारं रस्सा भाजीचं वाटण तयार झालं आहे.