Samosa Bhel Recipe : समोसा हा आपल्यापैकी अनेकांचा आवडता पदार्थ आहे. लहान मुलांपासून वृध्द लोकांपर्यंत अनेक जण आवडीने समोसा खातात. समोसा चाट, कढी समोसा, दही समोसा इत्यादीचे नाव ऐकले तरी तोंडाला पाणी येते. तुम्ही कधी समोसा भेळ खाल्ली आहे का? हो, समोसा भेळ. समोसा भेळ ही चवीला अत्यंत स्वादिष्ट वाटते. ही भेळ कशी बनवायची याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही घरी ही भेळ बनवू शकता.

या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे –

सुरुवातीला एका खोल डब्ब्यात दोन समोसे घ्यावे. त्यानंतर त्या समोस्यांना चमच्याने बारीक करावे. त्यानंतर त्यात मुरमुरे टाकावे. त्यानंतर त्यात वेगवेगळ्या प्रकारचे फरसान टाकावे. तुम्ही व्हिडीओत दाखवलेले फरसान सुद्धा वापरू शकता. त्यानंतर त्यात चाट मसाला टाकावा आणि आवडीप्रमाणे लाल तिखट टाकावे. कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावे आणि बारीक चिरलेले कांदे आणि टोमॅटो त्यात टाकावे. त्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. त्यानंतर त्यात चिंचेची चटणी टाकावी आणि पुदिना आणि हिरव्या मिरच्याची चटणी टाकावी. सर्व मिश्रण एकत्र करावे. शेवटी लिंबाचा रस आणि शेव टाकून ही भेळ सर्व्ह करावी.
हा व्हिडीओ पाहून काही लोकांना ही भेळ बनवावीशी वाटेल. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे ही भेळ बनवायला खूप सोपी आहे. अचानक भूक लागली तर वेळ न घालवता झटपट तुम्ही ही समोसा भेळ बनवू शकता.

हेही वाचा : ताकातली पालक भाजी खाल्ली का? ही हटके रेसिपी लगेच नोट करा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ladyasmrcooking_1356 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “समोसा भेळ” या व्हिडीओवर अनेक युजजर्सन प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “या स्वादिष्ट दिसत आहे” तर एका युजरने लिहिलेय, “ही भेळ पाहून तोंडाला पाणी सुटले” आणखी एका युजरने लिहिलेय, “दहा रुपये प्लेटनी ही भेळ विका” अनेक युजर्सना हा व्हिडीओ आवडला असून ही अनोखी समोसा भेळ सुद्धा आवडली आहे.