Shravan Somvar Recipes: श्रावणातल्या शिवरात्रीच्या उपवासातही विविध पदार्थ खाल्ले जाऊ शकतात, अनेक लोकांना ते खायला आवडते. आज आम्ही ज्या रेसिपी बद्दल सांगणार आहोत, त्याची चव केवळ अप्रतिमच नाही तर बनवायलाही खूप सोपी आहे. सोपी रेसिपी जाणून घेऊया. चला पाहुयात उपवासाची कचोरी कशी बनवायची.

उपवासाची कचोरी साहित्य

२५० ग्रॅम शेंगदाणे
२५० ग्रॅम शिंगाड्याचे पीठ
हिरवी मिरची
आले
अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर
अर्धा चमचा आमचूर पावडर
२ चमचे साखर
१ लिंबू
सैंधव मीठ
तळण्यासाठी रिफाइंड तेल

उपवासाची कचोरी बनवण्याची कृती

उपवासाची कचोरी बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात शिंगाड्याचे पीठ, सैंधव मीठ, दोन चमचे तेल एकत्र करून सर्व काही पाण्याने मळून घ्या.

यानंतर उकडलेले बटाटे सोलून चांगले मॅश करा. आता त्यात चिरलेली हिरवी मिरची, काळी मिरी पावडर, आमचूर पावडर, किसलेले आले, चवीनुसार सैंधव मीठ घालून सर्व चांगले मिक्स करा.

तुम्ही यात साखर आणि लिंबू टाकू शकता. तुम्हाला आवडत नसेल तर ते स्किप करता येईल. तुमच्या कचोरीच्या सारणासाठी मिश्रण तयार आहे.

आता तयार केलेल्या शिंगाड्याच्या पीठाचा छोटा गोळा घेऊन हलके लाटून घ्या. त्यात हे मिश्रण भरून नीट पॅक करून कचोरी तयार करा.

हेही वाचा >> नावडती तोंडली होईल सर्वांची आवडती; मोठ्यांसोबत लहान मुलांना ही आवडेल अशी स्वादिष्ट “तोंडली मसाला” भाजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता कढईत तेल गरम करा आणि सर्व कचोऱ्या एक एक करून सोनेरी होईपर्यंत तळा. तुमची टेस्टी उपवासाची कचोरी तयार आहे. गरमा गरम सर्व्ह करा.