रोजच्या जेवणात चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो. अशावेळी एकतर आपण जेवणात एक दिवस चपाती वगळता फक्त भात-डाळ- भाजी खातो. तर काहीवेळा चपातीऐवजी भाकरी बनवतात. नॉनव्हेज आणि काही भाज्यांबरोबर फक्त भाकरीच छान लागते. पण गोल, मऊ, फुगीर भाकऱ्या बनवणे सर्वांनाच जमत नाही. यात भाकरी थापण्याची पद्धत नीट ठावून नसल्याने भाकऱ्या नीट फुगत नाहीत, तसेच त्या कडकही होतात. म्हणून आम्ही तुमच्यासाठी अशाकाही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीन तुम्ही न थापता अगदी कमी वेळात मऊ, लुसलुशीत भाकरी बनवू शकता.

मऊ, लुसलुशीत भाकऱ्या बनवण्याची सोपी पद्धत

१) सर्वप्रथम एक कप पाणी नीट गरम करुन घ्या.

३) त्याच चिमुटभर मीठ, थोडे पाणी आणि तेल घाला.

४) पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस कमी करा आणि पाण्यात १ कप तांदळाचे पीठ घाला.

५) पीठ चमच्याच्या साहाय्याने चांगले हलवून घ्या.

६) जर पीठात कमी वाटत असेल तर त्यात थोडे पाणी पुन्हा घालून एकजीव करा

७) आता गॅस बंद करुन झाकण ठेवून वाफ काढून घ्या.

८) एका ताटात गरमा गरम पीठ काढा आणि ते गरम असतानाच नीट मळून घ्या. पीठ थंड झाल तर व्यवस्थित मळत जात नाही. हाताला पाणी लावून पीठ मऊ मळून घ्या.

९) पीठ व्यवस्थित मळल्यानंतर एक गोळा हातात घ्या आणि त्याला चपटा करा, जर कुठेही भेगा नसतील तर समजा पीठ व्यवस्थित मळले आहे.

१०) यानंतर पीठाचा गोळा करु कोरड्या तांदळाच्या पीठ लावून थापून घ्या किंवा लाटून घ्या. भाकरी लाटताना कडेने लाटा.

११) आता भाकरीला तव्यावर टाकून वरच्या बाजूने पाणी लावून घ्या

१२) भाकरी अर्धवट शेकल्यानंतर उलटी करा आणि भाकरीच्या कडा दाबून शेकवा

१३) आत्ता सर्व बाजूंनी भाकरी टम्म फुगलेली दिसेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न थापता मऊ, लुसलुशीत आणि टम्म फुगलेल्या भाकऱ्या बनवण्याची पद्धत Nutribit by Sonal Girish Vete नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओच्या माध्यमातून अगदी सोप्य्या पद्धतीने सांगितली आहे.