Rava Omelet Recipe: अंड्याचे ऑम्लेट, बेसन ऑम्लेट आपण नेहमीच खातो पण तुम्ही कधी रवा ऑम्लेट खाल्लय का? आज आम्ही तुमच्यासाठी हीच सोपी आणि वेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत. बऱ्याचदा लहान मुलं शिरा, उपमा हे पदार्थ खायचा कंटाळा करतात. पण रवा आरोग्यासाठी खूप पौष्टिक असतो, त्यामुळे तुम्ही रवा ऑम्लेटची ही सोपी रेसिपी बनवून मुलांना खाऊ घालू शकता. ही रेसिपी बनवण्यासाठी जाणून घेऊया साहित्य आणि कृती…

रवा ऑम्लेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

१. २ कप दही
२. २ कप रवा
३. १ चमचा मोहरी
४. ७-८ कडीपत्त्याची पाने
५. चिमूटभर हळद
६. ३-४ मिरच्या
७. चवीनुसार मीठ
८. तेल आवश्यकतेनुसार

रवा ऑम्लेट बनवण्यासाठी कृती:

हेही वाचा: रेग्युलर दहीवड्याऐवजी यावेळी ट्राय करा चटपटीत ‘पनीर दहीवडा’; अगदी सोपी रेसिपी

१. सर्वात आधी रवा आणि दही एकत्र करुन घ्या.

२. त्यानंतर हे मिश्रण घट्ट असल्यास त्यात थोडे पाणी घालून पुन्हा एकदा चांगले एकजीव करुन घ्यावे.

३. आता एका भांड्यात तेल घालून त्यात मोहरी, मिरची, कडीपत्ता आणि हळद घालून ही तयार फोडणी त्या मिश्रणात घालावी.

४. त्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र करुन घ्यावे.

५. नंतर एका पॅनमध्ये थोडे तेल घालून त्यात ते मिश्रण ऑम्लेट सारखे भाजून घ्यावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६. तयार गरमागरम रवा ऑम्लेट सॉससोबत सर्व्ह करा.