Panner Dahiwada Recipe: बऱ्याच महिला सुटीच्या दिवशी नाश्त्यामध्ये इडली, मेदूवडा, डोसा अशा विविध रेसिपी घरीच ट्राय करतात. अनेक जणींना दर रविवारी काहीतरी नवीन पदार्थ बनवायला आवडतो. रेग्युलर दहीवडा तुम्ही नेहमीच बनवत असाल; पण आज आम्ही तुम्हाला पनीर दहीवडा कसा बनवायचा हे सांगणार आहोत. घरी बनविलेले हे पदार्थ खायला पौष्टिक; शिवाय तितकेच आरोग्यासाठीही फायदेशीर असतात.

पनीर दहीवडा बनविण्यासाठी लागणारे साहित्य :

१. ३०० ग्रॅम पनीर
२. ३ उकडलेले बटाटे
३. ५ कप दही
४. ३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
५. २ कप हिरवी चटणी
६. २ मोठे चमचे भाजलेले जिरे
७. १/२ चमचा लाल मिरची पावडर
८. १/२ चमचा मिरपूड
९. २ चमचे काळे मीठ
१०. चवीनुसार मीठ
११. तेल आवश्यकतेनुसार

पनीर दहीवडा बनविण्याची कृती :

हेही वाचा: टेस्टी ‘पालक पराठा’ अवघ्या १५ मिनिटांत बनवा; नोट करा साहित्य आणि कृती

१. सर्वांत आधी पनीर आणि बटाटे कुस्करून व्यवस्थित एकत्र करा.

२. त्यानंतर या मिश्रणामध्ये आले, हिरवी मिरची व मीठ टाकून व्यवस्थित मळून घ्या.

३. आता याचे गोल वडे तयार करून हे तळण्यासाठी कढईत टाका.

४. हे वडे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या आणि मग सर्व्ह करण्यासाठी काही वडे प्लेटमध्ये घ्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५. त्यावर दही, काळे मीठ, भाजलेले जिरे, मिरपूड, लाल मिरची पावडर, गोड चटणी, हिरवी चटणी टाका आणि पनीर दहीवड्यांचा आस्वाद घ्या.