विदर्भीय लोक जेवणाच्या बाबतीत अतिशय आग्रही, बिनधास्त, बेधडक, एक रांगडा व्यक्तिमत्वाचे येथील लोक येणाऱ्या जाणाऱ्याशी सहज ओळख करून घेत. विदर्भातले जेवण” म्हणजे जहाल तिखटच, असं कित्येकांना वाटतं.’.. पण तसं नाही, काही विशिष्ट वर्गातले लोक तिखट खातात. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीर वड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच खास विदर्भाय रेसिपी म्हणजे विदर्भ स्पेशल पनीर मसाला. चला तर मग पाहुयात सोपी रेसिपी

विदर्भ स्पेशल पनीर साहित्य

२०० ग्राम पनीर
२ कांदे
१० लसूण पाकळ्या
२ टॉमॅटो
१/२ इंच आलं
४ वेलच्या
५ काळीमिरी
२ तमालपत्र
४ लवंगा
थोडीशी कोथिंबीर
थोडीशी कसूरी मेथी
१ टीस्पून गरम मसाला
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट
चवीनुसार मीठ
१ टेबलस्पून बटर
१ टेबलस्पून तेल
१ दालचिनी तुकडा

विदर्भ स्पेशल पनीर रेसिपी

१. प्रथम टोमॅटोची प्युरी करून घेणे, नंतर कांदा, लसूण,आलं व कोथिंबीर याची पेस्ट करून घेणे. पनीरचे मध्यम आकारात तुकडे करून घ्या. आता कढईत बटर व तेल घालून तेल तापले की त्यात जिऱ्याची फोडणी वेलची,तमालपत्र,दालचिनी,काळी मिरी व लवंग घालून परतून घ्या. नंतर कांद्याची प्युरी टाकून चांगले परतून घ्या.

२. कांदा लसणाच्या पेस्ट चांगली परतून झाल्यावर त्यात टोमॅटोची प्युरी घालून चांगले परतून घ्या. त्यानंतर प्युरीला तेल सुटल्यावर त्यात हळद, तिखट, गरम मसाला व मीठ घालून परतून घेणे. नंतर त्यात २ वाट्या पाणी घालून मिक्स करावे.

३. ग्रेव्हीला छान उकळी येऊ द्यावी उकळी आल्यावर त्यात थोडीशी कोथिंबीर व कसुरी मेथी हातावर चोळून घालावी. नंतर पनीर घालून भाजी मिक्स करून झाकण ठेवून पाच मिनिटे शिजू द्यावी.

हेही वाचा >> बटाटा वांगी घालुन सोड्याचे झणझणीत कालवण; चमचमीत रेसिपी खाल तर खातच रहाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४. गरमा गरम विदर्भ स्पेश पनीर पोळी किंवा भाकरी सोबत खाण्यास तयार आहे.