चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्येही मोठी विविधता आहे. काही मैल अंतर पार केलं की त्यामधील वेगळेपण लक्षात येतं. विदर्भानंही स्वत:ची खाद्यसंस्कृती जपलीय. ‘गोळा भात’ हा अस्सल वऱ्हाडी पदार्थ संपूर्ण देशात चांगलाच फेमस आहे. हा गोळा भात कसा तयार होतो, त्याची रेसिपी काय आहे…चला जाणून घेऊयात.
विदर्भ स्पेशल भरड्याचा गोळा भात साहित्य
- १ कप चणा डाळीचा भरडा
- ३ चमचे बेसन
- १ चमचा आले,लसुण,जीरे वाटुन
- १/२ चमचा तिखट
- १/४ चमचा हळद
- मीठ चवीनुसार
- तेल आवश्यकतेनुसार
- भातासाठी
- १ कप सुवासिक तांदुळ
- २-३ मिरच्या
- १ चमचा जीरे
- १ चमचा मोहरी
- १/२ चमचा हिंग
- १/४ चमचा हळद
- ५-६ कढीपत्याची पाने
- मीठ चवीनुसार
- तेल आवश्यकतेनुसार
विदर्भ स्पेशल भरड्याचा गोळा भात कृती
स्टेप १
प्रथम डाळीचा भरडा घ्या.या मधे बेसन,आलेलसुण जीरे वाटुन,तिखट,हळद,मीठ घाला.आणि तीन चार चमचे तेल घालुन एकत्र कालवुन घ्या
स्टेप २
आता या मधे अगदी थोडेसे पाणी घालुन याचे छोटे छोटे गोळे करुन घ्या.भातासाठी तांदुळ स्वच्छ धुवुन घ्या
स्टेप ३
आता पॅन मधे तेल गरम करुन त्यात जीरे,मोहरीची फोडणी करा,मिरची,कढीपत्ता,हिंग,हळद घाला.म तांदुळ घालुन छान परतुन घ्या.
स्टेप ४
परतुन झाले की या मधे आवश्यक तेवढे पाणी घालुन चविनुसार मीठ घाला आणि वर झाकण ठेउन तांदळाला उकळी येउ द्या.
स्टेप ५
उकळी आली आणि भात थोडा शिजत आला की भरड्याचे गोळे त्यात घाला आणि आता हा गोळा भात शिजु द्या.
हेही वाचा >> विदर्भ स्पेशल: चमचमीत सोले वांगे रेसिपी; वांगी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत, खाऊन मन होईल तृप्त
स्टेप ६
तयार गोळा भात प्लेट मधे काढा.
स्टेप ७
गरम गरम भरड्याचा गोळा भात मस्त मसाला ताकाबरोबर सर्व्ह करा.