Video: भिडू अंडा कडीपत्ता बनवू! जॅकी श्रॉफ यांची रेसिपी प्रत्यक्ष करून पाहिली आणि रिझल्ट…

Video Anda Kadipatta: जॅकी श्रॉफ यांनी सांगितल्याप्रमाणे ‘अंडा कडीपत्ता’ बनवून पाहिला आहे. ही रेसिपी नेमकी त्याने कशी फॉलो केली आणि तुम्हीही ती दिसायला कशी झाली हे पाहूया..

Video Jackie Shroff Special Anda Kadipatta Recipe Tried See Results Try At Home Instagram Audio Trending
Video: भिडू अंडा कडीपत्ता बनवू! जॅकी श्रॉफ यांची रेसिपी प्रत्यक्ष करून पाहिली (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Jackie Shroff Anda Kadipatta Video: बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ हे सर्वांनाच आपल्यासारखे वाटतात. फेम असूनही सामान्य माणसांप्रमाणेच वावरणारे जॅकी दा इंस्टाग्रामवर सुद्धा स्वतःला अपना भिडू म्हणून संबोधतात.अलीकडेच सोशल मीडियावर जॅकी श्रॉफ यांची आवडती अशी एक भन्नाट रेसिपी व्हायरल झाली होती. कदाचित तुम्हीही हा व्हिडीओ पाहिला असेल. यामध्ये जॅकी हे अंडा कडीपत्ता कसा बनवायचा हे एका इंटरव्ह्यू घ्यायला आलेल्या मुलाला शिकवत आहेत. पाहायला गेलं तर हा व्हिडीओ जुनाच आहे पण अजूनही असाच खेळकरपण जॅकी श्रॉफ यांच्या वागणुकीत दिसत असल्याचे नेटकरी म्हणत आहेत.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

तर आता आपण एक असा व्हिडीओ पाहणार आहोत ज्यात एका तरुणाने चक्क जॅकी श्रॉफ यांनी सांगितल्याप्रमाणे ‘अंडा कडीपत्ता’ बनवून पाहिला आहे. ही रेसिपी नेमकी त्याने कशी फॉलो केली आणि तुम्हीही ती दिसायला कशी झाली हे पाहूया..

जॅकी श्रॉफ स्टाईल अंडा कडीपत्ता (Jackie Shroff Anda Kadipatta Video)

अंडा कडीपत्ता बनवायला आपल्या कडीपत्ता, अंड, मिरची व तेल, गरजेपुरतं मीठ लागेल. बाकी रेसिपी कशी फॉलो करायची हे आपण जॅकी श्रॉफ यांच्या आवाजात ऐकुया…

हे ही वाचा<< घरच्या घरी मातीशिवाय पुदिना उगवण्याचा भन्नाट जुगाड; Video पाहून म्हणाल, “पैसे वाचले”

तर मग मंडळी एखाद्या नॉन- व्हेजच्या वारी ब्रेकफास्टला ही रेसिपी ट्राय करायला काहीच हरकत नाही. आम्हाला यातील आवडलेली गोष्ट म्हणजे फार मसाल्यांचा मारा नसल्याने छान कुरकुरीत हाफ फ्राय किंवा ऑम्लेट म्हणून तुम्ही ही डिश खाऊ शकता. यात कडीपत्त्याने येणारा फ्लेव्हरही कमाल असतो. तुम्ही ट्राय करताय ना? कसा होतोय प्रयोग कळवायला विसरू नका.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 17:19 IST
Next Story
किडनीतील घाण लघवीवाटे बाहेर फेकू शकते ‘हे’ डिटॉक्स ड्रिंक; अवघ्या २० रुपयात घरीच बनवून पाहा
Exit mobile version