थंडीच्या दिवसांत बाजारात मोठ्या प्रमाणात भाज्या उपलब्ध असतात. आरोग्यासाठी भाज्या अतिशय उपयुक्त असल्याने आहारात जास्तीत जास्त भाज्यांचा समावेश करायला हवा असं सांगितलं जातं. मूळा ही या काळात आवर्जून मिळणारी एक भाजी, पण अनेक जण ही भाजी पाहून नाक मुरडतात. मात्र मुळा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असल्याने तो खायलाच हवा. थंडीच्या दिवसांत होणाऱ्या सर्दीच्या तसेच पचनाच्या समस्यांवर मूळा अतिशय फायदेशीर ठरतो.मुळ्याची आपण कधी भाजी करतो तर कधी कोशिंबीर. त्यापेक्षा थंडीच्या दिवसांत मुळ्याचे गरमागरम पराठे छान लागतात. तुम्हीही टेस्टी आणि पौष्टिक रेसिपी नक्की ट्राय करा

मुळ्याचे पराठे साहित्य

  • २ मुळे मध्यम आकाराचे
  • १ कांदा
  • १ टेबलस्पून लाल तिखट किंवा मिरचीचा ठेचा
  • १ टीस्पून मॅगी मॅजिक मसाला
  • मीठ चवीनुसार
  • १ टेबलस्पून धनेजिरे पूड
  • कोथिंबीर तेल
  • १ टेबलस्पून आल लसूण पेस्ट
  • गव्हाचे पिठ

मुळ्याचे पराठे कृती

स्टेप १
मुळा किसून घ्या कढईत तेल गरम करून हिंग जीरे फोडणी द्यावी आणि मग कांदा लसूण आले पेस्ट घालून हलवावे.आता त्यात लाल तिखट, हळद घालून घ्यावे.

स्टेप २
मुळ्याचा किस पिळून घालावा वरून त्यात मॅगी मॅजिक मसाला आणि मीठ घालून घ्यावे व्यवस्थित एकत्र करावे आणि झाकण ठेवून शिजू द्यावे.

स्टेप ३
गव्हाचे पिठ वापरून कनिक मळून घ्यावे. एक गोळी घेऊन पोळी लाटून तयार सारण भरून घ्या आणि गोळा बनवून घ्यावे पिठात भरवून घ्यावे

स्टेप ४
हलक्या हाताने लाटून घ्यावे. थोडा जाडसरच ठेवावा.तवा गरम झाल्यावर तेलाचा हात फिरवून पराठा तव्यावर शेकावा.दोन्ही बाजूला छान भाजून घ्या.

हेही वाचा >> थंडीत अस्सल खानदेशी पद्धतीनं बनवा झणझणीत ठेचा; ‘ही’ घ्या ५ मिनिटात होणारी सोपी रेसेपी

स्टेप ५
दही, चटणी, लोणचे, लोणी किंवा गरमागरम तुपासोबत खायला घ्यावे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुळा खाण्याचे फायदे

  • मुळा खाल्याने तुमच्या पचनक्रियेस देखील मदत होते. तुम्हाला जर अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर मुळा खाणे तुमच्यासाठी चांगले ठरु शकते.
  • मुळ्यामध्ये क जीवनसत्त्व असते त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते.
  • मुळ्यामुळे लाल रक्तपेशी वाढण्यास देखील मदत होते आणि रक्तामधील ऑक्सीजनचे प्रमाण वाढवण्यास देखील मुळा मदत करतो.