नामानं भगवंताची तळमळ वाढीस लागेल, असं सर्व साधुसंत सांगतात. आपल्याला मात्र नामस्मरण सातत्यानं करू लागल्यानंतर सुरुवातीला प्रपंचाचीच तळमळ लागते. इतकं नाम घेऊनही प्रपंचातल्या अडचणी कमी का होत नाहीत, इतर माणसं माझ्या मनासारखं का वागत नाहीत, मला हवं त्याप्रमाणे गोष्टी घडत का नाहीत? यासारखे मनातच सुप्तपणे उमटणारे प्रश्न हे त्याच प्रापंचिक तळमळीचे द्योतक असतात. त्या अस्वस्थपणातूनच नाम सुरू राहते. नाम घेताना मन शांत होते, असा कुणाकुणाचा अनुभव आपण वाचतो, ऐकतो. प्रत्यक्षात नाम घेताना आपलं मन मात्र अतिशय अस्थिर होत असतं. आता हे नामानं होत नाही, तर आपलं मन मुळातच अस्थिर असतं पण प्रपंचाच्या वेगवान धावपळीत ते आपल्याला जाणवत नाही. नामासाठी मन जेव्हा स्थिर व्हायला लागतं तेव्हाच ते किती अस्थिर आहे, याचा अनुभव येतो. आता हे मन अस्थिर का आहे? एखाद्या जलाशयात सतत खडे मारत राहिलो तर त्यावर सतत तरंग उमटत राहतात. ते पाणी कधीच स्थिर होत नाही. त्याप्रमाणे आपल्या अंतर्मनात अनंत वृत्ती उसळत असल्याने त्यांच्या आवेगानं हे मन सतत अस्थिर होत असतं. नाम घेताना याच वृत्ती विचाररूपानं, कल्पनारूपानं मनात उसळतात आणि मन अधिकच अस्थिर झाल्याचं भासवतात. त्यावर उपाय एकच, नाम घेणं! श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘आपली वृत्ती स्थिर करण्याकरिता आणि उपाधी न लागण्याकरिता आपण नाम घ्यावे..’’(चरित्रातील नामविषयक वचने, क्र. ८२ चा पूर्वार्ध). इथे महाराज नामसाधनेचे दोन गुणधर्म सांगत आहेत. या नामाला कोणत्याही उपाधी नाहीत. म्हणजे अन्य साधनप्रकारांत काहीतरी पूर्वतयारी लागते, काही साधनापद्धतींना शारीरिक क्षमतांची व शारीरिक स्वास्थ्याची गरज लागते, काही साधनापद्धतींना भौतिकातील वस्तूंचीही गरज लागते. नामाचं तसं नाही. नाम कुणीही, कुठेही, कोणत्याही स्थितीत घेऊ शकतो. त्यामुळे दुसऱ्याला कळूही न देता नामसाधना सहज होऊ शकते. या नामानं हळूहळू वृत्ती स्थिर होत जाते. ती स्थिर होण्यासाठी याच वाक्यात पुढे श्रीमहाराज काय सांगतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. श्रीमहाराजांचं ते वचन असं- ‘‘आपली वृत्ती स्थिर करण्याकरिता आणि उपाधी न लागण्याकरिता आपण नाम घ्यावे. नाम नुसते घेतल्यानेसुद्धा काम होईल, पण आपण ते समजून घेतल्याने काम लवकर होईल..’’ म्हणजे नाम जर समजून घेतलं तर काम लवकर होईल. इथे श्रीमहाराजांना अभिप्रेत असलेले काम म्हणजे वृत्ती स्थिर होऊन मन परमात्मलयतेसाठी तयार होत जाणे. आता आपण नुसतं नाम घेत आहोत, समजून घेणं काही आपल्याला साधलेलं नाही. मग आपलं नाम कसं चालतं? श्रीमहाराज सांगतात, ‘‘आपण औषध घेत आहोत पण ते पोटात जाऊ देत नाही. भजन, पूजन, नामस्मरण आपण करतो, पण ते आपल्या मनापर्यंत पोचत नाही. चुकून जेवढे औषध आपल्या पोटात जाईल तेवढाच काय तो परिणाम होतो’’ (चरित्रातील नामविषयक वचने, क्र. ९७).

chaitanya chintan: aim of spirituality
chaitanya chintan, aim of spirituality, spirituality  
२२०. नामाचा हेतू
चैतन्य प्रेम