सुमारे शंभर वर्षांहूनही अधिक काळाची, आध्यात्मिक विचारावर आधारलेली आणि आधुनिक व्यवस्थापनशास्त्रालाही अचंबा वाटावी अशी एक शिस्तबद्ध संस्कृती मुंबईच्या भौतिक विकासाच्या वाटचालीतही अलिप्तपणे कायम टिकून राहिली, हे मुंबईच्या जगप्रसिद्ध डबेवाल्यांचे नेमके वर्णन करता येईल. डबेवाला हा केवळ व्यवसाय नाही, तर ते व्रत आहे या भावनेने घराघरांतून दुपारच्या जेवणाचे डबे जमा करून नेमक्या व्यक्तीला त्याच्या कामाच्या ठिकाणी नेमक्या वेळी पोहोचविण्याच्या व्यवस्थापनकौशल्यास जगाने मान्यता दिली आहे. याचे श्रेय ज्यांना जाते, त्यामध्ये गंगाराम तळेकर यांचे नाव पहिल्यांदा घेतले जाते. जेमतेम आठवीपर्यंत शिकलेल्या या माणसाने रघुनाथ मेदगे या आपल्या साथीदाराच्या सोबतीने नूतन डबेवाला वाहतूक संघटना बांधली आणि बघता बघता ही संघटना आंतरराष्ट्रीय कुतूहलाची बाब बनून गेली. आपल्या व्यवसायाकडे वेगळ्या भावनेतून पाहण्याची भावना तळेकर यांनी डबेवाल्यांमध्ये कायम जपली. डबेवाला हा खऱ्या अर्थाने मुंबईचा अन्नदाता आहे, संघटनेचा प्रत्येक सदस्य कर्मचारी नाही, तर उद्योजक आहे, कारण तो संघटनेचा भागधारक आहे ही भावना रुजविल्यामुळे डबेवाल्यांच्या इतिहासात संप या शब्दाला स्थान नाही. ते एक कुटुंब आहे.  सेवा ही आपली संस्कृती आहे, हा आध्यात्मिक विचार हाच या व्यवसायाचा पाया आहे.. डबेवाल्यांच्या संघटनेचे नेते म्हणून देश-विदेशात जेथे जेथे गंगाराम तळेकर यांनी व्याख्याने दिली, डबेवाला संस्कृतीच्या व्यवस्थापनकौशल्याची गुपिते उघड केली, तेथे सर्वत्र त्यांनी हाच संदेश दिला. लौकिकार्थाने पदव्यांची भेंडोळी हाताशी नसतानाही गंगाराम तळेकर नावाच्या एका सामान्य माणसाने व्यवस्थापनशास्त्राच्या विश्वाची मान्यता प्राप्त करून घेतली. मुंबई बदलते आहे, वाढते आहे त्यासोबत मुंबईच्या गरजादेखील बदलत आहेत, हे लक्षात घेऊन आपल्या व्यवसायाच्या व्यवस्थापनातही बदल आवश्यक असल्याचा विचार या सुसंस्कृत व्यवसायाने सहजपणे स्वीकारला आणि अमलातही आणला, त्या बदलाचे श्रेय तळेकर यांच्याकडे जाते. ऐक्य, शिस्त, त्याग व आपल्या मर्यादांची जाणीव या गोष्टी असल्याखेरीज कोणतीही संस्था प्रभावीपणे काम करू शकत नाही, हा तळेकर यांचा विचार म्हणजे आधुनिक व्यवस्थापनाचा मंत्र ठरला आहे.  ग्राहकांची संख्या वाढल्यावर नवे गट स्थापन करून संकलन आणि कोिडग पद्धतीही बदलली. मात्र त्यांनी आपली संस्कृती बदलली नाही. मुंबईच्या रंगीबेरंगी दुनियेतही पांढरा शर्ट, पायजमा आणि टोपी परिधान केलेला डबेवाला वेगळा, उठून दिसतो, याचे श्रेयही तळेकरांसारख्या कार्यकत्याच्रेच..  

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Andhra pradesh , G. Nirmala, Defying child marriage,10th examination topper
जी. निर्मला… हौंसलों की उडान
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
ग्रामविकासाची कहाणी