03 June 2020

News Flash

आक्षेपार्ह अभिव्यक्ती आणि जनक्षोभ

सध्या फेसबुकवर टाकलेल्या मजकुरावरून काही ठिकाणी उठलेल्या जनक्षोभावर उलटसुलट चर्चा घडत आहेत. कुठल्या मजकुराला आक्षेपार्ह म्हणावे किवा ठरवावे ते त्या त्या वेळी कुठल्या तरी समाज

| December 1, 2012 12:02 pm

सध्या फेसबुकवर टाकलेल्या मजकुरावरून काही ठिकाणी उठलेल्या जनक्षोभावर उलटसुलट चर्चा घडत आहेत. कुठल्या मजकुराला आक्षेपार्ह म्हणावे किवा ठरवावे ते त्या त्या वेळी कुठल्या तरी समाज गटाच्या मानसिकतेवर अवलंबून असते. इतिहासात असे बरेच प्रसंग घडलेले आपल्याला पाहायला मिळतील. सध्या कॉम्प्युटर युग असल्यामुळे आता त्यात एका नवीन माध्यमाची भर पडली आहे एवढेच. पूर्वी समाज सुधारकांनी भाषणातून किवा लिखाणातून केलेल्या विधानावर तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या, त्यांची प्रेतयात्रा काढणे, गाढवाची वरात काढणे, शेण मारा करणे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असत. एखादे विधान आक्षेपार्ह आहे की नाही हे ठरविण्याचा आणि त्यावर आपली निषेधात्मक प्रतिक्रिया देण्याचा हक्कसंबंधित समाज गट स्वत:कडे कुठल्याही कायद्याची तमा न बाळगता घेत आला आहे आणि त्या त्या वेळी त्या त्या वेळच्या शासनाने कधी कायद्याच्या अधाराने, कधी दुर्लक्ष करून, कधी सामंजस्याने तोडगा काढला आहे. थोडक्यात, एखाद्या विधानाची आक्षेपार्हता समाज- सापेक्ष असते. त्यामुळे त्याला कायद्याच्या फुटपट्टय़ा लावणे वाटते तितके सोपे नाही.

पुरातन भारतीय साम्राज्याचे भाषिक पूल
परकी भाषा शिकण्याविषयीचा श्री. गिरीश कुबेर यांचा ‘इंग्लिश-विंग्लिश’ लेख अतिशय सापेक्ष आहे. (अन्यथा, २४ नोव्हेंबर) लेखात परकी भाषेच्या समर्थनार्थ तसेच विरोधी मुद्देही निष्पक्षपणे मांडलेले आहेत. या विषयाला मी काही आयाम जोडू इच्छितो. जगाच्या एकत्रित कारभारासाठी साम, दंड आणि भेद या त्रिसूत्रीची आवश्यकता असते. साम म्हणजे संवाद. भारतीय भाषा याबाबतीत निर्वविादपणे श्रेष्ठ आहेत. पण या बाबीचा आपल्याला विसर पडलेला आहे. भारत जगातील महाशक्ती व्हायचे स्वप्न बघताना पुढील बाबी मार्गदर्शक ठरतील.
१) जागतिक सत्ता आपल्याच हातात यावी यासाठी अनेक युरोपीय देशांत सुमारे ३ शतके जीवघेणी साठमारी चालली होती. या स्पध्रेतून स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स, इंग्लंड हे देश सहा दशकांपूर्वी उखडले गेले. त्यांची आता इतकी दुरवस्था झाली आहे की जर्मनीच्या आíथक मदतीशिवाय हे देश जगू शकणार नाहीत. ‘युरो टोळक्या’च्या स्थापनेचे हे इंगित आहे.
२) मधल्या काही काळात, ‘महासत्तापद’ अमेरिकेने मिरविले, पण प्रचंड कर्जावर उभारलेला त्यांचा डोलारा केव्हाही कोसळू शकतो. आपण उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी आता अनावश्यक खर्चाना कात्री लावण्याचे अतियोग्य काम सुरू केले आहे, परंतु हे करण्यास त्यांनी फारच उशीर लावला. त्यांना कर्ज देणारा चीन, केव्हाही हा डोलारा उलथवून महासत्तापद आपल्याकडे खेचून घेऊ शकतो. त्यामुळे अमेरिकेचा कल आता, चीनला पर्याय ठरू शकणाऱ्या भारताकडे झुकू लागला आहे.
३) चीन हा देश महासत्ता बनण्यासाठी पद्धतशीरपणे पावले टाकत आहे. त्याच्या वाटेत फक्त भारत आडवा येऊ शकतो, याचीही त्याला पूर्ण कल्पना आहे. चीनच्या दंड आणि भेद नीतीची जगाला धास्ती वाटते. त्यांच्या मार्गातील हा दुसरा मोठा अडथळा आहे.
साम किंवा संवादासाठी भारत हा एकमेव खात्रीशीर देश असल्याचे जागतिक एकमत आहे. त्याची ऐतिहासिक कारणे भाषा विषयातून शिकता येतील.  लिबियातील रीफायनरीत काम करताना युगोस्लावी सहकाऱ्यांबरोबर काम करायची संधी मिळाली. स्पेिलगप्रमाणे त्यांच्या राष्ट्रप्रमुखाचे नाव ‘स्लोबोडॉन’ न होता, मधला ‘ल’ गाळून आणि डॉनचा उच्चार बदलून ते ‘शुभ-दान’च्या जवळचा करतात. ‘शुभ-दान’ हाच त्या नावाचा तंतोतंत अर्थ आहे. ‘दान’च्या विरोधी अर्थाचा युरोपीय शब्द ‘स्टील’ असा आहे. त्याचीही उत्पत्ती संस्कृत ‘अस्तेय’ शब्दात सापडते. चांगले शब्द जसे संस्कृतमधून आले, तसेच शिव्यासुद्धा इथूनच निर्यात झालेल्या दिसतात. युगोस्लावी मंडळींना िहदी किंवा मराठी चित्रपट बघताना, त्यांच्या भाषेतील सब-टायटल्सची अजिबात गरज भासत नाही. २-३ मिनिटांत विषय लक्षात आल्यानंतर त्यांना शब्दसुद्धा कळतात.
फ्रेंच ग्नोसीस (ज्ञान/ ग्यान) या देशाचे जुने नाव गौळ-ल्यांड असे होते. तसेच त्यांच्या गौळनामक प्रजातींचा मुख्य व्यवसाय गायी-गुरे पाळण्याचाच होता. गोपाल-गवळी म्हणजे कृष्ण. आणि कृष्ण म्हणजे रासलीला. फ्रान्स देशाची ओळखसुद्धा सदा सर्वकाळ रासलीलेत रममाण होणारा देश अशीच आहे. त्यांच्या ‘जय’, ‘लीन्गेरी’ या शब्दांचे इंग्रजी रूपांतर अनुक्रमे विन – विक्टरी, अंडरगारमेंट असे फार दूरचे होते. त्यांचे मराठी रूपांतर मात्र जसेच्या तसेच म्हणजे जय, लंगोट असे होते.
जागतिक भाषा शिकताना मराठी, िहदी किंवा संस्कृतचे ज्ञान उपयुक्त आहे. इंग्रजीच्या आडवळणाने गेल्यास खड्डय़ात पडायचा धोकाच अधिक संभवतो.
फ्रान्समधील ब्रिटनी प्रांतातील लोकांनी जो शेजारील भूभाग जिंकून तिथे आपले राज्य गाजवले त्या भागाचे नाव ब्रिटन असे पडले. व्हन्र्याकुलर हा ब्रिटिश शब्द आपल्या परिचयाचा आहे, पण त्याचा डिक्शनरीतील ‘गुलामांची अशास्त्रीय भाषा’ हा अर्थ, फ्रेंच मंडळींना पुरता ठाऊक आहे. ‘जेते फ्रेंच’ हे त्यांच्या गुलामांच्या भाषेत, म्हणजे इंग्रजीत कधीही बोलत नाहीत. याच्या अगदी उलट, ब्रिटिश राणीच्या शाही मेजवान्यांचे मेनू कार्ड मात्र फ्रेंच भाषेतच असते.
परदेशातल्या ब्रिटिश सहकाऱ्यांबरोबर चर्चा करताना त्यांच्या राणीची प्रतिष्ठा ही प्रगतीतून साध्य झाली हे मी मान्य करायचो. पण त्यांचे प्रेस्टीज किंवा प्रोग्रेस हे शब्दसुद्धा प्रतिष्ठा आणि प्रगती या देशी शब्दांतून विकसित झाल्याचे मान्य करणे त्यांना अवघड जायचे.
‘इंडियन अँड डॉग्स नॉट अलोवूड’ची बकवास मिरवणाऱ्या मूर्खाविरुद्ध मग मी ‘राणीचेच’ शास्त्र उलटवायचो. ‘क्वीन’ या शब्दाला व्याकरणाचा काहीच आधार नाही. लायनेस, प्रिन्सेस, होस्टेस किंवा गौडेस या स्त्रीवाचक सर्वनामांप्रमाणे तिची उपाधी ‘किंगेस’ अशी असायला हवी होती. ती तशी का नाही याचे साधे उत्तर मराठीतील गाढवीण, वाघीण, सुतारीण, लोहारीण, कुंभारीण या स्त्रीवाचक सर्वनामांत सापडते.  ऐकल्यानंतर ब्रिटिश उभे जळतात. का जळणार नाहीत? ब्रिटिश शब्द ‘जेलसी’देखील आपल्याच ज्वलन-जळणेचाच वारसदार आहे. याच्या उलट अर्थाचा शब्द ‘लोभ’ असा आहे. गुलाम ब्रिटिशांच्या भाषेत तो लव्ह असा थोडा बदललेला आहे.  तसाच आपला ‘राग’ तिथे थोडय़ा बदलानंतर ‘रेज’ म्हणून उपयोगात आणला जातो.
भारतीय संस्कृतीशी फारकत घेतल्याने अरब कितीही आडमुठेपणा करोत, त्यांच्या भाषेने मात्र आपली नाळ अजूनही कायम ठेवलेली आहे. नावात काय आहे या विश्वविख्यात प्रश्नानेच याची तपासणी करूया. अरबी ‘स्मिन’ किंवा ब्रिटिश ‘नेम’ यात संस्कृत ‘नाम’च उलटे-सुलटे दडलेले आहे. काही मंडळी जेव्हा हे मान्य करतात, तेव्हा ते  अरबीत ‘आयवा’ किंवा ब्रिटिश भाषेत ‘यस’ म्हणतात. हे दोन्हीही शब्द संस्कृत ‘आयस’ या धातूतूनच आलेले आहेत. जी मंडळी सहमत होत नाहीत, ते अरबीत ‘मा-फी’ किंवा इंग्रजीत ‘नो’ असे म्हणतात.  इंग्रजीतील नो हा संस्कृतच्या ‘ना’ चाच वारस असल्याचे कोणीही मान्य करेल. अरबी ‘माफी’त मात्र एक गोम आहे. अरबी ‘फी’ हा होकारार्थी शब्द आहे, मग त्याचा नकारात कसा काय बदल होतो ? ‘माफी या जोडशब्दात ‘फी’चे लग्न संस्कृतच्या  नकारार्थी ‘मा’ बरोबर लागलेले आहे. या वरचढ ‘मा’मुळेच मा‘फी’चा अर्थ नकारात बदलला गेला आहे.
काही मंडळींना हा संस्कृतचा प्रभाव, पूर्णपणे भावतो. ती मंडळी अरबीमध्ये ‘सवा सवा’ किंवा इंग्रजीमध्ये ‘सेम टू सेम’ असे म्हणतात. हेही शब्द संस्कृतच्या ‘समा सम’मधूनच आलेले आहेत.
महासत्ता बनायचा निर्णय भारत जेव्हा घ्यायचा तेव्हा घेईल. पुरातन भारतीय साम्राज्याचे भाषिक पूल अजूनही ठिकठिकाणी बऱ्यावाईट अवस्थेत उभे ठाकलेले आहेत. आमच्या वाटेकडे डोळे लावून ते निरंतर प्रतीक्षा करीत आहेत.    
रवींद्र स. वडके, अंबरनाथ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2012 12:02 pm

Web Title: letters to editor 13
Next Stories
1 सत्तेवर डोळा ठेवूनच रोखीचा ‘आधार’
2 लोकमानस
3 लोकमानस
Just Now!
X