१९९३ साली विक्रम शेठ यांची ‘अ सुटेबल बॉय’ ही कादंबरी प्रकाशित झाली आणि ते एकदम प्रकाशझोतात आले. (या कादंबरीचा मराठी अनुवादही प्रकाशित झाला आहे. पण तो आता बाजारात मिळत नाही.) त्यानंतर दहा वर्षांनी या कादंबरीचा पुढचा भाग ‘अ सुटेबल गर्ल’ या वर्षी प्रकाशित होणार होता. तसा विक्रम यांचा हॅमिश हॅमिल्टन या प्रकाशनसंस्थेबरोबर लेखी करारही झाला होता. या कादंबरीच्या आगाऊ मानधनापोटी प्रकाशनसंस्थेने त्यांना तब्बल दहा कोटी तीस लाख रुपये दिले होते. त्यानुसार विक्रम जून महिन्यात आपले हस्तलिखित प्रकाशनसंस्थेला सुपूर्त करणार होते. पण ते त्यांनी वेळेवर न केल्याने हॅमिशने त्यांना दिलेले आगाऊ मानधन परत करण्यास बजावले. या बातमीने सध्या प्रकाशनविश्वात खळबळ माजली आहे. विक्रम यांच्या एजंटच्या म्हणण्यानुसार आता ही कादंबरी या वर्षअखेरीस प्रकाशित होईल. त्यामुळे विक्रम निदान सध्या तरी त्यांच्या प्रकाशकासाठी ‘अनसुटेबल’ ठरले आहेत. ‘अ सुटेबल बॉय’पासून ‘अ सुटेबल गर्ल’पर्यंत जाणाऱ्या या लेखकाची ही ‘अनसुटेबलगिरी’ त्यांच्या चाहत्यांसाठी काळजीचा विषय होऊ शकते. कारण त्यांना या नव्या कादंबरीसाठी अजून पाच-सात महिने वाट पाहात ताटकळावे लागणार आहे.

फ्रंट शेल्फ
टॉप  ५ फिक्शन
द किंग्ज हार्वेस्ट : चेतन राज श्रेष्ठ, पाने : १५०३५० रुपये.
वेजेस ऑफ लव्ह : कमला दास, पाने : १७६२९९ रुपये.
दशुरामज स्क्रिप्ट-न्यू रायटिंग फ्रॉम ओदिशा : संपादन व अनुवाद – मोनालिसा जेन,
पाने : २६२२९९ रुपये.
अ‍ॅलेक्स : पिअरे लॅमेत्रे, पाने : ३६८४९९ रुपये.
बूमटाऊन : आदित्य मुखर्जी, पाने : १२३२९५ रुपये.

टॉप  ५ नॉन-फिक्शन
स्लेव्हज ऑफ सौदीज : जॉय सी राफाएल, पाने : १६०२५० रुपये.
डोंट स्लॅप युवर वाइफ बट डोंट गेट स्लॅप्ड आयदर : सुनील वैद, पाने : ३८४२९९ रुपये.
द हनिमून इफेक्ट : ब्रूस एच. लिप्टन, पाने : २७२२५० रुपये.
इफस, बट्स गोइंग नट्स : सुनीता कपूर, पाने : १९२१९५ रुपये.
इनसाइड द बॉक्स : ड्र बॉयड, जेकब गोल्डनबर्ग, पाने : २७२/४९९ रुपये.
सौजन्य :
फ्लिपकार्ट डॉट कॉम