अभिजीत ताम्हणे abhijit.tamhane@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीच्या जामिया, जेएनयू, गार्गी कॉलेज आदी ठिकाणचे गोळीबार/हल्ले फार अलीकडले. त्याच्या ३१ वर्ष आधी, एक जानेवारी १९८९ रोजी  सफदर हाश्मी यांची हत्या ज्या प्रकारे झाली, तो प्रकारही असाच होता. कुणालातरी शत्रू मानायचं आणि त्या मानीव शत्रुपक्षापैकी जे कुणी चटकन हाती लागणारे असतील त्यांच्यावर हल्ला करून दहशत प्रस्थापित करायची. हेच सफदर हाश्मीबद्दल झालं. आता जणू दिल्लीचंच उपनगर मानल्या जाणाऱ्या गाझियाबाद भागात १९८९ मध्ये झालं. हिंसक जमाव पळूनही गेला. पोलिसांनी तक्रार दाखल करायलाही वेळ लावला. ‘हल्ला बोल’ हे पुस्तक वाचताना ताजे संदर्भ सहज आठवतात खरे, पण हे पुस्तक या संदर्भापेक्षा कितीतरी पलीकडचं आहे. एका पिढीचा, एका चळवळीचा आणि काळाचा मागोवा घेणारं आहे.  हे चरित्र सफदर हाश्मीचं आहे, पण ते त्यानं रुजवलेल्या पथनाटय़ चळवळीचंही आहे (सफदर हाश्मी आज असते तर पासष्टीचे असते. पण पस्तिशीत मृत्यू झाल्यानं त्याचं वय तिथंच गोठल असं मानून ‘अरेतुरे’ करतो आहे).

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Halla bol the death and life of safdar hashmi book review zws
First published on: 15-02-2020 at 04:36 IST