‘ब्रेग्झिट’ हाच पर्याय दीड वर्षांपूर्वीच्या सार्वमतात ब्रिटिशांनी निवडल्याने, आता ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याची औपचारिक प्रक्रियाच काय ती बाकी आहे.. तीही २९ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होईलच. पण ब्रिटनने स्वत:च्या पायावर हा धोंडा पाडून घेण्याआधी जे शहाणे सूर उमटले होते, ते मात्र विरलेले नाहीत. उलट, केलेली चूक आता ब्रिटिश लोकांच्या नव्हे, पण तिथल्या लोकप्रतिनिधींच्या तरी लक्षात येते आहे! ब्रिटनमधील लिबरल डेमॉक्रॅट पक्षाचे एक नेते आणि २०१० ते २०१५ या काळातील उपपंतप्रधान निक क्लेग हे ‘ब्रेग्झिट नको’ म्हणून कंठशोष करीत होते. अखेर अलीकडेच त्यांनी, या विषयी पुस्तक लिहिले. पण ही बातमी, ते पुस्तक बाजारात आल्याची नव्हे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हुजूर (कॉन्झव्‍‌र्हेटिव्ह) पक्षाशी केलेली युती, त्या पक्षाचे नेते आणि तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांच्यासह बुडालेली सत्तानौका, २०१५ च्याच नव्हे तर २०१७ च्याही निवडणुकीतला पराभव, असे धक्के खाऊनही क्लेग आणि त्यांचा लिबरल डेमॉक्रॅट पक्ष युरोपीय महासंघात राहण्याच्या बाजूचाच. यंदाच्या निवडणुकीत तर खुद्द क्लेग यांनाच पराभवाच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. एवढे झाले तरी लोकानुनयी राजकारण न करण्याचा त्यांच्या पक्षाचा शिरस्ता क्लेग यांनी कायम राखला आहेच. ब्रेग्झिटच्या निर्णयाचे ‘ऐतिहासिक चूक’ म्हणून वर्णन करणाऱ्या क्लेग यांनी ‘हाऊ टु स्टॉप ब्रेग्झिट (अ‍ॅण्ड मेक ब्रिटन ग्रेट अगेन)’ हे पुस्तक लिहिले. ब्रेग्झिटच्या फेरविचाराचे आवाहन करणारे आणि त्यासंदर्भातील कायद्यांची गुंतागुंत सुलभ करून सांगणारे हे पुस्तक आहे.

मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nick book how to stop brexit
First published on: 09-12-2017 at 01:20 IST