श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून इस्रोचा स्मॉल सॅटेलाइट व्हेईकल (ररछश्- ऊ2) हा सर्वात छोटा प्रक्षेपक (रॉकेट) शुक्रवारी अंतराळात झेपावला, ते शिक्षण, भूविज्ञान यांसारख्या अनेक क्षेत्रांतील माहितीसाठी उपयोगी पडण्यासाठी. भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून (इस्रो) कडून एसएसएलव्ही-डी२ लघुउपग्रह प्रक्षेपक यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आल्याचे हे वृत्त भारतीय अवकाश संशोधनातील एक महत्त्वाची घटना आहे. या प्रक्षेपकातून अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट (एडर 07), अमेरिकन कंपनी अँटरीसचा ‘जानस १’ आणि देशभरातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या ‘आझादी सॅट २’ या लहान उपग्रहांना पृथ्वीभोवती ४५० किमीच्या वर्तुळाकार कक्षेत सोडण्यात आले आहे. एसएसएलव्ही डी २ हे पहिले छोटे उपग्रह प्रक्षेपक म्हणजे रॉकेट लाँचर आहे. पूर्वी, लहान उपग्रहांचे प्रक्षेपण ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे (पोलर सॅटेलाइट लाँच व्हेईकल – पीएसएलव्ही) प्रक्षेपकाद्वारे केले जात असे, तर मोठय़ा मोहिमांमध्ये भूस्थिर कक्षेसाठी भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान (जीएसएलव्ही) आणि जीएसएलव्ही मार्क ३ प्रक्षेपक वापरले जात असे. पीएसएलव्ही प्रक्षेपण केंद्रावर आणून जुळणी करण्यासाठी दोन ते तीन महिने लागतात, परंतु एसएसएलव्हीची रचना अशी आहे, की केवळ २४ ते ७२ तासांत त्याची जुळणी करता येते. तसेच ते कधीही आणि कोठूनही म्हणजे मोबाइल लाँच व्हेईकल किंवा कोणत्याही तयार केलेल्या लाँच पॅडवरून लाँच करता येते.
इस्रोची यापूर्वीची पोलर सॅटेलाइट व्हेईकलच्या मोहिमांच्या पार्श्वभूमीवर हे छोटे भारतीय बनावटीचे रॉकेट या क्षेत्रातील खासगी उद्योगांच्या स्पर्धेत अधिक महत्त्वाची भूमिका बजावू शकणार आहे. छोटे रॉकेट बनविणाऱ्या अमेरिका आणि चीनमधील खासगी उद्योगांनी या क्षेत्रात आपले पाऊल घट्ट रोवण्याची तयारी केलेली असताना इस्रोने हे १५० किलो वजनाचे रॉकेट यशस्वीपणे अवकाशात पाठवणे, ही घटना या क्षेत्रातील भविष्यातील संधींचे दार उघडण्यास मदत करणार आहे. या रॉकेटचे तंत्रज्ञान भारताला आता खासगी उद्योगांना पुरवता येईल, २०२० मध्ये सरकारने ‘इन स्पेस (इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर) ची स्थापना केली. घोषणा केल्यानंतर इस्रोने गेल्या ऑगस्टमध्ये, रॉकेटचे पहिले उड्डाण केले खरे, मात्र ते आंशिक अपयशी ठरले. त्याचे कारण ते रॉकेट त्याच्या इच्छित कक्षेत वाहून नेत असलेले उपग्रह तेथे पोहोचवू शकले नाही. त्यानंतर त्यातील त्रुटी दूर करून पुन्हा शुक्रवारी त्याचे यशस्वी उड्डाण करण्यात आले. पुढील तीन दशकांत अवकाश उद्योगाची अर्थव्यवस्था विस्तारण्यास हे भारतीय रॉकेट महत्त्वाचे ठरू शकेल, असा विश्वास अवकाशतज्ज्ञांना वाटत आहे. शिक्षण, संरक्षण, पृथ्वी विज्ञान, आपत्कालीन-संबंधित विदा सेवा आणि स्मार्ट पॉवर ग्रिड्स यांसारख्या विविध क्षेत्रांत लहान उपग्रहांची उपयुक्तता आहे. जगाच्या बहुतेक भागांमध्ये, हे उपग्रह पारंपरिक प्रक्षेपकांवर अवलंबून असतात. आपल्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकासह (पीएसएलव्ही) इस्रोने पारंपरिक प्रक्षेपण विभागात स्वत:साठी एक स्थान निर्माण केले. परंतु ४४ वर्षांच्या इतिहासात, अंतराळ संशोधन संस्थेने वर्षभरात सरासरी पाचपेक्षा कमी प्रक्षेपणे केली आहेत. इलॉन मस्कच्या ‘स्पेस एक्स’ने गेल्या वर्षी दर सहा दिवसांनी एकदा परिभ्रमण मोहीम सुरू केली. असे प्रक्षेपक (रॉकेट) तीन ते चार दिवसांत पारंपरिक उपग्रहांच्या किमतीच्या थोडय़ा प्रमाणात मागणीनुसार जुळवून तयार केले जाऊ शकतात, याउलट ‘पीएसएलव्ही’साठी जुळणीसाठी लागणारा वेळ किमान एक महिना आहे.
आजच्या माहिती-तंत्रज्ञानावर अलंबून असलेल्या जगाला अधिक प्रमाणात उपग्रह प्रक्षेपणाची आवश्यकता आहे. त्यामुळे आता या क्षेत्रात इस्रोने आपले स्थान निर्माण करण्याच्या दृष्टीने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. एसएसएलव्ही लहान, सूक्ष्म किंवा नॅनो उपग्रह (१० ते ५०० किलो) ५०० किलोमीटरच्या कक्षेत प्रक्षेपित करण्यास सक्षम आहे. यासाठी तुलनेने कमी खर्च येतो. त्यासाठी प्रवेश, कमी प्रतिवर्तन काळ, एकाच वेळी अनेक उपग्रहांना सामावून घेण्याची सुविधा प्रदान करते. अमेरिकेतील अशा उपक्रमासह या क्षेत्रातील खासगी व्यवसायांचे यश ‘नासा’शी असलेल्या सक्षम समन्वय व भागीदारीतून मिळालेले आहे. त्यामुळे या संदर्भात भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने ‘नासा’चे अनुकरण करणे इष्ट ठरेल. येत्या काही काळात अवकाश क्षेत्रातील या बदलांना सामोरे जाण्यासाठी आता भारतही सज्ज झाला आहे, असा याचा अर्थ आहे!