सचिन रोहेकर

डिजिटल व्यवहार वेगाने सुरू झाले, त्याच वेगाने आपण सगळेच जण त्यांना सरावलोही. पण हे बदल आपल्याचसाठी होते का ? .. बाजारातील एखादा सूक्ष्म ठिपकाही जे वगळू इच्छित नाहीत, अशा वित्त सैतानांशी सगळय़ा जगाची कशी गाठ पडली आहे, याचे दर्शन या पुस्तकातून होते.

Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
Tadoba Tigress, K Mark, Cubs Captured, Camera Quenching , Thirst in Summer Heat, tadoba sanctuary, vidarbh tiger, video of tiger, video of cub, viral video, wild life, marathi news,
video: तहानेने व्याकुळलेली वाघीण तिच्या बछड्यासह थेट तलावावर
Nagpur, Beauty Parlors, Emerging , Hub for Prostitution, 220 Young Women, Trapped, in 4 Years, crime news, marathi news,
ब्युटी पार्लर देहव्यापाराचे मुख्य केंद्र, चार वर्षांत उपराजधानीतील २२० मुली देहव्यापारात
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

चहाची टपरी असो, पानाचा ठेला असो अथवा वाण-सामानाचे दुकान. दृश्यभागी वेगवेगळय़ा क्यूआर कोडचे नक्षीकाम सर्वप्रथम डोळय़ात भरते. त्यापैकी एखादे कोड मोबाइलद्वारे स्कॅन करून अगदी दोन-पाच रुपयेही चुकते करणारी स्मार्ट मंडळी आजकाल सर्रास पाहायला मिळतात. कोणतेही जास्तीचे शुल्क अथवा भार नाही आणि जेवढय़ाला तेवढेच पैसे खात्यातून जातात असे दिसून आल्यावर या सुविधेच्या मोहात कुणीही पडणे स्वाभाविकच.

काही गोष्टी किती सहजपणे रुळतात, नाही का? यूपीआय, ई-वॉलेट्स, स्मार्ट कार्ड, डिजिटल रूपी, क्रिप्टो, फिनटेक वगैरे गोष्टी आपल्या अर्थजीवनांत अकस्मात आणि इतक्या जलदपणे आल्या की, त्या कळल्या व आकलण्याआधीच आपण त्यांना पुरते सरावलोही गेलो. पाकीट विसरून घराबाहेर पडलो आणि खिशात एखादी नोटच काय, सुटे पैसेही नाहीत, असे कुणाबाबत घडले तरी सध्या काही बिघडत नाही. प्रवास, बाजारहाट वगैरे सारे व्यवहार मोबाइल फोनद्वारे विनासायास पार पडतात. किंबहुना रोख नोटांऐवजी, व्यवहार जर असा डिजिटल पद्धतीने केलात तर सूट, सवलत, कॅशबॅकचे लाभ मिळतात, हेही लोकांना आताशी लक्षात येऊ लागले आहे. पण हे परिवर्तन फारशी सक्ती करावी न लागताच घडले असले तरी ते खरेच नैसर्गिक आणि अपरिहार्य आहे काय?

आणखी वाचा – नोटबंदी कशासाठी होती?

नव्हे, हे नैसर्गिकपणे घडलेले नाही. प्रत्यक्षात एका जगड्व्याळ शक्तिशाली हितसंबंधांच्या जुळणीतून हे घडवून आणले गेले. आधुनिक जगात सुरू असलेल्या युद्धाचाच हा परिणाम आहे. पण ते सीमा, प्रदेश विस्तारण्यासाठी सुरू असलेले युद्ध नाही. तर लोकांचे आभासी जगतातील वर्तन आणि पदचिन्हे, म्हणजे त्यांच्या डिजिटल फूटिपट्रवर मालकी विस्तारणाऱ्या नव-साम्राज्यशहांमध्ये सुरू असलेल्या महायुद्धाचा हा परिणाम आहे. जागतिक आर्थिक व्यवस्थेचा वरचा थर खरवडून काढून त्याचे अंतरंग ब्रेट स्कॉट यांनी त्यांच्या ‘क्लाऊडमनी – कॅश, कार्ड्स, क्रिप्टो अँड वॉर फॉर अवर वॉलेट्स’ या पावणेतीनशे पानी पुस्तकात सखोलपणे आणि अत्यंत सुबोध मांडणीतून उलगडले आहे. कार्डस आणि अ‍ॅप्सद्वारे नवीन डिजिटल साम्राज्यशहांचा अर्थात ज्यांना ‘फिनटेक’ म्हटले जाते अशा तंत्रज्ञानाधारित वित्तीय कंपन्यांचा आपल्या जीवनात कधी नव्हता इतक्या खोलवर प्रवेश झाला आहे आणि या युद्धात आपणही नकळतच ओढले गेलो आहोत. बावचळून टाकणारे, गुंगारा देणारे आभासी पैशाचे जग आपले नाही असे आपण लाख म्हटले तरी त्याच्या खाणाखुणा आपल्यापर्यंत, आपल्या नकळतच पोहोचलेल्या असतात. आम्ही बुवा, राजकारणापासून चार हात दूर आहोत आणि राजकारण म्हणजे गजकर्ण म्हणणारा सोवळेपणा जसा बेगडी आहे, त्याच प्रकारे आपल्या सर्वाच्याच डोक्यावरचे आभाळ हे डिजिटल फायनान्सच्या ढगांनी व्यापलेले आहे, कोणीही त्यापासून अलिप्त नाही, असे स्कॉट आणि त्यांचे ‘क्लाऊडमनी’ सुचविते.

बंडाचे निशाण हाती घेणारेही आहेतच. क्रेडिट-डेबिट कार्ड, ई-वॉलेट अथवा अन्य डिजिटल पर्यायाचा वापरच करणार नाही म्हणणारे लोक म्हणजे बंडखोरच. पण अशी ही मंडळी म्हणजे आधुनिक काळातील विजोड, बावळट ध्यानच ठरतील. अशा गतकाळात अडकून पडलेल्या लोकांना भूल घालणाऱ्या युक्त्या, क्ऌप्त्यादेखील इतक्या मजबूत आहेत की अशा एकटय़ा-दुकटय़ा बंडखोरीचा निभावही फार काळ लागत नाही. ‘रोकड/ कॅशची सद्दी संपली.’ ‘रोकडीला कोणतेही भवितव्य नाही’ याचे नारे संपूर्ण जगभरातच एका व्यूहरचनेचा भाग म्हणून सुरू आहेत. स्कॉट सांगतो, या नारेबाजीला वैचारिक तसेच राजकीय-सामाजिक अधिष्ठान मिळवून देणाऱ्या संघटना मोठय़ा आर्थिक पाठबळासह उभ्या राहिल्या आहेत. सिटीग्रुप, मास्टरकार्ड आणि व्हिसा यांच्या आर्थिक पाठबळासह उभी राहिलेली ‘दी बेटर दॅन कॅश अलायन्स – टीबीटीसीए’ (हे नाव लक्षात असू द्यावे) ही त्यापैकीच एक संघटना आहे.

आणखी वाचा – SC Démonétisation Judgement : नोटबंदी वैधच! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

स्कॉट हा रूढार्थाने अर्थतज्ज्ञ नाही. ही खरे तर त्याची जमेची बाजू आणि दुसरीकडे त्यांच्या टीकाकारांना व त्यांच्या आक्षेपांना वाव मिळवून देणारीही बाब ठरते. शिक्षणाने मानववंश शास्त्रज्ञ असलेला स्कॉट हा काही काळ दलाली व्यवसायात होता. त्यातूनच त्याने अर्थजगत अभ्यासले आणि सध्या त्याला अर्थसाक्षरतेच्या क्षेत्रातील कार्यकर्ता, स्तंभलेखक आपल्याला म्हणता येईल.

आर्थिक जगतात ताबा आणि विलीनीकरण ही कायम एक पावन संकल्पना ठरली आहे. बडय़ा वित्त कंपन्या आणि महाकाय तंत्रज्ञान कंपन्यांनी कोणती नवीन भागीदारी केली, कोणा नवोद्योगी उपक्रमात (स्टार्टअप) पैसा ओतला तर त्याला स्वागतपरच मानले जाते आणि प्रसारमाध्यमांमधील त्याचे वार्ताकन – ‘तंत्रज्ञानसुलभ सोयीस्कर आविष्कार’ वगैरे धाटणीचे असते. त्याउलट उठताबसता सुरू असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित नवकल्पनांचे गुणगान आणि उत्साहदायी बडबडीची निरर्थकता; रुजुवात होऊ पाहत असलेला नवाचार आणि ते साधू पाहत असलेल्या कथित अपरिहार्य प्रगतीसंबंधीच्या कथांवर अविश्वास का ठेवावा, हे सांगण्याचे काम स्कॉट यांनी या पुस्तकातून केले आहे.

अर्थशास्त्रज्ञ पैशाबद्दल बोलताना, अर्थव्यवस्थेच्या धमन्यांमधून वाहणारे रक्त म्हणजे पैसा असे संबोधतात. अर्थात हे रक्त प्रवाहित करणारे धडधडते हृदय म्हणजे वित्तीय संस्था असे त्यामागे सूचित असते. पण पैशाचे हे अभिसरण-सूचक वैशिष्टय़ वित्त जगताचे खरे चित्र आपल्यापुढे आणत नाही. अभिसरण प्रणालीऐवजी पैशाला ‘चेता प्रणाली’ अर्थात नव्‍‌र्हस सिस्टीम म्हणणे अधिक चपखल ठरेल, असे स्कॉट म्हणतो. मानवी शरीराला हालचालीस प्रेरित करणाऱ्या सर्व ऊती आणि स्नायूंमधील चेतापेशींच्या जाळय़ाला बांधून ठेवणारी मज्जासंस्था असते. अगदी त्याप्रमाणे जागतिक मुद्रा व्यवस्थेचे जाळे बेमालूमपणे या पृथ्वीगोलाच्या सर्वात दूरच्या टोकापर्यंत फैलावलेले आहे. पैशाचा वापर करणारे आपण सर्व जण या मुद्रा व्यवस्थेतील चेतापेशी आहोत.

आणखी वाचा – नोटबंदीचा निर्णय योग्य! सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल, न्यायमूर्तींनी काय निरीक्षण नोंदवलं?

स्कॉट सांगतात, पैसा हीच श्रमाची, मूल्य (उत्पादन) निर्मितीची प्रेरणा आणि कारकशक्ती असते. मज्जासंस्थेतील परस्परसंलग्न ऊती आणि स्नायूंतील चेतापेशींना ही पैशाची प्रेरणा म्हणजे एकापासून दुसऱ्या स्नायूला प्रेरित करून शरीराला वेग व हालचाल देण्यासारखीच आहे. एकत्रितपणे पाहिल्यास, जागतिक वित्त समुदाय हा पैशाच्या बहुस्तरीय साम्राज्यासाठी कार्यप्रेरित घनदाट चेतातंतू केंद्रासारखा आहे. समुद्रतळाखाली फायबर ऑप्टिक तारांच्या जाळय़ाद्वारे आणि ऑफशोअर केंद्रांद्वारे जगाच्या इतर समुच्चयापर्यंत ते प्रवाहित होत राहते. लंडनमधील लेव्हल ३९ सारख्या मनोऱ्यांचा शिखरिबदूवरून त्यांचे नियंत्रण होत असते. या मनोऱ्यांच्या खालच्या मजल्यांवर कार्यरत फिनटेक-उद्योग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना जाणिवेत नसले तरी, हे जगड्व्याळ चेताकेंद्र स्वयंचलित करण्यासाठीच त्यांची नियुक्ती झालेली असते आणि एडटेक, फिनटेक किंवा तत्सम कथित नवप्रयोग हे केवळ मुखवटे आहेत.

आपल्यासारख्या सर्वसामान्यांचेही फार काही वेगळे नसते. स्कॉट सांगतात, आजच्या वित्तीय तंत्रज्ञानाचा बराचसा भाग हा एका सैतानाशी झालेला सौदा आहे. हे तंत्रज्ञान आपल्याला अल्पकालीन सोयी व शक्तींचे वचन देते आणि दीर्घकाळासाठी आपले परमसुख आणि मुख्य म्हणजे स्वायत्तताही नष्ट करते. म्हणजे पानवाल्याकडून बडीशेपाच्या पुरचुंडीची डिजिटल पद्धतीने खरेदी करताना, एका पैनेदेखील जास्तीचा पैसा आपण देत नसलो, तरी आपली बरीचशी माहिती आणि अनिवार्य विदा (डेटा) या प्रक्रियेत इतरांच्या हवाली आपण बेमालूमपणे करत असतो. ‘क्लाऊडमनी’तील रोकडरहित व्यवस्थेच्या विरोधातील युक्तिवाद हा असा – ‘डिजिटल वापरा आणि स्वत्व गमवा’ धाटणीचा आहे. सुरक्षितता, फसगतीतून होणाऱ्या नुकसानीपेक्षा सर्वात मोठा धोका हा म्हणजे आपण काय करतो, कुणाशी बोलतो, आपली देवाणघेवाण काय व कुणाशी अशा प्रत्येक गोष्टीवर आपल्यावर पाळत ठेवली जाऊ शकेल, इतका ऐवज आपण स्वत:हून नकळत कुठल्या न् कुठल्या यंत्रणेला देत असतो.

आणखी वाचा – नोटाबंदी अनाठायीच; ती कशी?

रोकडरहित समाजाचे वित्तीय भांडवलदारांचे स्वप्न इतके ‘सर्वसमावेशी’ आहे की, बाजारातील अगदी सूक्ष्मतम ठिपकाही त्यांच्या खात्यांशी जोडला जाईल. हा ठिपका कोण, तर झोपडपट्टीत राहणारे अथवा डोक्यावर कोणतेच छप्पर नसलेले फाटके बेघर, गटार उपसणारे मजूर, ओझी वाहणारे हमाल असोत, त्यांचा सामाजिक-सांस्कृतिक अथवा आर्थिक स्तर काय याच्याशी त्यांना देणंघेणं नसतेच. मात्र आर्थिक देवीघेवीच्या चित्राच्या प्रत्येक पिक्सेलमध्ये बँकिंग क्षेत्राचा सहभाग झाला पाहिजे. हा डिजिटल शिरकाव इतका मायावी आणि वेगाने होत आहे की, लोकांना त्याची जाणीवही होत नाही. हवेत विरत जाणाऱ्या हलक्या अदृश्य धुक्याने सारा परिसर व्यापत गेला आहे, ही जाणीव या पुस्तकाचे एक एक प्रकरण करून देते. 

भारतातही २०१६ मधील नोटाबंदी झाली. त्या निर्णयामागे जी उद्दिष्टे सुरुवातीला सांगितली गेली ती सपशेल फसली. मग  रोकडमुक्त अर्थव्यवस्थेसाठी पडलेले ते पाऊल असल्याचे नंतर सरकारमधील व यंत्रणेमधील जो तो म्हणू लागला. भारताने नोटाबंदीच्या वर्षभर आधीच म्हणजे २०१५ मध्ये ‘टीबीटीसीए’चे सदस्यत्व मिळविले होते. हा घटनाक्रम केवळ योगायोग म्हणायचा? पुढे पंतप्रधान जनधन योजना आणि जनधन, आधार, मोबाइल (जॅम) या वित्तीय सर्वसमावेशकतेच्या योजनाही आल्या. पाळत ठेवणाऱ्या ‘पेगॅसस’ची मोदी सरकारकडून खरेदी आणि याविषयी जागतिक वृत्तसंस्थांच्या दाव्यांना सरकारकडे कोणतेही उत्तर नसणे, हाही योगायोगच. जगभरात अनेक सरकारांबाबत योगायोगांची अशा मालिकाच समजून घ्यायची असेल, तर ‘क्लाऊडमनी’ने केलेला उलगडा जरूरच वाचायला हवा.

क्लाऊड मनी – कॅश, कार्ड्स, क्रिप्टो अँड वॉर फॉर अवर वॉलेट्स

लेखक : ब्रेट स्कॉट,

प्रकाशक : पेंग्विन रँडम हाऊस,

पृष्ठे : २८८, किंमत : ७९९ रु.

sachin.rohekar@expressindia.com