राजेश बोबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निश्चयाचे बळ हे केवळ साधन नव्हे, तर ते प्रत्यक्ष फळच आहे, या तुकाराम महाराजांच्या वचनाचा उल्लेख करून मानवाला आत्मविश्वासाची आभा वाढविण्याचा मंत्र देताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘निश्चय आपला आहे, तो करणारेही आपणच आहोत व त्याचे फळही आपणासच हवे आहे. ही बाजू विसरून आपण उगीच विसरभोळेपणाचे प्रदर्शन करतो, निराळय़ा संकल्पांची धारणा करतो आणि निराळय़ा फळांची अपेक्षा धरतो. उदाहरणार्थ, मी ध्यानाला बसावे पण ‘समोर मूर्ती गुरुदेवाची आणि मनात चिंता मात्र घराची’, असा प्रकार व्हावा, याला जबाबदार कोण? आपण जे काही करू इच्छितो त्याचा निश्चय आपल्या हृदयात दृढ झालेला नसतो, हेच त्याचे कारण. यामुळे आपल्या सर्व वृत्ती एका प्रवाहात समरस होत नाहीत आणि त्यामुळे आपल्या आतील सुप्त शक्ती जागृत न झाल्याने त्या कार्यात सफलताही प्राप्त होऊ शकत नाही. ज्या क्षणी आपल्या हृदयातील निश्चय दृढ होतो, त्या क्षणी आपल्या वृत्ती एकात्मतेने काम करू लागतात आणि त्या एकतानतेतून प्रकट होणारी शक्ती आपणास तेव्हाच सफल करू लागते, याचा प्रत्यय कोणासही येऊ शकेल.’’

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chintandhara the words of tukaram maharaj mentioned rashtrasant tukdoji maharaj ysh
First published on: 12-05-2023 at 00:02 IST