जपानमधील प्रतिष्ठित ‘ओकावा पारितोषिक’ माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांतिकारक संशोधन अथवा उपयोजन करणाऱ्या ज्या दोघांना दरवर्षी दिला जातो, त्यापैकी एक व्यक्ती जपानीच असावी लागते तर दुसरी जपानबाहेरील.. साहजिकच, औत्सुक्य असते ते ‘आंतरराष्ट्रीय’ पातळीवरल्या निवडीबाबत. यंदा हे पारितोषिक बेंगळूरुमध्ये जन्मलेले, दिल्लीत वाढलेले आणि अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात कार्यरत असलेले श्री के. नायर यांना जाहीर झाले आहे ही भारतीयांसाठी आनंदाचीच बाब, कारण १९९६ पासून आंतरराष्ट्रीय पातळीवर दिले जाणारे हे पारितोषिक भारतीय वंशाच्या दोघाच वैज्ञानिकांना आजवर (२००४ – डॉ. राज रेड्डी, २००७- डॉ. ज. के. अगरवाल) मिळालेले आहे. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच, मोबाइल ‘स्मार्टफोन’च्या कॅमेऱ्यांतूनही त्या काळाच्या मोठय़ा डिजिटल कॅमेऱ्यांइतकी दर्जेदार छायाचित्रे टिपता यावीत, यासाठी डॉ. नायर प्रयत्नशील होते. सध्या ते ‘खांबाभोवती किंवा वाहनाच्या सर्व बाजूंनी चिकटवता येणारा कॅमेरा’ घडवण्याच्या संशोधन-प्रकल्पाला मार्गदर्शन करत आहेत!

हे संशोधन अर्थातच, ‘केव्ह’ या लघुनामाने ओळखल्या जाणाऱ्या ‘कोलंबिया व्हिजन लॅबोरेटरी’तर्फे सुरू आहे. डॉ. नायर हे या प्रयोगशाळेचे प्रमुख आहेत. अमेरिकेत ते पहिल्यांदा पोहोचले १९८६ मध्ये. नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातून त्यांनी संगणकशास्त्रात ‘एमएस’ पदवी मिळवली. त्यापूर्वी, त्यांचे वडील आर. एम. नायर हे दिल्लीत ‘इलेक्ट्रॉनिक ट्रेड अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ या सरकारी उद्योगात वरिष्ठपदी असल्याने श्री नायर यांनी शालेय शिक्षण दिल्लीतच घेऊन रांचीजवळील मेसरा येथील बिर्ला तंत्रविज्ञान संस्थेत (बिट्स) इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीची पदवी घेतली होती. अमेरिकेतल्याच कार्नेजी मेलन विद्यापीठातून पीएच.डी. मिळवून, १९९१ पासून त्यांनी अध्यापनकार्यही सुरू केले. मात्र त्याआधी जपानच्या ‘हिताची इन्स्टिटय़ूट’मध्येही त्यांनी संशोधन केले होते आणि तेथेच, संगणकीय प्रतिमांकन याच विषयात काम करायचे हेही ठरले होते.

trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

‘लहानपणापासूनच मला कसला तरी शोध लावावासा वाटायचा.. तो शोध कसलाही असो, अगदी बाटली उघडण्याच्या उपकरणाचाही- पण तो मी लावलेला हवा असे मला वाटे,’ असे नायर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. मोबाइल कॅमेऱ्यांमध्ये उच्च दर्जा आणणारे संशोधन करणाऱ्यांपैकी एक ही त्यांची ख्याती आहे, कारण आज आपण सहज एका बोटाने ‘एचडीआर’ असे दाबतो आणि मग चांगली छायाचित्रे टिपली जाण्याची शक्यता वाढवतो, ते ‘एचडीआर’ म्हणजे ‘हाय डायनॅमिक रेंज’ प्रतिमांकन तंत्र, हा  श्री  के. नायर यांच्यामुळे प्रत्यक्षात येऊ शकलेला प्रकार आहे! याहीपुढे, छोटय़ा-छोटय़ा अनेकानेक ‘लेन्स’मधून संपूर्ण सभोवताल एकाच वेळी टिपू शकणारा कॅमेरा, हा त्यांचा खरा शोध ठरू शकतो. त्यासाठीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसली तरी हे संशोधन बऱ्याच पुढल्या टप्प्यावर पोहोचलेले आहे. त्यांचे आजवरचे संशोधन ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’सह अनेक संगणकीय प्रतिमातंत्रांसाठी उपयुक्त ठरले असून त्यासाठी २००८ मध्ये वॉशिंग्टन डी.सी. येथील ‘नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग’ या ज्येष्ठ अभियंत्यांच्या संस्थेवर वयाच्या अवघ्या पंचेचाळिशीतच (२००८ मध्ये) झालेल्या निवडीसह अनेक मानसन्मानही त्यांना मिळालेले आहेत.