कन्याकुमारीच्या समुद्रकिनारी फिरायला गेल्यावर तिथे हिंदूी किंवा हिंदू महासागर म्हणजेच इंडियन ओशन, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांचा संगम पाहायला मिळतो. पण प्रत्यक्षात अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर हे हिंदूी महासागराचेच भाग आहेत. अटलांटिक, प्रशांत, हिंदूी, आक्र्टिक आणि अंटाक्र्टिक असे पाच महासागर असले तरी ती केवळ आपण दिलेली नावे आहेत. सर्व सागरजल एकच मोठा जलौघ आहे. समुद्रात असलेला पाण्याचा मोठा साठा तीन किंवा अधिक बाजूंनी जमिनीने वेढला असतो. उदा. भूमध्य समुद्र, अरबी समुद्र तसेच कॅस्पियन समुद्र संपूर्णपणे जमिनीने वेढलेले आहेत. महासागर हे समुद्रापेक्षा बरेच मोठे असतात आणि ते शक्यतो एकमेकांना जोडलेले असतात. महासागरांनी पृथ्वीचा खूप मोठा पृष्ठभाग व्यापला आहे. महाराष्ट्राला अरबी समुद्राचा किनारा लाभला आहे. आपले महामुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे किनारपट्टीवर असणारे सागरी जिल्हे आहेत.

महासागराच्या एखाद्या ठिकाणच्या भौगोलिक आणि इतर वैशिष्टय़ांमुळे तेवढय़ाच भागाला समुद्र म्हणण्याची प्रथा आहे. उदा. अरबी द्वीपकल्पाच्या क्षेत्राला लागून असलेल्या हिंदूी महासागराच्या भागाला ‘अरबी समुद्र’ म्हणतात. हिंदूी महासागराच्या वायव्य भागात अरबी द्वीपकल्पातील संयुक्त अरब अमिराती, ओमान, येमेन, भारत, इराण, पाकिस्तान यादरम्यान अरबी समुद्राचे क्षेत्र आहे.

Bridge in sea to connect Bandra Worli Sea Bridge and Sea Coast Road
वांद्रे वरळी सागरी सेतू आणि सागरी किनारा मार्गाला जोडण्यासाठी समुद्रात पूल
Heat wave in the state know where the heat wave warning is
राज्यात उष्णतेची लाट… जाणून घ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?
Unknown cargo ship collided with fishing boat in Palghar sea
पालघर समुद्रातील मासेमारी नौकेस अज्ञात मालवाहू जहाजाची धडक
Loksatta Lokrang Picture Painting Tourist places the sea
चित्रास कारण की: समुद्रसरडा

दुसरे उदाहरण ‘सग्र्यासो’ समुद्राचे. हा समुद्र अटलांटिक महासागराचे विशाल क्षेत्र असून या भागात तरंगणाऱ्या सग्र्यासो शैवालामुळे त्याला असे नाव पडले आहे. समुद्रातील शैवाल वाढण्यासाठी सामान्यपणे खडक/ दगड किंवा तत्सम आधाराची गरज असते. पण या शैवालातील हवेच्या पिशव्यांमुळे ते तरंगत राहून वाढते. सग्र्यासो हा एकच समुद्र कोणत्याही देशाच्या सीमेलगत नसून अटलांटिक महासागराच्या आतल्या भागात आहे. तसेच चिनी समुद्र (चायना सी) हा पश्चिम प्रशांत महासागराचा एक भाग असून तो पूर्व-नैर्ऋत्येकडील आशियाई देशांच्या सीमेलगत आहे. जॉर्डन-इस्रायलदरम्यान असलेल्या खाऱ्या पाण्याच्या मोठय़ा क्षेत्राला ‘डेड सी’ म्हणजेच ‘मृत समुद्र’ म्हणतात. कारण याच्या जास्त क्षारतेच्या पाण्यात जीवसृष्टी जगू शकत नाही. पाण्याची घनता जास्त असल्याने पाण्यावर माणूस तरंगू शकतो. हा मृत समुद्र प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहे. समुद्राचे तापमान व क्षारता सर्व महासागरांत आणि तिथेही विविध कालावधींत सतत बदलत राहते.

डॉ. बाळासाहेब कुलकर्णी,मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa. org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org