‘वाचकांची फसवणूक झाली म्हणून माफी मागून प्रश्न सुटणार आहे का? बातमी ‘स्टंटबाज’ आहे हे तुमच्या लक्षात कसे आले नाही? अक्कल कुठे गेली होती तुमची?’ न्यूजरूममध्ये दाटीवाटीने उभ्या असलेल्या सहकाऱ्यांवर संपादक ओरडत होते तेव्हा स्मशानशांतता पसरली होती. थोडा खाली सरकलेला चष्मा पुन्हा वर चढवत ते बोलू लागले. ‘तिच्या व्यवस्थापकाने ‘इन्स्टा’वर पोस्ट टाकली आणि तुम्ही विश्वास ठेवलात? वा रे वा तुमची पत्रकारिता! अरे, रुग्णालय कोणते? तिच्या नातेवाईकांचे म्हणणे काय? मृतदेह कुठे आहे? अंत्यसंस्कार कधी? यासारखे साधे प्रश्न तुम्हाला पडत नसतील तर कमाल आहे तुमची? कुणी केली ती बातमी?’ असे संपादकांनी विचारताच एक हात वर गेला.

संपादकांनी रागाने त्याच्याकडे बघताच तो खाली मान घालत उत्तरला ‘सर, समाजमाध्यमावर बातमी होती, नंतर चॅनलवरसुद्धा चालू लागली.’ त्याला मध्येच थांबवत ते गरजले. ‘चॅनलवरच्या बातम्या कॉपी करण्यासाठी तुम्हाला ठेवले का? तिने ज्या कर्करोगाचा उल्लेख केला तो बरा होणारा. त्याची लस आहे. धाडकन मरायला तो हार्टअटॅक वाटला का तुम्हाला?’ तेवढय़ात चीफसब म्हणाला ‘सर, माझ्या लक्षात आले होते. या लसीसंदर्भात सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून तिचा हा स्टंट असेल असे वाटून गेले. आता राज्यकर्तेसुद्धा अशा धक्कातंत्राचा वापर करतात, मग हिने केला तर काय बिघडले म्हणून मी ती बातमी पुढे ढकलली.’ हे ऐकताच संपादकांचा पारा चढला.

98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Accused in gang rape case
सामूहिक बलात्कार प्रकरणातील नऊ वर्ष पसार असलेल्या आरोपीला अटक
Priyadarshni Rahul
हुंड्याविरोधात असाही लढा! लग्न मोडल्यानंतर तिने घडवली ‘अशी’ अद्दल, कायद्याचा अभ्यास अन् १४ वर्षे लढा!
wardha suicide, wardha sister commits suicide
वर्धा : संपत्तीचा वाद; बहिणीने केली भावाच्या घरी आत्महत्या

‘तुम्ही सारे राज्यकर्त्यांच्या प्रेमात पागल झाले आहात. खोटय़ा बातम्या देणे हा गुन्हा आहे याचाच विसर तुम्हाला पडला आहे. माध्यमे विरोधकांना जवळची वाटायला हवीत या तत्त्वालाच तुम्ही तिलांजली दिली आहे. याच बाईने मागे विश्वचषक जिंकला तर चौपाटीवर नग्न धावेन असे जाहीर केले होते. तिच्यावर विश्वास कसा ठेवला तुम्ही?’ तेवढय़ात एक म्हणाला ‘सर, पण सगळय़ांनीच बातमी छापली’ त्यावर संपादक पुन्हा भडकले. ‘प्रश्न सगळय़ांचा नाही, आपण का छापली याचा आहे.’ आता ही खरडपट्टी थांबणार नाही हे लक्षात येताच एक तरुण सहकारी म्हणाला ‘सर, आता ती जिवंत आहे असे छापण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांच्या जवळ जाण्यात तिच्यात व कंगनामध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे, अशी बातमी करायची का?’ यावर संपादकांनी रागाने त्याच्याकडे बघितले व यांना समजावण्यात काही अर्थ नाही, असे काहीसे पुटपुटत ते थेट त्यांच्या कक्षात निघून गेले.

ते जाताच सारे समाजमाध्यमे चाळण्यात व टीव्ही बघण्यात व्यग्र झाले. रात्री डय़ुटी संपल्यावर साऱ्याच माध्यमांतील सहकारी ‘प्रेसक्लब’मध्ये जमले. विचारांचे(?) आदानप्रदान करताना साऱ्यांनाच संपादकांच्या कानउघाडणीला सामोरे जावे लागल्याचे स्पष्ट झाले. तेवढय़ात वेटरने निरोप आणला की पूनम पांडे क्लबमध्ये आली आहे व तिला सर्वाना भेटायचे आहे. हे कळताच सारे टेबल सोडून खाली धावले व प्रत्येकजण तिच्यासोबत ‘फोटोसेशन’ करू लागले. दुपारच्या खरडपट्टीचा लवलेशही कुणाच्या चेहऱ्यावर तेव्हा दिसत नव्हता.