राजेश बोबडे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षक व विद्यार्थ्यांबाबत आपले चिंतन प्रगट करताना म्हणतात, विद्यार्थ्यांची परीक्षेपुरती तयारी करून देणे ही नाटकाची तालीम आहे, ते खरे शिक्षणच नव्हे. उत्तम नागरिक, नमुनेदार सेवक, स्वावलंबनाने जीवनोपयोगी वस्तू निर्माण करून राष्ट्राचे सामर्थ्य वाढविणारा आत्मसंरक्षक, देशाची जबाबदारी ओळखून प्रसंगी रणात चमकणारा राष्ट्रसैनिक असे रूप विद्यार्थ्यांना द्यावयाचे असेल तर ते वरपांगी शिक्षणाने दिले जाणे शक्य नाही. त्यासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या जीवनाशी समरस झाले पाहिजे. शिक्षकाने बोलण्याप्रमाणे वर्तन ठेवणे हेच सर्वात जास्त परिणामकारक वशीकरण आहे. सांगकाम्या शिक्षक हा अंत:करण व काम यात महदंतर ठेवीत असल्याने खरे विद्यार्थी तयारच करू शकत नाही; आणि कार्याच्या अंत:प्रेरणेने – जिव्हाळय़ाने काम करणारा शिक्षक हा आपले जीवन व अंत:करण त्या शिक्षणात ओतीत असल्यामुळे अल्पावधीतच फार मोठे कार्य करून दाखवू शकतो.

private schools within one km of govt schools not obligated to have rte seats
वर्गभेद निर्माण करणारा शिक्षण हक्क!
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…

हेही वाचा >>> चिंतनधारा: सेवा मंडळाचा आदर्श जगात दिसावा

पोटाच्या खळगीसाठी लांगूलचालन करणारा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना निर्भय राष्ट्रवीर कसा बनवू शकेल ? शिक्षकालाच प्रार्थनेच्या भावार्थाचा आस्वाद घेता येत नसेल तर विद्यार्थ्यांस तो कोठून प्राप्त होणार? वरची इमारत दुभंग होण्यासाठी भिंतीच्या पायातील चार तसूची भेग पुरेशी होते. मुळात किंचितसा वाक असेल तर तो किल्ल्याची सारी भिंतच वाकडी करून कमजोर करून टाकतो. यासाठी शिक्षकाला स्वत:च आधी फार जपून वागले पाहिजे. विद्यार्थ्यांना आपणाला कोणत्या दिशेकडे न्यावयाचे आहे – काय बनवावयाचे आहे, ही गोष्ट आधी शिक्षकाने स्पष्टपणे ध्रुवताऱ्याप्रमाणे आपल्या दृष्टीपुढे ठेवली पाहिजे. घर सुंदर करावयाचे असेल तर आधी घराचा नकाशा हा तितकाच स्पष्टपणे दृष्टीपुढे कायम असला पाहिजे. शिल्पकार हा ओबडधोबड दगडावर मूर्ती खोदताना त्या दगडास आधी चौरस करतो, डगलतो, गुण्यात आणतो; पण खोदावयाची मूर्ती ही त्याही आधी त्याच्या नेत्रांपुढे स्वप्नरूपात दिसत असते. त्याचे खोदकाम म्हणजे त्याच्या मनोमयी मूर्तीचे नुसते प्रगटीकरण असते. शिक्षकाच्या डोळय़ापुढेही तशीच पूर्ण कल्पना आधी स्पष्ट रूपात स्थिर असली पाहिजे.

   एकांगी ध्येय हृदयाशी बाळगून शिक्षक कार्य करील तर तो राष्ट्राचा शत्रूच होणे अधिक संभवनीय आहे. तात्त्विकतेचा अर्थ ‘जीवनाशी सोडून असणाऱ्या गोष्टी’ असा असला तर त्या आम्ही फेकून देणेच श्रेयस्कर समजू! आध्यात्मिकतेच्या उंच आकाशात भरारी मारण्याऐवजी व्यवहाराच्या खडबडीत भूमीवर कसे चालावे याची जाणीव विद्यार्थ्यांना सांगोपांग करून देणेच अत्यंत आवश्यक आहे. प्रसंगमान न जाणणारा, काळाला गुरू न करणारा विद्वानही मूर्खच समजला पाहिजे! आज साऱ्या जगात विचित्र व भयानक वातावरण निर्माण झाले आहे; या वातावरणात मानवतेचा शांतिदीप उजळणारे सेवक निर्माण करणे हेच आमचे लक्ष्य असले पाहिजे. लोकांपासून दूर राहणाऱ्या लोकविलक्षण पुढाऱ्यांची निर्मिती या शिक्षणापासून होऊ नये.

rajesh772@gmail.com