राजेश बोबडे

‘‘सामान्य समाज काही वेळा धर्माची मूळ तत्त्वे विसरून रूढींच्या आहारी जातो. समाजातील जबाबदार जाणते लोक त्याच्या रूढ भावनांचा फायदा घेऊन आपलेच भले करू पाहतात. परंतु त्या अज्ञानी लोकांना योग्य मार्ग दाखवयाला तयार नसतात, अशा वेळी समाजात जे कोणी जिवंत हृदयाचे व स्वतंत्र विचारसरणीचे पुरुष असतात ते निर्भयपणे कार्य करण्यासाठी पुढे येतात. त्यांचेच नाव इतिहासात अजरामर होते,’’ असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात.

Sharad Pawar insulted daughters-in-law of Maharashtra strong reaction from Ajit Pawar group on that statement
“शरद पवारांनी महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केला”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गटाची तीव्र प्रतिक्रिया
What Sharad Pawar Said About Raj Thackeray?
‘राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्याने सामान्य माणूस संभ्रमात’, शरद पवार म्हणाले, “मी पण सामान्य माणूस”
sunil tatkare on raj thackeray support,
“रायगडमध्ये मनसेची मोठी ताकद, त्यामुळे…”; राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
MP Udayanraje Bhosale reacts on being in touch with Sharad Pawar
सातारा: तुतारीचे काय, त्या आमच्या वाड्यातही वाजतात- उदयनराजे

महाराज म्हणतात, ‘‘महाराष्ट्राच्या इतिहासात असा एक काळ येऊन गेला की, ज्यावेळी जाणते लोक समाजजागृतीची जबाबदारी विसरून पांडित्याच्या आहारी गेले. धर्माच्या नावावर जुनाट रूढींना कवटाळून बसले आणि बहुजन समाजाला योग्य मार्गदर्शक नसल्यामुळे लोक अज्ञानाच्या अंधारात चाचपडत होते. जीवनाच्या उन्नतीचे तत्त्वज्ञान विशिष्ट भाषेच्या कडीकुलपात बंद असल्यामुळे भलभलते पंथ जनतेची दिशाभूल करत होते. समाजाची शकले झाली होती. अशा वेळी श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज व नामदेव महाराजांनी तत्त्वज्ञानाची गंगा सोप्या मराठीतून प्रवाहित केली आणि समाजाला योग्य प्रकाश दाखवला. शुद्ध व विशाल धर्मतत्त्वांनाच भागवत धर्म या नावाने समाजासमोर मांडले, ज्यात मानवधर्मच प्रकट झाला होता.’’

हेही वाचा >>> चिंतनधारा : फूट पाडणारी ब्रिटिशनीती सोडून द्या!

‘‘संत ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज व एकनाथ महाराज यांच्यानंतर झालेले संत तुकाराम महाराज हे भागवत धर्माचे कळस आहेत. त्या जिवंत हृदयाच्या महापुरुषाने उभ्या महाराष्ट्रात धर्माच्या नावावर पोट भरणाऱ्यांना उत्तम समाजनिष्ठा कशी असावी याचा धडा दिला. अभंगाच्या रूपाने तसे प्रत्यक्ष आचरण करूनदेखील रूढीरहित खरा धर्म दाखविला. सत्यनिष्ठा कधीही लोभाला बळी पडू दिली नाही. देवभोळेपणाने रूढीपुढे मान तुकवून वेदासारखी ज्ञानवस्तू लोकांत दबून राहू दिली नाही. आपला नम्रपणा म्हणजे भित्रेपणा आहे असे मरेपर्यंतही कुणाला सिद्ध करू दिले नाही. एवढय़ा निर्भय व आत्मवान सत्पुरुषाला जातीच्या नावाने लपविणे किंवा त्याच्या मागे वैषयिक भावनेचे वेड चिकटविणे हे त्या लेखकांनी स्वत:च्या अज्ञानाचे प्रदर्शन करण्यासारखे आहे.’’

हेही वाचा >>> चिंतनधारा : देवभक्ती हा देशसेवेत अडथळा ठरू नये!

‘‘संत तुकारामांसारखे महापुरुष आपल्या काळात कोणत्या मार्गाने क्रांती करतात, हा विषय महत्त्वाचा नसून त्याचा परिणाम पाहणे महत्त्वाचे असते. ती क्रांती टिकणे न टिकणे यावर त्यांच्या मानाचे स्वरूप अवलंबून नसते. संत तुकारामांनी मठस्थापना केली नसतानाही उभ्या महाराष्ट्रात घराघरांतून आपण त्यांचे महत्त्व ऐकतो. यावरून त्यांच्या व्यक्तित्वाची कल्पना येऊ शकते. प्रश्न एकच आहे, त्यांचे चरित्र वाचणे मोठे की त्यांनी सांगितलेले कार्य पुढे चालवणे मोठे? त्यांच्या नावावर वादांची रणे माजवूनच त्यांची अपेक्षा आपल्याला सफल करता येईल का? संतांनी सांगितलेल्या समतावादी भागवत धर्माला उचलून धरले; संत तुकारामांनी वैष्णवांकरिता किंवा वारकऱ्यांकरिता घालून दिलेला धडा जर अमलात आणला तर आजच्या राजकारणापेक्षा किती तरी पटींनी लोकात मोठे कार्य होऊ शकेल.

rajesh772@gmail.com