उच्च शिक्षणात भारतीय ज्ञानप्रणालीचा समावेश करण्याच्या मार्गदर्शक सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने दिल्याचे वाचले. या सूचना वाचल्यावर आपल्या आजवरच्या सामान्य ज्ञानाला धक्के देणाऱ्या काही मुलभूत शंका उपस्थित होतात. त्या अशा –

१. प्रसिद्ध व्याकरणकार पाणिनी, त्याचा विख्यात ग्रंथ ‘अष्टाध्यायी’. पाणिनीचे कार्यक्षेत्र हे भाषा आणि मुख्यतः व्याकरण, असे संस्कृतशी थोडाफार संबंध असलेली व्यक्ती निश्चित सांगेल. पण इथे पाणिनीची ‘अष्टाध्यायी’ आणि पिंगलेचे ‘छंदशास्त्र’ ही दोन्ही चक्क ‘भारतीय गणित : वैदिक काळ ते आधुनिक काळ’ या विभागात क्र.३ आणि क्र.४ वर दिसतात. छंदशास्त्र म्हटले, की ते काव्य रचनेशी संबंधित असल्याची सर्वमान्य समजूत आहे. पण लघु, गुरु अक्षरे, आठ ‘गण’, (य र त न भ ज स म) , प्रत्यय, वर्णवृत्ते, त्यांच्या वेगवेगळ्या रचनेतून निर्माण होणारे वेगवेगळे छंद (भुजंगप्रयात, शार्दुलविक्रिडीत, वसंततिलका इ.) हे सर्व गणित विषयात अंतर्भूत होत असल्याचे बघून आश्चर्य वाटले.

loksatta analysis university grants commission two important decisions regarding phd admissions
विश्लेषण : पीएच.डी. प्रवेशांबाबतच्या दोन निर्णयांचे महत्त्व कोणते? त्यांचे विद्यार्थ्यांना फायदे किती?
course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
pune , aicte, vernacular language
तंत्रशिक्षण संस्थांतील अध्यापनात आता स्थानिक भाषेचा अधिकाधिक वापर… काय आहे महत्त्वाचा निर्णय?
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत

हेही वाचा – कतारमधील आठ ‘कुलभूषण’

२. दुसरा धक्का वैद्यकीय अभ्यासक्रमाबाबत. भारतीय ज्ञानप्रणालीतील वैद्यकीय अभ्यासाच्या शाखांमध्ये – युनानी आणि होमिओपॅथी यांचा समावेश बघून आश्चर्य वाटते. मार्गदर्शक सूचनांच्या उद्देशिकेमध्येच भारतीय ज्ञानप्रणाली कशाला म्हणायचे, ते स्पष्ट केले आहे. त्यानुसार, ‘भारतीय ज्ञान प्रणालीत सर्व योजनाबद्ध रितीने विकसित करण्यात आलेल्या ज्ञानशाखा अंतर्भूत आहेत. या ज्ञानशाखा भारतात प्राचीन काळापासून विकसित झाल्या आहेत. त्यांत येथील आदिवासी समाजासह विविध समाजांच्या अनेक पिढ्यांनी जतन केलेल्या आणि उत्क्रांत होत गेलेल्या ज्ञानाचाही समावेश आहे.’

‘युनानी’ वैद्यक हे मुळात ग्रीक वैद्यकाचा प्रणेता हिपोक्रेटस (आणि गालेन) याच्या शिकवणुकीवर आधारित आहे. पर्शियन – अरेबिक वैद्यकाच्या संस्कारातून विकसित झालेली ही उपचारपद्धती आहे. भारतात मुगल साम्राज्याच्या काळात, त्यांच्या आश्रयाने ती प्रचलित झाली. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) खरेतर युनानी वैद्यकाच्या आधारे व्यवसाय करणाऱ्यांना ‘क्वाक’ म्हणजे ‘भोंदू वैद्य’ म्हणून संबोधते. ‘होमिओपॅथी’ ही इ.स. १७९६ मध्ये जर्मन डॉक्टर सामुएल हन्नेमान याने विकसित केलेली वैद्यक पद्धती. त्यामुळे, या दोन्ही वैद्यक शाखा मार्गदर्शक सूचनांच्या उद्देशिकेत दिलेल्या व्याख्येनुसार ‘भारतीय ज्ञानप्रणाली’चा भाग ठरू शकत नाहीत.

३. खरी कमाल ‘भारतीय खगोलशास्त्र’ या विभागात आहे. तिथे खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांची बेमालूम सरमिसळ केलेली आढळते. ‘भारतीय खगोलशास्त्राची मूलतत्त्वे’ या भागात प्रस्तावनेतच म्हटले आहे – भारतीय ज्योतिषशास्त्राच्या तीन मुख्य शाखा आहेत : १. गणित : खगोलशास्त्र (Astronomy) २. होरा : कुंडलीवर आधारित ज्योतिषशास्त्र (Horoscopic Astrology) आणि ३. संहिता : शकुनापशकुन आणि नैसर्गिक घटना (Omens & Natural phenomenon) !

आश्चर्यचकित झाल्यामुळे यावर अधिक काही भाष्य करणे शक्य नाही!

हेही वाचा – यारी भांडवलशाहीच्या हाती पायाभूत विकासप्रकल्प असणे धोक्याते नाही का ?

४. मार्गदर्शक सूचनांमध्ये असेही म्हटले आहे, की अभ्यासक्रमामध्ये ‘भारतीय ज्ञानपरंपरे’तील (मार्गदर्शक सूचनांमध्ये काही ठिकाणी ‘भारतीय ज्ञानप्रणाली’ च्या ऐवजी ‘भारतीय ज्ञानपरंपरा’ असाही शब्दप्रयोग आहे.) सातत्य – प्राचीन काळापासून ते अलीकडच्या म्हणजे अठराव्या, एकोणिसाव्या शतकापर्यंत – दाखवण्यावर भर दिला जावा. आता हे सातत्य मुळात राहिले असेल, तरच दाखवले जाऊ शकते. भारतीय वैद्यक (आयुर्वेद), कौटिल्याचे अर्थशास्त्र, भारतीय स्थापत्य, भरताचे नाट्यशास्त्र, धातू निर्मिती या सारखी कितीतरी प्राचीन भारतीय शास्त्रे काळाच्या ओघात नष्ट/ मृतप्राय होऊन विस्मृतीत गेली, हा इतिहास आहे. असे असताना, त्यामध्ये ‘सातत्य’ ओढूनताणून कसे दाखवता येईल?

५. या सूचनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काही खास सूचनाही नमूद आहेत. त्यामध्ये म्हटले आहे की :

‘सर्व विद्यार्थ्यांचा भारतीय ज्ञनप्रणालीच्या विविध शाखांचा आधार असलेल्या मूलभूत तत्त्वज्ञानाशी परिचय करून देण्यात यावा.’

भारतीय ज्ञानप्रणालीतील विविध विद्याशाखांना समान रुपाने जोडणारे असे एखादे पायाभूत तत्त्वज्ञान मुळात आहे का, हा संशोधनाचा विषय ठरावा. पुढे असेही म्हटले आहे की : भारतीय ज्ञान व्यवस्थेतील मौखिक परंपरेशी जोडून घेण्यासाठी प्राचीन पद्धतीच्या पाठांतर तंत्राचे एक सराव सत्र उदाहरणासहित दिले गेले तर ते उपयोगी ठरेल.

इथे अर्थातच डोळ्यांपुढे असे दृश्य येते, की एखाद्या गुरुकुल पद्धतीच्या वेद पाठशाळेचे विद्यार्थी एका तालासुरात वैदिक ऋचांचे पारंपारिक पद्धतीने मौखिक पठण – जटापाठ, घनपाठ आदी – करीत आहेत. आणि एकविसाव्या शतकातील आधुनिक ज्ञान शाखांचे विद्यार्थी – पाच टक्के अधिक गुण मिळवण्यासाठी – ते मन लावून ऐकत आहेत.

हेही वाचा – ‘क्वीअर स्टडीज’च्या वैचारिक बळाची न्यायालयात कसोटी..

६. ‘भारतीय ज्ञानप्रणाली’मध्ये ‘ज्ञानाचा हेतू’ या भागात चक्क ‘परा विद्या’ आणि ‘अपरा विद्या’, ऋत, धर्म, यज्ञसंस्था, मानवप्राणी आणि समस्त सृष्टी यांचे परस्परावलंबित्व, त्यातून परस्परांचे जतन, संरक्षण यांची अपरिहार्यता, या संकल्पना मांडल्या आहेत. अर्थात यामध्ये एका अर्थाने भगवद्गीतेचे आध्यात्मिक तत्त्वज्ञानच सर्व विद्यार्थ्यांच्या गळी उतरवण्याचा अट्टाहास असल्याची टीका होऊ शकते.

‘विश्वातले सर्व ज्ञान प्राचीन काळापासून इथे भारतातच उगम पावलेले होते, आणि आहे; ते फक्त काळाच्या ओघात विस्मृत झालेले असून, ते शोधून काढून, पुनरुज्जीवित करण्याचीच काय ती गरज आहे.’ – अशा अद्भुतरम्य भ्रमातून यातील निदान काही सूचना तयार झाल्याचे लक्षात येते. अशाने नवीन शैक्षणिक धोरणानुसार उच्चशिक्षित होणारी भावी पिढी पाश्चात्य ज्ञानाचा (विनाकारण) तिरस्कार करणारी आणि आत्मश्रेष्ठतेच्या भ्रमात रममाण झालेली दिसेल, अशा तऱ्हेची टीका काही शिक्षणतज्ञ आधीच करू लागले आहेत. ‘भारतीय ज्ञानप्रणाली’ या गोंडस नावाखाली – खऱ्या ज्ञानाशी, विज्ञानाशी काहीही संबंध नसलेले, जुने, मृतवत झालेले केवळ ‘प्राचीनत्व’ (Antique) हेच मूल्य असलेले – असे काहीतरी आपण उगीचच भूतकाळाच्या ढिगाऱ्यातून उपसून काढत नाही ना, ते नीट तपासून पहावे लागेल. या मार्गदर्शक सूचना सध्या तरी ‘ड्राफ्ट’च्या स्वरुपात आहेत. तज्ञांनी वेळीच त्यावर आक्षेप नोंदवून, त्यात शक्य तितक्या सुधारणा करून घेण्याची गरज आहे.

(sapat1953@gmail.com)