जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्या पत्नी जेन यांचं ‘ट्रव्हलिंग टु इन्फिनिटी -माय लाइफ विथ स्टीफन’ या पुस्तकाचं परीक्षण २० एप्रिलच्या ‘बुकमार्क’मध्ये प्रसिद्ध प्रकाशित झालं होतं. २००७ साली हे पुस्तक प्रकाशित झालं. स्टीफनबरोबरच्या पंचवीस वर्षांच्या सहजीवनाची समृद्ध पण रंगतदार कहाणी त्यांनी या आत्मचरित्रात सांगितली होती.
त्यानंतर वेळ होती, ती दस्तुरखुद्द स्टीफन यांची. ते आपल्या आयुष्याबद्दल काय सांगतात याची. त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. पुढच्या आठवडय़ात स्टीफन यांचं ‘माय ब्रीफ हिस्ट्री’ हे आत्मकथन प्रकाशित होत आहे. सध्या या पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी चालू असून हार्डकव्हर आवृत्ती अवघी २९९ रुपयांना आगावू नोंदणी केल्यास मिळू शकेल.
तर ते असो. विश्वाच्या निर्मितीमागचं रहस्य उलगडणाऱ्या, ‘अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’सारखं महत्त्वपूर्ण पुस्तक लिहिणाऱ्या, मोटारन्यूरॉन म्हणजे मज्जासंस्थेच्या घातक आजाराशी गेली २१ र्वष झगडणाऱ्या स्टीफन यांनी आता स्वत:चं खाजगी आयुष्य जगासमोर उलगडून दाखवायचा निर्णय घेतला आहे. त्यातून कोणकोणती रहस्यं बाहेर येतात, हा जगभरातल्या वाचकांसाठी औत्सुक्याचा विषय असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फ्रंट शेल्फ
टॉप  ५ फिक्शन
द कॉम्पिटंट ऑथॅरिटी : शोवेन चौधुरी, पाने : ४६२४९५ रुपये.
कर्नाज वाइफ – द आऊटकास्टस क्वीन : कविता काणे, पाने : २९५२९५ रुपये.
द कॉर्नर ऑफिस : आशुतोष गर्ग, पाने : २०८१९५ रुपये.
द लास्ट रेफ्युज : बेन को, पाने : ४००३९९ रुपये.
ऑल दॅट इज : जेम्स साल्टर, पाने : ३०४५९९ रुपये.
टॉप  ५ नॉन-फिक्शन
अखिलेश यादव- विन्डस ऑफ चेंज : सुनीता अ‍ॅरॉन, पाने : ६१४६९५ रुपये.
मुघल-ए-आझम- लिजंड अ‍ॅज एपिक : अजय झणकर, पाने : २०८२५० रुपये.
पाकिज़ा- ओड टू अ लॉस्ट एरा : मेघनाद देसाई, पाने : १६०/२५० रुपये.
डेरेक चॅलेंज-फॉर अ स्मार्टर, शार्पर अँड मोअर कॉन्फिडंट यू : डेरेक ओब्रीएन, पाने : १४४१५० रुपये.
द डेव्हिल दॅट नेव्हर डाइज : डॅनिअल जोनाह गोल्डहेगेन, पाने : ४३२११६ रुपये.
सौजन्य – फ्लिपकार्ट.कॉम

मराठीतील सर्व वार्ता ग्रंथांची बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Short history of hong kong my brief history by stephen hawking
First published on: 07-09-2013 at 01:02 IST