जोखीम पातळीनुसार विम्याच्या संरक्षणाचे स्वरूप आणि हे संरक्षण देणे विमाप्रदात्या कंपनीलाही महाग पडू नये असे त्याचे दर ठरविणाऱ्या मूल्यमापनाची एक विमागणिती पद्धत आहे. ‘अ‍ॅक्च्युरिअल सायन्स’ नावाने विकसित असे हे शास्त्रच आहे. त्यात पारंगत असलेल्या देशातील पहिल्या पिढीतील काही मोजक्या मंडळींमध्ये जगदीश साळुंखे यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. त्यांच्या या तज्ज्ञतेमुळेच देशातील सर्वात मोठय़ा विमा कंपनीचे अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) अध्यक्षपदापर्यंत ते पोहोचू शकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईतील सिडनहॅम वाणिज्य महाविद्यालयातून साळुंखे यांनी पदवी घेतली. म. गो. दिवाण (जे पुढे एलआयसीचे अध्यक्षही बनले) यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनाने त्यांनी अकाऊंट्सऐवजी अ‍ॅक्च्युरिअल सायन्स हा विषय जाणीवपूर्वक निवडला. पुढे साळुंखे यांनी लंडनच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅक्च्युअरीज’ची फेलोशिप मिळवली. त्या काळी विमागणिती बनायचे तर लंडनमधील या संस्थेची परीक्षा पास करण्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे नव्हता. त्या वेळी एलआयसीच्या अध्यक्षपदी अ‍ॅक्च्युरिअल फेलो (एफआयए)ची वर्णी लागण्याचाच प्रघात होता आणि त्यातील बहुतेक हे दिवाण यांचेच शिष्य होते. किंबहुना पहिल्या पिढीतील (साठीच्या दशकात अगदी शंभराच्या घरात भरतील इतके) भारतीय अ‍ॅक्च्युअरीज हे बहुतांश मराठीच होते.

मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former lic president jagdish salunkhe profile
First published on: 20-06-2018 at 01:01 IST