जगभरात पोकेमॉन गोया गेमच्या नादात काहींनी आपला जीव गमावला तर अनेक जण हा गेम खेळण्यासाठी रात्री अपरात्री रस्त्यावर चालू लागलेत. जगभरातील तंत्रप्रेमींना अशी भुरळ घालणारा गेम ज्या ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीच्या भक्कम पायावर उभा आहे तो पाया रचणाऱ्यांत एका भारतीयाचे नाव अग्रेसर आहे. इतकेच नव्हे तर सहावी संवेदना (सिक्स्थ सेन्स), परिधेय उपकरणांसाठीचे आवश्यक तंत्रज्ञान असे एक ना अनेक तंत्रविष्कार जे आज आपण अनुभवत आहोत, वापरत आहोत या सर्वाचा पायाही त्याने रचला आहे. अवघ्या वयाच्या पस्तीशीत त्याने जगभरातील बडय़ा कंपन्यांना त्याच्यावर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय ठेवला नाही. या भारतीयाचे नाव प्रणव मिस्त्री. 

सर्वप्रथम हे नाव २००९ मध्ये जगासमोर आले. मसाच्युसेट्स तंत्रविद्यापीठातील ‘एमआयटी लॅब’मध्ये सुरू असलेल्या सिक्स्थ सेन्सच्या संशोधनात या तरुणाने भरीव कामगिरी करत या प्रयोगाला मूर्त स्वरूप दिले. त्याच्या या कामगिरीसाठी प्रणवची निवड एमआयटी लॅबच्या सवरेत्कृष्ट ३५ संशोधकांमध्ये झाली. या प्रयोगाचे फलित काय असेल हे सांगत असताना प्रणवने आपल्या दोन्ही हाताचा अंगठा आणि पहिले बोट यात एक तंत्रज्ञानाधारित टोपी घातली.. त्याच्या गळ्यात पदकासारखे एक उपकरण होते आणि दोन्ही हातांच्या दोन-दोन बोटांत छोटय़ा टोप्या. या चार बोटांचा आयत करून छायाचित्र टिपले! तेव्हाच त्याने परिधेय तंत्रज्ञानाबाबत भाकीत केले होते. याच काळात प्रणवने तयार केलेल्या ‘स्पर्श’ या तंत्रज्ञानाची जगभरात चर्चा होती. ‘स्पर्श’मध्ये कॉपी-पेस्टऐवजी टच अ‍ॅण्ड पेस्टची संकल्पना असून उपकरणातील माहिती आपण दुसऱ्या उपकरणात आपल्याच हाताच्या बोटाने (अर्थात तंत्रज्ञानाचे अंगुस्तान घालून) घेऊ शकत होतो. जगभरातील बडय़ा कंपन्यांनी त्याला आपल्याकडे काम करण्याची गळ घातली. प्रणवने मायक्रोसॉफ्ट, गुगल, सीएमयू, नासा अशा विविध ठिकाणी आपल्या संशोधनाचा ठसा उमटवला व २०१२ पासून तो सॅमसंगमध्ये रुजू झाला. प्रणव सध्या सॅमसंगच्या संशोधन विभागाचा जागतिक अध्यक्ष आहे. सॅमसंग गिअर स्मार्टवॉच हे त्याने स्वतंत्रपणे विकसित केलेले उत्पादन. त्याच्या नावावर दहापेक्षा अधिक संकल्पनांचे स्वामित्व हक्कआहेत. अर्थात हे स्वामित्व हक्क त्याने केवळ व्यावसायिक संशोधनांसाठीच घेतले.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
indian air force
युद्ध, मदत व बचावकार्य या आघाड्यांवर भारतीय हवाई दल किती कार्यक्षम? ’गगन शक्ती २०२४‘ कवायतीने दिले उत्तर!
chandrachud (1)
“लैंगिक भेदभाव संपवा, स्त्रियाही खोल समुद्रात जाऊ शकतात”, कोस्ट गार्डप्रकरणी सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले

गुजरातमधील पालनपूर गावात वास्तुरचनाकार आणि टेक्नोक्रॅट असलेले कीर्ती मिस्त्री आणि नयना यांच्या घरात १४ मे १९८१ रोजी प्रणवचा जन्मला. शालेय शिक्षण याच गावात पूर्ण केल्यानंतर त्याने वास्तुरचनाकार पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला. मात्र तेथे तो नापास झाला. पण खचून न जाता त्याने गुजरात विद्यापीठात संगणक अभियांत्रिकी शाखेत पदवी मिळवली. यानंतर २००३ ते २००५ या कालावधीत आयआयटी मुंबईतील आयडीसीमध्ये त्याने अभिकल्पाचे शिक्षण घेतले. आयडीसीमधील शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने अमेरिकेत एमआयटी लॅबमध्ये पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी शिक्षण पूर्ण केले. त्याचे शंभरहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध आहेत.