09 April 2020

News Flash

मानव आणि मुंग्याची युद्धनीती

प्रशिक्षित सनिक ज्यांच्याकडे चांगली हत्यारे, शष्टद्धr(२२९ो असत त्यांना मागे ठेवत. मानवी लष्कर हे शत्रूपक्षास दमवून नामोहरम करीत. त्यांची एक एक फलटण उद्ध्वस्त करीत चढाई करीत.

| August 13, 2013 08:36 am

प्रशिक्षित सनिक ज्यांच्याकडे चांगली हत्यारे, शष्टद्धr(२२९ो असत त्यांना मागे ठेवत. मानवी लष्कर हे शत्रूपक्षास दमवून नामोहरम करीत. त्यांची एक एक फलटण उद्ध्वस्त करीत चढाई करीत. एकाचवेळी पूर्ण ताकदीनिशी लढाई करणे टाळत असते. हीच पद्धत  भक्ष्यार्थी मुंग्या वापरतात. असा हल्ला करीत असताना ह्य मुंग्या स्वत:च्या क्षेत्राचे, घराचे आणि अन्नसाठय़ाचे सुद्धा संरक्षण करतात.

‘जीवो जीवस्य जीवनम्’ ह्या उक्तीप्रमाणे सजीव निसर्गात आपले स्थान अबाधित राखण्याचा प्रयत्न करतो. हे करीत असताना ते स्वत:मध्ये योग्य तो बदल करून घेतात. तरीही काही प्रजाती लुप्त झाल्या, काही होण्याच्या मार्गावर आहेत. ज्या प्रजातींनी ही निसर्गाची नीति योग्य रितीने अवलंबली त्यांचे वर्चस्व नक्कीच राहिले आहे. त्यामध्ये मानव सर्वात वरचढ ठरतो, पण त्याच्याकडे असलेला मेंदू हेच त्याच्या प्रगतीचे व वर्चस्वाचे कारण आहे. निसर्गात असे प्राणी, पक्षी, किडे, कीटक आहेत की त्यांची विशिष्ट कला मानवाइतकी समृद्ध तर आहेच किंवा त्याहीपेक्षा वरचढ आहे; तेही फारच छोटया मेंदूच्या आधारे हे विशेष ! त्यांनी ती कला शिकण्यासाठी कुठे क्लास लावला नाही, की महाविद्यालयात गेले नाहीत. त्यांनी स्वत:च्या अनुभवावरुन स्वत:मध्ये योग्य तो बदल करून अशा कला विकसित केल्या. आपणास मुंग्यांविषयी विशेष करून आदर आहे; त्यांच्यामध्ये असलेल्या गुणामुळेच, होय ना ? त्यांची सतत कामात राहण्याची वृत्ती, शिस्तबद्धता, चिकाटी हे गुण वाखाणण्याजोगे आहेत. त्यांच्यामधील वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य सुदृढ राखण्याची कला, अन्न व्यवस्थापन, स्वसंरक्षण करण्याची कला हेही महत्त्वाचे गुण आहेत.
कोणताही सजीव प्राणी त्याच्या अस्तित्वासाठी काही वेळा युद्धाचा मार्ग अवलंबतो. मग ते मानव, प्राणी, किडे, मुंग्या ह्यामध्येही असू शकते. त्यासाठी प्रत्येकाची युद्धनीती वेगवेगळी असते. त्यात मानव हा सर्वात वरचढ आहे हे नाकारता येत नाही. परंतु मुंग्या ह्या मानवाच्या तोडीस तोड अशी युद्धनीती वापरतात असे आढळून आले आहे. मुंग्या ह्या शरीराने, मेंदूने मानवापेक्षा नक्कीच लहान असल्याने त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. तरीही त्या युद्धनीतीत पारंगत कशा बनल्या हे एक कोडेच आहे. ह्यामध्ये गोरिला, चिपांझी हे प्राणी मागे पडले आहेत. अलिकडे संशोधनातून असे आढळून आले आहे की मानवाची युद्धाची तयारी, व्यवस्थापन, त्याची अंमलबजावणी करण्याची पद्धत मुंग्यांच्या युद्धनीतीशी सुसंगत आहे. तसेच युद्ध कधीपर्यन्त चालू ठेवायचे याचे लष्करी डावपेच व निर्णय घेण्याची पद्धत अचंबित करण्यासारखी दिसून आली. मानव आणि मुंगी ह्यामध्ये युद्धनीतीतील साम्य असले तरी सामाजिक आणि जैविक फरक मात्र नक्कीच आढळतो. मुंग्यांच्या वसाहतीत मोठया प्रमाणात कामकरी, सनिकी मुंग्या असतात. काही प्रमाणात नर मुंग्या असतात. तर तेथे राणी मुंगी देखील असते. अशा वसाहतीत राणी मुंगी केंद्रस्थानी असते कारण ती मुंग्यांना जन्म देते. परंतु ती कामकरी व सनिकी मुंग्याचे नेतृत्व करेल असे नाही. मानवाची आणि मुंग्यांची जीवनपद्धती वेगळी असली तरी ते आपल्या शत्रूवर हल्ला करण्याचे कारण जवळपास सारखेच असते. त्यामध्ये विशेषकरून जागेच्या प्रश्नाबाबत. अन्न आणि कामगारांसाठी त्यातही काही मुंग्यांना बंदिस्त करून त्यास गुलाम करण्यासाठीही युद्ध केले जाते.
आशियाई सनिकी मुंग्या, आफ्रिकी सनिकी मुंग्या आणि लुटमार करणाऱ्या मुंग्या अशा विविध मुंग्या आढळतात. सनिकी मुंग्यांची फळी ही प्राचीन सुमेरियन काळापासून आतापर्यंत सनिकाच्या फळीसारखीच आढळून आली. त्यांची आक्रमण करण्याची पद्धत सारखीच आढळते. ज्याप्रमाणे मानवी सनिकाची तुकडी संचलन करते त्याचप्रमाणे सनिकी मुंग्या ह्या कोरडया जमिनीवरून पथ संचलन करतात. त्या गनिमी काव्याची पद्धत वापरतात. त्यासाठी त्या पानाच्या निमुळत्या टोकावरून योग्य अशी शक्कल लढवतात आणि शत्रुपक्षास नामोहरम करतात. त्यांच्या वसाहतीतील काही कामकरी मुंग्या अन्नाच्या शोधात आजूबाजूच्या परिसरात जातात, त्याचबरोबर त्या टेहळणीसुद्धा करतात. ह्या मुंग्या परत येत असताना ‘फेरमोन’ हे रसायन सोडतात त्यामुळे त्यांना परत तेथे जाणे सोपे जाते. त्या रसायनाच्या मदतीने सनिकी मुंग्यांची तुकडी त्यांच्यामागे तनात असते. अशा रितीने त्या शत्रूपक्षावर अधिक वेगाने चढाई करतात.
अशा भक्ष्यार्थी फिरणाऱ्या किंवा धाड घालणाऱ्या मुंग्या ह्या एका रांगेत असून त्या एका सनिकी फळीप्रमाणे येण्यासाठी त्यांच्या संख्येनुसार पसरतात. त्यामुळे त्यांची लढण्याची क्षमता वाढते व कमी मुंग्यांची गरज भासते. पहिली फळी कमी शक्तिशाली मुंग्यांची असून त्या लगेचच शत्रूपक्षावर तुटून पडतात. त्यामध्ये बऱ्याच मुंग्या मृत्युमुखी पडतात. ह्यांच्या मागे अधिक क्षमतेच्या उच्च प्रतीच्या सनिकी मुंग्यांची फळी असते. त्यांच्यातील  पहिली फळी ढासळली की त्या मदानात उतरतात. त्या अतिशय प्राणनाशक असून कमी प्रतीच्या मुंग्यांपेक्षा पाचशे पट अधिक शक्तिशाली असतात. पूर्वीच्या काळी मानव युद्धामध्ये अशीच युद्धनीती वापरत असे. त्यासाठी गुलाम, मजूर आणि शेतकरी यांना लष्करात भरती करून घेत, तेही स्वस्तात. त्यांची सनिकाची फळी तयार करून सर्वात पुढे ठेवत असत. तसेच उत्तम, प्रशिक्षित सनिक ज्यांच्याकडे चांगली हत्यारे, शष्टद्धr(२२९ो असत त्यांना मागे ठेवत. मानवी लष्कर हे शत्रूपक्षास दमवून नामोहरम करीत. त्यांची एक एक पलटण उद्ध्वस्त करीत चढाई करीत. एकाचवेळी पूर्ण ताकदीनिशी लढाई करणे टाळत असत. हीच पद्धत  भक्ष्यार्थी मुंग्या वापरतात. असा हल्ला करीत असताना ह्या मुंग्या स्वत:च्या क्षेत्राचे, घराचे आणि अन्नसाठ्याचे सुद्धा संरक्षण करतात.
गुलाम असणाऱ्या मुंग्या उत्तम योद्धा असतात. गुलाम असलेल्या मुंग्या ह्या मुंग्यांच्या वसाहतीतील मुंग्यांना चोरून आपल्या घरात वाढवतात. त्यामुळे त्यांची संख्या त्या वसाहतीतील इतर मुंग्यांपेक्षा अधिक होते. वसाहतीतील मुंग्या प्रतिस्पर्धी मुंग्यांना गुलाम करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. त्यातच गुलाम मुंग्या वसाहतीतील मुंग्यांना चुकीचा मतप्रचार करून गोंधळात टाकतात. गुलाम हे स्वत चांगले योद्धा असल्यामुळे विजय निश्चित झाला असे भासवतात. ह्या गुलाम मुंग्या वसाहतीस वेढा देतात आणि शत्रूपक्षास स्वारी करण्यास प्रवृत्त करतात, तसेच त्यांच्या विरुद्ध लढाही देत नाहीत. वसाहतीतील एक महिना वयाच्या मुंग्या शत्रूशी
युद्ध करतात. एक आठवड्याच्या मुंग्या इकडून तिकडे पळतात. तर एक दिवसाच्या मुंग्या मेल्यासारखे पडून राहतात. अशा रीतीने गुलामाने शत्रूशी हातमिळवणी केल्याने वसाहतीतील मुंग्या भक्ष्यस्थानी पडतात आणि शेवटी
लढाई हरतात.
सनिकी मुंग्यांप्रमाणे विणकर मुंग्याही शत्रूस नामोहरम करतात. विणकर मुंग्या ह्या ठराविक क्षेत्रात फेरेमोन हे द्रव सोडून शत्रूस मारण्यास इशारा देतात. जेव्हा त्या युद्धातून परत येतात तेव्हा स्वत:च्या शरीरास जोरात झटका देऊन जवळून जाणाऱ्या मुंगीस युद्ध चालू असल्याचा इशारा देतात. त्याचवेळी ते वेगळा गंध वाटेवर सोडून इतर मुंग्या युद्धस्थळी पोहोचतील असे नियोजन करतात. प्रत्येक वसाहतीतील मुंग्या ह्या विशिष्ट वासाने एकमेकास ओळखतात. त्यांच्या वसाहतीत त्यांची संख्या काही शतकापासून ते लाखापर्यंतची असते. त्यांच्यातील वाद कधी मिटत नसल्याने असे युद्ध कधी संपत नाही, ते शतकानुशतके चालू राहते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2013 8:36 am

Web Title: war strategies of human and ants
टॅग Human,Science 2
Next Stories
1 मेंदू आणि संगणकाच्या मिलाफाने क्रांती!
2 सेगवे ट्रान्सपोर्टर
3 क्युरिऑसिटी लँडरची वर्षपूर्ती
Just Now!
X