साहित्य :

Untitled-1
भरलेली कारली

* ५ ते ६ कारली,
* अर्धी वाटी शेंगदाणे,
* अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस,
* अर्धी वाटी ड्राय फ्रॉन्स,
* तव्यावर थोडय़ाशा परतलेल्या ४ ते ५ लाल सुक्या मिरच्या,
* मीठ चवीनुसार.
कृती :
कारल्याची साले काढून व त्याला चिर मारून बिया व गर काढून टाकावा. थोडय़ाशा हळद व मिठाच्या पाण्यात बुडवून ड्राय फ्रॉन्स मिरची, मीठ चवीनुसार टाकून जाडसर करून मिक्स करून घ्यावे. हे मिश्रण कारल्यामध्ये भरून एका काचेच्या बाऊलमध्ये ठेवून त्यावर थोडेसे पाणी शिंपडून मायक्रो हायवर १० मिनिटे ठेवावी.

बिटाची कोशिंबीर

बिटाची कोशिंबीर
बिटाची कोशिंबीर

साहित्य :
* १ वाटी ताक, ल्ल ३ ते ४ हिरवी मिरची,
* ३ ते ४ कडीपत्ता, ल्ल जिरे अर्धा चमचा.
कृती :
बिटाचा कीस करून घ्यावा. एका काचेच्या भांडय़ात बिटाचा कीस, कांदे, हिरवी मिरची बारीक चिरलेली, जिरे व कडीपत्ता टाकून मायक्रो लोवर ८ मिनिटे ठेवावी. बाहेर काढून त्यात एक वाटी ताक मिक्स करून मायक्रो लोवर ३ ते ४ मिनिटे ठेवावी. ही कोशिंबीर साध्या भाताबरोबरही चांगली लागते.

शेवगाच्या शेंगाचा कोळ

शेवगाच्या शेंगाचा कोळ
शेवगाच्या शेंगाचा कोळ

साहित्य :
* ५ ते ६ शेवग्याच्या शेंगा, ल्ल २ कांदे बारीक चिरलेले,
* अर्धी वाटी बारीक खोबर, ल्ल २ ते ३ चिंचेचा कोळ,
* बारीक साखर, ल्ल ४ ते ५ हिरव्या मिरच्या,
* १ वाटी ओले काजू, ल्ल २ चमचे तेल.
कृती :
शेवगाच्या शेंगा गॅसवर उकडून घ्याव्यात. काचेच्या एका बाऊलमध्ये तेल टाकून कांदा, ओले खोबरे, चिंचेचा कोळ, साखर, हिरवी मिरची चिरलेली मायक्रो मिडीयमवर ५ मिनिटे ठेवावे. या मिश्रणात शिजवलेल्या शेवगाच्या शंगा व ओले काजू टाकून गरम गरम सव्‍‌र्ह करावे.

पेरूची भाजी

पेरूची भाजी
पेरूची भाजी

साहित्य :
*  ३ ते ४ पेरू, ल्ल अर्धा चमचा बडीशेप,
*  अर्धा चमचा मिरी पावडर, ल्ल अर्धा चमचा जाड तिखट,
*  अर्धा चमचा आमचूर पावडर, ल्ल अर्धी जुडी कोथिंबीर,
*  बारीक चिरलेली, ल्ल मीठ चवीनुसार,
* २ चमचे तेल.
कृती :
पेरूचे बारीक तुकडे करून घ्यावेत, एका काचेच्या बाऊलमध्ये तेल टाकून त्यात जाड तिखट मिरपूड, आमचूर, बडीशेप, मायक्रो हायवर ३ मिनिटे ठेवावे त्यात पेरूचे छोटे तुकडे, कोथिंबीर टाकून मायक्रो हायवर ३ मिनिटे ठेवावे.
हे हॉट सॅलाड म्हणून सव्‍‌र्ह करता येते. तसेच थंडसुद्धा सव्‍‌र्ह करता येते.

स्टफ टोमॅटो

स्टफ टोमॅटो
स्टफ टोमॅटो

साहित्य :
* १ १/२ किलो टोमॅटो एकाच साइजचे,
* एक वाटी हिरवे वाटाणे, ल्ल एक चमचा जिरा,
* एक चमचा बडीशेप, ल्ल २ चमचे जाडसर तिखट,
* मीठ चवीनुसार, ल्ल ४ चमचे तेल.
कृती :
टोमॅटोची वरून चकती काढून आतला गर काढून घ्यावा. एका काचेच्या भांडय़ात तेल, जिरा, बडीशेप, जाडसर तिखट, मीठ टाकून मायक्रो लोवर चार ते पाच मिनिटे ठेवावे. त्यातच हिरवे वाटाणे टाकून मिश्रण मिक्स करून घ्यावे व मायक्रो हायवर ३ ते ४ मिनिटे ठेवावे. या मिश्रणात टोमॅटोचा काढलेला गर मिक्स करावा व मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावे. हे मिश्रण गर काढलेल्या टोमॅटोमधून काचेच्या पसरट भांडय़ात ठेवावे. मायक्रो लोवर ५ ते ६ मिनिटे ठेवावे.

कोबी, सफरचंद भाजी

कोबी, सफरचंद भाजी
कोबी, सफरचंद भाजी

साहित्य :
* १ मीडिअम कोबी बारीक चिरलेला,
* हिरवी मिरची बारीक चिरलेली,
* कोथिंबीर अर्धी जुडी बारीक चिरलेली,
* अर्धा लिंबू,
* एक चमचा साखर,
* अर्धा चमचा हिग्ां,
* ३ ते ४ चमचे तेल,
* मीठ चवीनुसार,
* सफरचंद ३ ते ४.
कृती :
लांबट व तिरपा असा कोबी चिरून घ्यावा. एका काचेच्या बाऊलमध्ये अर्धा लिटर पाणी टाकून मायक्रो हायवर ५ मिनिटे ठेवावा. एका काचेच्या बाऊलमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, हिंग, मीठ, टाकून मायक्रो लोवर २ मिनिटे ठेवावे.
त्यात कोबी निथळून टाकावा व सफरचंदाचे छोटे तुकडे टाकून मायक्रो लोवर ३ मिनिटे ठेवावे. बाहेर काढल्यानंतर लिंबू ज्यूस साखर टाकून मिक्स करून सव्‍‌र्ह करावे.
response.lokprabha@expressindia.com