खालील आकृतीत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांचे प्रमाण दर्शवले आहे. ते अभ्यासून खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
प्रवेश घेतलेले विद्यार्थी- ८५५०
15-tab01
उत्तीर्ण झालेले विद्यार्थी- ५७००
15-tab02
* पी या संस्थेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे, प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांशी असलेले प्रमाण किती?
१) ९ : ११ २) १४ : १७ ३) ६ : ११ ४) ९ : १७
स्पष्टीकरण : पी या संस्थेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांशी असलेले प्रमाण
15-tab3
मित्रांनो, डेटा इंटरप्रिटेशन या घटकावर परीक्षेत जे प्रश्न विचारले जातात, त्यात शक्यतो जास्त आकडेमोड नसते हे लक्षात ठेवावे.
(पूर्वपरीक्षा)- सोंगटय़ा (DICE)
मित्रांनो, प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये सोंगटय़ांच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात. यात सोंगटय़ांची वेगवेगळी स्थिती देऊन समोरचे अंक किंवा विरुद्ध बाजूचे अंक किंवा तळाकडील अंक काढा असे प्रश्न विचारले जातात. जर प्रश्नांमध्ये अंकाऐवजी बिंदू दिलेले असतील तर सर्वप्रथम त्या बिंदूचे रूपांतर अंकामध्ये केल्यास कमी वेळात प्रश्न सोडवणे शक्य होते. खऱ्या सोंगटय़ांमध्ये समोरासमोरील अंकाची बेरीज सात असते. मात्र, प्रत्येक वेळी प्रश्न विचारताना या गोष्टीचा विचार करून प्रश्न तयार केलेला असेल असे नाही. आज आपण सोंगटय़ांवरील काही प्रश्न समजून घेणार आहोत.

खालील आकृतीत ६ अंकाच्या विरुद्ध बाजूस कोणता क्रमांक असेल?
box01
१) ४ २) १ ३) २ ४) ३
* खालील आकृतीत दोन सोंगटय़ा दर्शवलेल्या आहेत. जर १ हा अंक सोंगटीच्या वरच्या बाजूला असेल तर सोंगटीच्या खालच्या बाजूला कोणता अंक असेल?
box02
१) ३ २) ५ ३) २ ४) ६
* खालील आकृतीत दोन सोंगटय़ा दर्शवलेल्या आहेत. जर ४ हा अंक सोंगटीच्या खालच्या बाजूला असेल तर सोंगटीच्या वरच्या बाजूला कोणता अंक असेल?
box03
१) ५ २) १ ३) २ ४) ६
* खालील आकृतीत दोन सोंगटय़ा दर्शवल्या आहेत. जर २ बिंदू सोंगटीच्या खालच्या बाजूला असतील तर सोंगटीच्या वरच्या बाजूला किती बिंदू असतील?
box04
१) २ २) ५ ३) ३ ४) ६
* खालील आकृतीत दोन सोंगटय़ा दर्शवल्या आहेत. जर २ बिंदू सोंगटीच्या वरच्या बाजूला असतील तर सोंगटीच्या खालच्या बाजूला किती बिंदू असतील?
box05
१) ६ २) ५ ३) ४ ४) १
* खालील आकृतीत २ ठोकळे दर्शवलेले आहेत, जेव्हा ५ अंक हा वरच्या बाजूला असेल तर पृष्ठभागास कोणता अंक असेल?
box06
१) १ २) २ ३) ३ ४) ४