या सणात डिजिटल खात्यासह कोणतीही चिंता न करता करा खरेदी

मोकळ्या मनाने #DilKholKar साजरं करताना डिजिटल बँक अकाऊंटच्या सुरक्षिततेचा आनंद घ्या!

airtel payment bank
मोकळ्या मनाने #DilKholKar साजरं करताना डिजिटल बँक अकाऊंटच्या सुरक्षिततेचा आनंद घ्या

सणांचा हंगाम आला असून, करोनानंतर साजरे होणारे सण सर्वांसाठी विशेष आहेत. कारण आता खरेदी करताना, खाताना, प्रियजनांना भेटताना किंवा प्रवास करताना कोणतेही निर्बंध नाहीत. आपल्याकडे असणारे चांगले कपडे परिधान करुन मिरवण्याचा हा हंगाम आहे. मग ते मित्रांना भेटणे, रोड ट्रिप अथवा लक्झरी स्टेकेशन असो. चवीचा आनंद घेत जेवण्याची किंवा ऑर्डर देण्याचीदेखील ही वेळ आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

आपण सर्वजण #DilKholKar साजरा करत असताना आपल्या मनात सुरक्षित पद्धतीने व्यवहार करणं ही एकमेव भीती आहे. पण जर तुम्हाला कोणतीही चिंता न बाळगता व्यवहार करायचा असेल तर ‘एअरटेल पेमेंट बँक’ हा सर्वोत्तम पर्याय आहे. भारतातील खऱ्या अर्थाने डिजिटल बँक असणारी ‘एअरटेल पेमेंट बँक’ तुम्हाला ‘एअरटेल सेफ पे’ सहित अतिरिक्त सुरक्षा प्रदान करते. येथे तुमच्या संमतीशिवाय तुमच्या खात्यातून पैसे अजिबात बाहेर जात नाहीत.

नेहमी सुरक्षित व्यवहारावर अवलंबून राहा

दुकानं, रेस्तराँ किंवा डिलिव्हरी एजंट्सकडे ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने खर्च करताना, तसंच अनेक व्यवहार करताना जेव्हा कार्ड स्वाइप करण्याची वेळ येते तेव्हा हा व्यवहार सुरक्षित आहे की नाही असा विचार मनात येणं अनेकदा तणाव निर्माण करतं. सुरक्षा हा आपल्या सर्वांसाठीच चिंतेचा विषय आहे. त्यामुळेच ‘एअरटेल पेमेंट्स बँके’त खातं उघडण्याचा विचार करणं एक चांगली कल्पना आहे. येथे अत्यंत पारदर्शक, सुरक्षित आणि अविरतपणे सेवा मिळते. ‘एअरटेल थँक्स अॅप’च्या मदतीने तुम्ही फक्त एका व्हिडीओ कॉलच्या सहाय्याने खातं उघडू शकता. या प्रक्रियेत कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही.

या सणाच्या हंगामात डिजिटल बँक खातं मिळवा

आधीपासूनच पारंपारिक बँकेत आपलं बचत खातं असताना दुसऱ्या एकदा खात्याची आवश्यकता आहे का असा विचार तुम्ही करत असाल? पण तुमची सुरुवात असेल तर एकापेक्षा जास्त खाती असणं मदतशीर ठरु शकतं. कारण यामुळे तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन चांगल्या प्रकारे करु शकता, तसंच बचत आणि होणारा खर्च यांची गुंतागुंत होत नाही. डिजिटल बँक खातं आणि खासकरुन ‘एअरटेल पेमेंट्स बँक’ तुमचे व्यवहार सुरक्षित तसंच पारदर्शक ठेवतं. मग आपलं दुसरं खातं सुरु करण्यासाठी सणासुदीच्या हंगामापेक्षा योग्य वेळ कोणती असेल? हॉटेलमधील बुकिंग, शेवटच्या क्षणी स्नॅक्सची ऑर्डर किंवा मग ऑनलाइन सेलचा आनंद लुटणं असो, ‘एअरटेल पेमेंट्स बँक’चा वापर करतच व्यवहार करा. याची सुरक्षा वैशिष्ट्ये तुमच्या बँक खात्याते तपशील घोटाळेबाजांपासून सुरक्षित ठेवतात.

एअरटेल पेमेंट्स बँकेच्या सुविधा

साडे पाच कोटींहून अधिक ग्राहक उपभोग घेत असलेली ‘एअरटेल पेमेंट्स बँक’ ग्राहकांसाठी बँकिंग अधिक सहज, सोयीस्कर करण्याच्या हेतूने अनेक महत्त्वाच्या आर्थिक सेवा प्रदान करते. दरम्यान, ऑनलाइन पेमेंटसाठी सर्वात सुरक्षित मार्ग असणारं ‘एअरटेल सेफ पे’ हे गोंधळमुक्त वैशिष्ट्य आहे. यामुळे तुम्हाला संभाव्य फसवणुकीची चिंता न करता खर्च करता येतो. एअरटेलचा हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, कारण भारताने डिजिटल फर्स्ट वृत्ती अवलंबली आहे, मग ते मिलेनियल असोत, जनरेशन झेड किंवा जुनी पिढी असो.

जलद, विना अडथळा व्यवहारांचा आनंद घ्या

वेगाच्या बाबतीतही ‘एअरटेल पेमेंट्स बँक’ प्रभावी ठरते. तुम्ही नियोजित केलेल्या कोणत्याही आनंददायी गोष्टींमध्ये अडथळा न आणता व्यवहार करण्यास तुम्हाला सक्षम करते. ‘एअरटेल पेमेंट्स बँक’मध्ये मानवी चुकांची शक्यता फार कमी असल्याने तुम्हाला मदत होतेच, पण हा डिजिटल प्लॅटफॉर्म एकाच वेळी अनेक विनंत्यांची पडताळणी करत त्यांच्यावर प्रक्रिया सुरु करतो.

‘एअरटेल पेमेंट्स बँके’त फसवणुकीला आळा घालणारे सुरक्षा उपाय असून कोणत्याही घोटाळा किंवा हँकिंगच्या प्रयत्नापासून तुमचा बचाव करते. तुमच्या खात्यातून काही संशयास्पद व्यवहार झाल्यास अलर्ट मिळेल याचीही खात्री असल्याने तुम्ही निश्ंचित राहू शकता.

त्यामुळे पुढच्या वेळी खरेदी, ऑनलाइन जेवणाची ऑर्डर, गिफ्ट, प्रवासावेळी जास्त खर्च झाल्यास किंवा सणासुदीत सहभागी व्हाल तेव्हा ‘एअरटेल पेमेंट्स बँके’सह #DilKholKar करा.

मराठीतील सर्व प्रायोजित बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-10-2022 at 13:24 IST
Next Story
यंदाच्या दिवाळीत JioMart ‘बेस्टिव्हल’चा जास्तीत जास्त फायदा घ्या!
Exit mobile version