भारतीयांनी नेहमीच तीन गोष्टींवर विश्वास ठेवला आहे. ज्योतिष, बॉलिवुड आणि क्रिकेट. यापैकी बॉलिवुड आणि क्रिकेट या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी भारतीयांना काही ना काही मार्ग होता. पण ऑनलाईन ज्योतिष क्षेत्रात अशी संधी उपलब्ध नव्हती. आणि तिथेच जगातली सर्वात मोठी ज्योतिष कंपनी उभी करण्याची संधी अ‍ॅस्ट्रोटॉकला दिसली. गेल्या चार वर्षांत अ‍ॅस्ट्रोटॉकनं २ कोटी ग्राहकांना सेवा दिली आहे आणि दिवसाला तब्बल ४१ लाख रुपयांचा नफा कमावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वरवर असं दिसतं की ज्योतिषासाठी बरीच मागणी असताना अशा प्रकारे ज्योतिषचा व्यवसाय सुरू करणं हा एक चांगला निर्णय होता. पण खरंतर अ‍ॅस्ट्रोटॉक हाच मुळात एका ज्योतिषानं वर्तवलेल्या भाकिताचा परिणाम आहे!

आपण भविष्यात काय करायचं आहे, याविषयीही कोणता निश्चित अंदाज नसणाऱ्या एका अभियंत्याला एका ज्योतिषानं हा व्यवसाय सुरू करून लक्षाधीश बनण्याचा सल्ला दिला. तो अभियंता म्हणजे अ‍ॅस्ट्रोटॉकचे संस्थापक पुनीत गुप्ता! पाहुयात, त्यांची ही यशोगाथा!

एक यशस्वी उद्योग उभा करण्याचं भाकित!

२०१५मध्ये पुनीत गुप्ता आयटी अभियंते म्हणून मुंबईत काम करत होते. तेव्हा त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण आपल्यापैकी बहुतेकांप्रमाणे ते देखील नोकरी सोडण्याबद्दल साशंकच होते.

तेव्हाच त्यांच्या एका महिला सहकाऱ्यानं त्यांना काळजीत पाहिलं आणि त्याचं कारण विचारलं. त्यांची अडचण ऐकल्यानंतर त्या सहकाऱ्यानं त्यांना भविष्याबाबत सल्ला देण्यासाठी मदत केली.

त्या वेळी पुनीत गुप्ता यांचा ज्योतिषावर विश्वास नव्हता. त्यामुळे त्या सहकाऱ्याच्या सल्ल्यावर पुनीत फक्त हसले आणि एक सुशिक्षित व्यक्ती असूनही ज्योतिषावर कसा विश्वास ठेवला म्हणून विचारणा देखील केली.

पण त्यांची महिला सहकारी तिच्या ज्योतिषाविषयीच्या कौशल्यावर ठाम होती. पुनीत गुप्ता यांच्या भूतकाळाविषयी सर्वकाही सांगू शकते, असं देखील तिने पुनीत यांना सांगितलं.

आपल्या सहकाऱ्याचा आत्मविश्वास पाहून पुनीत यांनी हे करायचं ठरवलं. तसंही, त्यांना यात गमावण्यासारखं काहीच नव्हतं. त्या महिला ज्योतिषानं पुनीत गुप्ता यांच्या भूतकाळाविषयी अगदी तंतोतंत खरी माहिती सांगितली. पण तरी देखील पुनीत यांचा विश्वास बसला नाही. त्यांना वाटलं त्यांच्या सहकाऱ्याने त्यांच्या भूतकाळाविषयी कुणाकडून तरी ऐकलं असेल.

त्यानंतर महिला सहकाऱ्याने त्यांना सांगितलं की ते लवकरच एक आयटी कंपनी सुरू करणार आहेत, पण ती २ वर्षांत बंद होईल कारण त्यांचा मित्र त्यांना सोडून देईल.

त्यानंतर तिने सांगितलं की पुनीत अजून एक व्यवसाय सुरू करतील. हळूहळू ते त्यात खूप यशस्वी होतील. पुनीत यांचा यावर अजिबात विश्वास नव्हता. पण तरी देखील त्यांनी राजीनामा दिला आणि स्वत:ची आयटी कंपनी सुरू केली.

पण पुनीत यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण २ वर्षांनंतर त्यांच्या पार्टनरनं खरंच त्यांना सोडलं. त्यामुळे त्यांना त्यांचा जम बसलेला व्यवसाय बंद करावा लागला.

त्यानंतर पुनीत गुप्ता यांना त्यांच्या मैत्रिणीनं वर्तवलेलं भाकित आठवलं. त्यांनी त्यांच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर मिळवला आणि तिला फोन केला. तिचं भाकित कसं खरं ठरलं, हे देखील त्यांनी तिला सांगितलं.

तेव्हा त्यांच्या ज्योतिष मैत्रिणीने त्यांना आध्यात्मिक क्षेत्रात काहीतरी करण्याचा सल्ला दिला. असा व्यवसाय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, असं देखील सांगितलं.

तेव्हा कुठे पुनीत गुप्ता यांनी अ‍ॅस्ट्रोटॉकवर काम सुरू केलं. एक अशी कंपनी जी प्रकाशाच्या वेगानं वाढली आणि अल्पावधीत जगातली पहिल्या क्रमांकाची ज्योतिष कंपनी ठरली.

“मी नम्रपणे सांगतो, मला गर्व आहे की आम्ही गेल्या ४ वर्षांत २ कोटींपेक्षा जास्त लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकलो”, असं पुनीत यांनी सांगितलं.

अ‍ॅस्ट्रोटॉक इतकं यशस्वी का ठरलं?

पुनीत म्हणतात, अ‍ॅस्ट्रोटॉकचं खरं यश हे चांगले ज्योतिष सोबत असणं आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करणं यात आहे.

“अगदी सुरुवातीपासून आमच्यासमोर खरं आव्हान होतं ते म्हणजे चांगले ज्योतिष सोबत घेण्याचं. आमच्याकडे देशभरातून हजारो सीव्ही आले. पण त्यातल्या ५ टक्क्यांपेक्षा कमी लोक आमच्या मुलाखतीमध्ये टिकून राहिले. बाजारात अनेक स्वयंघोषित ज्योतिष देखील आहेत. त्यामुळे योग्य ज्योतिष शोधून काढण्यासाठी मुलाखतीच्या किमान ५ ते ७ फेऱ्या कराव्या लागल्या”, असं गुप्ता म्हणाले.

अ‍ॅस्ट्रोलॉजी प्रेमींमध्ये अ‍ॅस्ट्रोटॉकची क्रेझ असण्याचं दुसरं कारण म्हणजे इथे १०० टक्के प्रायव्हसी ठेवली जाते. अ‍ॅस्ट्रोटॉकवर ग्राहक ज्योतिषांशी सुरक्षित आणि खासगीरीत्या चॅट आणि चर्चा करू शकतात.

पुनीत गुप्ता म्हणतात, “एक चांगलं उत्पादन बनवण्याचा एकमेवर मार्ग म्हणजे ग्राहकांची बोलत राहा आणि त्यांच्यासाठी जे चांगलं असेल, ते करत राहा. जर तुम्ही ग्राहकांच्या समस्या सोडवल्या, तर ते तुमच्या सर्व व्यावसायिक समस्या सोडवतील”.

अ‍ॅस्ट्रोटॉकचं भविष्य

पुनीत दावा करतात की अ‍ॅस्ट्रोटॉक दिवसाला तब्बल ४१ लाख रुपयांचा व्यवसाय करतात. सध्या कंपनीमध्ये जवळपास २५०० ज्योतिषी आहेत. दिवसाला अ‍ॅस्ट्रोटॉक कंपनी चॅट आणि कॉलवर तब्बल १ लाख ८० हजार ग्राहकांचं ज्योतिषविषयक समुपदेशन करतात. या कंपनीची सर्वात इंटरेस्टिंग बाब म्हणजे ती तरुण पिढीवर केंद्रीत आहे आणि कंपनीचा ९० टक्के व्यवसाय हा ३५पेक्षा कमी वयोगटातील ग्राहकांकडून येतो.

ग्राहकांकडून सातत्याने वाढत चाललेली मागणी पाहाता अ‍ॅस्ट्रोटॉकनं २०२२च्या अखेरपर्यंत अजून १० हजार ज्योतिषांना सोबत जोडण्याचं धोरण ठेवलं आहे. हे अजून प्रभावी करण्यासाठी अ‍ॅस्ट्रोटॉकनं ज्योतिषांसोबतचं पहिलं संभाषण ग्राहकांसाठी पूर्णपणे मोफत ठेवलं आहे.

कंपनीच्या ज्योतिषांसोबत बोलण्यासाठी किंवा चॅट करण्यासाठी तुम्हाला फक्त astrotalk.com वर जायचंय आणि तुमचे नातेसंबंध, लग्न, करिअर अशा कोणत्याही विषयावर प्रश्न विचारायचे आहेत. पहिलं चॅट पूर्णपणे मोफत आहे.

मराठीतील सर्व प्रायोजित बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrotalk services founder owner puneet gupta it engineer astrology business in india pmw
First published on: 22-02-2022 at 17:23 IST