News Flash

अनुष्काची खिल्ली उडवणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे- विराट कोहली

माझ्याबाबतीतील प्रत्येक नकारार्थी गोष्टीचा संबंध अनुष्काशी जोडणाऱ्या लोकांना लाज वाटायला पाहिजे.

Cricket,Icc T 20 World Cup,T 20 world cup,Virat Kohli Innings For India,Virat Kohli's Innings Against Australia,ऑस्ट्रेलिया टी २०,ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोहली, Anushka Sharma, Socail media, Shame on people trolling Anushka Sharma, अनुष्का शर्मा, Loksatta, loksatta news, marathi, Marathi news
Anushka Sharma & Virat Kohli : अनुष्कासोबतच्या ब्रेकअपनंतर ट्वेन्टी-२० विश्वचषकातील विराट कोहलीच्या कामगिरीचा चढत्या आलेखामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मिडीयावर विराट आणि अनुष्काचे नाते थट्टेचा विषय बनला होता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर विराट कोहलीने त्याची कथित प्रेयसी अनुष्का शर्माची खिल्ली उडविणाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. माझ्याबाबतीतील प्रत्येक नकारार्थी गोष्टीचा संबंध अनुष्काशी जोडणाऱ्या लोकांना लाज वाटायला पाहिजे. त्यांना स्वत:ला शिक्षित म्हणवून घेतानाही लाज वाटली पाहिजे. क्रिकेटमधील माझ्या कामगिरीवर अनुष्काचे कोणतेही नियंत्रण नसताना तिच्यावर अकारण टीका आणि तिची खिल्ली उडवणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे, असे सांगत विराटने अनुष्काची खिल्ली उडवणाऱ्यांचा समाचार घेतला.
तुझ में रब दिखता है.. 
तुमची प्रेयसी, बहीण किंवा पत्नीला कोणी जर अशाप्रकारे लक्ष्य केले अथवा तिच्याबद्दल सार्वजनिकरित्या वायफळ बडबड करत असेल तर तुम्हाला कसे वाटेल, असा सवालही विराटने उपस्थित केला. याशिवाय, अनुष्काविषयीच्या भावना व्यक्त करताना तिच्यामुळे मला नेहमीच सकारात्मक वाटत आल्याचे विराटने सांगितले. अनुष्कासोबतच्या ब्रेकअपनंतर ट्वेन्टी-२० विश्वचषकातील विराट कोहलीच्या कामगिरीच्या चढत्या आलेखाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मिडीयावर विराट आणि अनुष्काचे नाते थट्टेचा विषय बनला होता.
अनुष्काचा अपेक्षाभंग… विराट कोहली स्वस्तात बाद 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2016 3:45 pm

Web Title: shame on people trolling anushka sharma non stop virat kohli
टॅग : Anushka Sharma
Next Stories
1 पाहा : मुंबईत वासीम अक्रम यांच्या लाईव्ह कार्यक्रमाचे प्रक्षेपण थांबवले
2 T-20 WORLD CUP BLOG : कंटाळवाण्या ऑस्ट्रेलियाला जीनियस कोहलीकडून कडक शिक्षा!
3 महिलांमध्ये श्रीलंका-दक्षिण आफ्रिका लढत आज रंगणार
Just Now!
X