scorecardresearch

Outlook सह Microsoft च्या अनेक सेवा ठप्प; युजर्सना होतेय मोठी अडचण

आतापर्यंत ३,७०० हून अधिक वापरकर्त्यांनी DownDetector वर तक्रार केली आहे.

Outlook सह Microsoft च्या अनेक सेवा ठप्प; युजर्सना होतेय मोठी अडचण
मायक्रोसॉफ्ट सर्व्हिसेस- संग्रहित छायाचित्र / द इंडियन एक्सप्रेस

Outlook Services in India: Microsoft कंपनीच्या अनेक सेवा या भारतात ठप्प झाल्या आहेत. एका रिपोर्टनुसार मायक्रोसॉफ्ट टीम्स आणि आउटलुक ठप्प झाल्याची बातमी आहे. अनेक वापरकर्ते याबाबत सतत तक्रारी करत आहेत. आतापर्यंत ३,७०० हून अधिक वापरकर्त्यांनी DownDetector वर तक्रार केली आहे.

आम्ही या आउटेजची चौकशी करत आहोत. यामुळे मायक्रोसॉफ्टच्या ३६५ सेवा विस्कळीत झाल्या आहेत असे मायक्रोसॉफ्टने ट्विट केले आहे. ट्विटरवर #MicrosoftTeams ट्रेंडिंग सुरू झाले आहे यावरून तुम्ही आउटेजचा अंदाज लावू शकता. याबद्दल अधिक माहिती MO502273 च्या अंतर्गत ऍडमिनिस्ट्रेशन सेन्टर मध्ये मिळू शकते.

हेही वाचा : Microsoft Layoff: मायक्रोसॉफ्ट १0 हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार? सत्या नडेला यांचा ईमेल; म्हणाले, “हा काळ…”

भारतात Outlook झाले डाऊन

या सेवा ठप्प झाल्याबद्दल युजर्स ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. ट्विटरवरील अनेक अहवालांनुसार भारतासह अनेक देशांमध्ये मायक्रोसॉफ्टचे ई-मेल सेवा आउटलुक डाउन झाली आहे.सर्व्हरच्या प्रोब्लेममुळे ही सेवा ठप्प झाली आहे. फेसबुक आणि अ‍ॅमेझॉन व गुगल सारखेच मायक्रोसॉफ्ट देखील त्याच्या सर्व सेवा या Azure क्लाउडद्वारे होस्ट करते.या सेवा ठप्प होण्याचे कारण म्हणजे मायक्रोसॉफ्ट Azure मध्येच काही समस्या असल्याचे समोर आले आहे. याच कारणामुळे मायक्रोसॉफ्टच्या अनेक सेवांवर एकाच वेळी परिणाम झाला आहे.

या सेवांच्या व्यतिरिक्त GitHub सोशल कोडिंग सेवा देखील जगभरातील अनेक युजर्ससाठी थांबली आहे. मायक्रोसॉफ्टचा हा आतापर्यंतचा वर्षातील सर्वात मोठा आउटेज मानला जात आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने एकाच वेळी अनेक कमर्चाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले होते. आताही कर्मचाऱ्यांची कपात सुरूच आहे. यावर बोलताना एका ट्विटर युजरने ट्विटमध्ये लिहिले की, जेव्हा तुम्ही एकाच वेळी अनेक लोकांना काढून टाकता तेव्हा हे असे होते.

हेही वाचा : अंतराळ-तंत्रज्ञान स्टार्टअप सक्षम होणार; मायक्रोसॉफ्टने केला इस्त्रोसोबत सामंजस्य करार

मायक्रोसॉफ्टने नुकतीच टाळेबंदी केली आणि कंपनीच्या अनेक सेवा ठप्प झाल्या . गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अशीच स्थिती ट्विटरची देखील झाली होती. टाळेबंदीच्या दुसऱ्याच दिवशी ट्विटर डाऊन होते. ४ नोव्हेंबर २०२२ रोजी पहाटे ३ पासून ट्विटरच्या युजर्सना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. ट्विटर डाऊन असतानासुद्धा मीडियावर अनेक मिम्स व्हायरल झाले होते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 15:08 IST

संबंधित बातम्या