scorecardresearch

AI Robot: गोव्यात समुद्रकिनारी तैनात करण्यात आले रोबोट; ‘लाइफगार्ड’प्रमाणे वाचवणार लोकांचा जीव

ट्रायटन मॉनिटरिंग सिस्टीमचा प्रायमरी फोकस हा पाणी नसलेल्या क्षेत्रांचे पूर्णपणे AI आधारित निरीक्षण करणे आहे.

Aurus Robodeployed goa beach
Aurus Robot (Image Credit- PTI)

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच (AI) च्या चर्चा OpenAi च्या चॅटजीपीटी आणि लवकरच लॉन्च करणाऱ्या Google च्या Bard AI मुळे सर्वत्र सुरु आहेत. यातच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असा ‘ऑरस’ नावाचा रोबोट गोव्यातील बीचवर तैनात करण्यात आला आहे. हा रोबोट जीवरक्षकाप्रमाणेच लोकांचा जीव वाचवण्यास मदत करणार आहे.

गोवा राज्य नियुक्त जीवरक्षक सेवा एजन्सीने सांगितले की, ऑरस हा एक कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारा सेल्फ ड्रायव्हिंग रोबोट आहे. हा रोबोट AI या सिस्टीमवर आधारित आहे. या रोबोटमुळे समुद्रकिनाऱ्यावर होणारे अपघात टाळता येणार आहे.

हेही वाचा : Bard Google: ChatGpt चं टेन्शन वाढलं, गुगल लवकरच लॉन्च करणार ‘बार्ड’

लाईफगार्ड आउटफिट दृष्टी मरीनच्या प्रवक्त्याने सांगितले की, देश-विदेशातील पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे गोव्याच्या किनारपट्टीवर अपघातांमध्ये वाढ झाल्यानंतर AI आधारित स्पोर्टचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षात किनारपट्टी भागातील लोकांनी १,००० पेक्षा अधिक बचावाच्या घटना पाहिल्या आहेत.ऑरस है एक सेल्फ ड्रायव्हींग रोबोट आहे जो पाणी नसलेल्या बभगात गस्त घालून भरतीच्या वेळी पर्यटकांना सतर्क करतो व जीवरक्षकांना मदत करतो. समुद्रकिनाऱ्यांवर पाळत ठेवण्यास आणि गर्दीचे नियोजन करण्यात देखील या रोबोटची मदत होणार आहे.

याशिवाय या ट्रायटन मॉनिटरिंग सिस्टीमचा प्रायमरी फोकस हा पाणी नसलेल्या क्षेत्रांचे पूर्णपणे AI आधारित निरीक्षण करणे आहे. ज्यामुळे ते पर्यटकांना धोका दिसल्यास सतर्क करून जीवरक्षकांची मदत करू शकते. एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,ऑरस सध्या उत्तर गोव्यातील मिरामार बीच आणि ट्रायटनला दक्षिण गोव्यातील बायना , वेल्साओ, बेनोलिम, गाल्गीबाग आणि उत्तर गोव्यातील मोरजिम येथे तैनात करण्यात आले आहे. आणखी १०० ट्रायटन युनिट्स आणि १० ऑरस युनिट्स राज्यातील समुद्र किनाऱ्यांवर तैनात केले जाणार आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 19:26 IST