Apple Event September 2022 Live Updates in Marathi, 07 September 2022 : अ‍ॅपलच्या सर्वात मोठ्या वार्षिक कार्यक्रमाची प्रतीक्षा अखेर संपली. क्युपर्टिनो-कॅम्पसमध्‍ये अ‍ॅपलचा ‘फार आऊट इव्‍हेंट’ पार पडला. या कार्यक्रमात अ‍ॅपल आपले नवीन आयफोन, अ‍ॅपल वॉच आणि एअरपॉड्स प्रो २ यांच्यासह आणखी अनेक प्रमुख घोषणा केल्या आहेत आहे.

singer and rapper ap dhillon trolled for breaking guitar on stage in live concert
Video: “बॉयकॉट एपी ढिल्लों…”, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायकाने स्टेजवर आपटून फोडली गिटार, व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले…
jeev majha guntala fame yogita chavan and saorabh choughule lovestory
‘जीव माझा गुंतला’ मालिकेमुळे पहिली भेट ते लग्न! ‘अशी’ आहे योगिता-सौरभची लव्हस्टोरी, पहिलं कोणी केलं प्रपोज?
Bigg Boss 16 winner MC Stan quits rapping
‘बिग बॉस १६’ चा विजेता एमसी स्टॅन रॅप सोडणार, सोशल मीडियावरून केली घोषणा
pakistani man throws wife out of the balcony for not make spicing the chicken properly horrifying video goes viral
निर्दयीपणाचा कळस! चिकन तिखट न बनविल्याने पत्नीला थेट गच्चीवरून फेकले; पाहा धक्कादायक Video
Live Updates

Apple iPhone Launch 2022 Live Updates in Marathi: अ‍ॅपल लाइव्ह इव्हेंटच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

00:23 (IST) 8 Sep 2022
आता उत्सुकता मोबाईल हातात पडण्याची...

आयफोन १४ आणि आयफोन १४ प्रो बरोबरच अ‍ॅपल वॉचची घोषणा करण्यात आली असून आता या प्रोडक्ट्ससाठी नेहमीप्रमाणे यंदाही पहिल्याच दिवशी आयस्टोअर्समध्ये गर्दी पहायला मिळण्याची शक्यता आहे. या फोनच्या माध्यमातून नोटीफिकेशन बार, नॉच यासारख्या भन्नाट संकल्पना पहिल्यांदाच वापरकर्त्यांना अनुभवता येणार असल्याने फोन कधी एकदा हातात येतोय असं अ‍ॅपलप्रेमींना झाल्याचं सोशल मीडियावरील फोन लॉंचिंग नंतरच्या प्रतिक्रियांवरुन दिसून येत आहे.

00:18 (IST) 8 Sep 2022
नेहमीप्रमाणे मिम्सचीही चर्चा...

भारतीय वेळेनुसार मध्यरात्री १२ वाजता अ‍ॅपलच्या लॉंचिंगच्या कार्यक्रमाची सांगता झाली असली तर सोशल मीडियावर या फोन्सच्या फिचर्सबरोबरच किंमत आणि मिम्सचीही चर्चा पाहायला मिळत आहे.

00:09 (IST) 8 Sep 2022
असा असणार आयफोन १४ प्रो...

थोडक्यात असा असणार आयफोन १४ प्रो....

00:07 (IST) 8 Sep 2022
फोर के सपोर्टसह सिनेमॅटिक मोड

फोर के सपोर्टसह सिनेमॅटिक मोडही या फोनमध्ये उपलब्ध आहे.

00:07 (IST) 8 Sep 2022
अंधुक प्रकाशामध्येही काढता येणार उत्तम फोटो

00:05 (IST) 8 Sep 2022
Apple Watch Ultra ची भारतातील किंमत

आय वॉच अल्ट्रा भारतात ८९ हजार ९०० रुपयांना मिळणार.

00:01 (IST) 8 Sep 2022
टेलिफोटो सुविधा

टेलिफोटो ही विशेष सुविधा देण्यात आली आहे. हा कॅमेरा क्वाड पिक्सल सेन्सर्ससहीत असेल हे ही या कॅमेराचं वैशिष्ट्य असेल.

00:00 (IST) 8 Sep 2022
तब्बल ४८ मेगा पिक्सेलचा कॅमेरा

आतापर्यंतचा सर्वात मोठ्या क्षमतेचा कॅमेरा अ‍ॅपलने आयफोन १४ मध्ये दिला आहे. आयफोन १४ प्रोचा कॅमेरा ४८ मेगा पिक्सेलचा असणार आहे. यामुळे आधीच्या आयफोनच्या तुलनेत आता अंधुक प्रकाशामध्येही स्पष्ट छायाचित्रे काढता येणार आहेत.

23:55 (IST) 7 Sep 2022
पहिल्यांदाच जांभळ्या रंगात दिसणार आयफोन

या पाच रंगांमध्ये आयफोन १४ सीरिज उपलब्ध असणार आहे. यामध्ये पहिल्यांदाच पर्पल कलरचा समावेश करण्यात आला आहे.

23:51 (IST) 7 Sep 2022
स्क्रीनभर नोटीफिकेशनचा त्रास वाचणार

आयफोन प्रोमध्ये नोटिफिकेशन डिस्प्लेमध्ये अमूलाग्र बदल करण्यात आला आहे. नोटिफिकेशन अलर्ट केवळ वरच्या छोट्या पट्टीत दिसणार.

23:50 (IST) 7 Sep 2022
७ ऑक्टोबरला IPhone 14 बाजारात दाखल होणार

आयफोन १४ प्लस ७ ऑक्टोबरला बाजारात दाखल होणार.

23:49 (IST) 7 Sep 2022
IPhone 14 १६ सप्टेंबरपासून ग्राहकांसाठी बाजारपेठेत उपलब्ध

आयफोन १४ हा १६ सप्टेंबरपासून ग्राहकांसाठी बाजारपेठेत उपलब्ध होणार.

23:39 (IST) 7 Sep 2022
आयफोनच्या किंमतीची घोषणा
  • आयफोन १४ ची किंमत ७९९ डॉलर्स (भारतीय चलनामध्ये सुमारे ६३ हजार ५०० च्या आसपास) असेल.
  • आयफोन १४ प्लस ८९९ डॉलर्स (भारतीय चलनानुसार ७१ हजार ५०० च्या आसपास) असणार.
  • हे दर अमेरिकेतील असून भारतात हे दर अधिक असतील असा अंदाज आहे.
  • 23:38 (IST) 7 Sep 2022
    IPhone 14च्या कॅमेऱ्यामध्ये मोठा बदल

    फोनच्या कॅमेऱ्यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये १२ एमपीचा मुख्य कॅमेरा असेल, तर पुढील कॅमेरामध्ये प्रथमच ऑटोफोकसची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे अतिशय अंधुक प्रकाशातही छायाचित्र व्यवस्थित टिपता येणार.

    23:36 (IST) 7 Sep 2022
    IPhone 14 ला सॅटेलाइट जोडणी

    अतिदुर्गम भागात मोबाईल संपर्क तुटल्यास सॅटेलाईटद्वारे संपर्क साधण्याची सुविधा मिळणार आहे. या सुविधेचा फायदा डोंगरदऱ्यांमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांच्या बचावकार्यात होऊ शकतो.

    23:34 (IST) 7 Sep 2022
    IPhone 14 : विना सिमकार्ड मोबाईल सुविधा?

    आयफोन १४ आयफोनमध्ये सामान्य सीमकार्ड नसणार. ॲपलकडून ई-सीमची घोषणा करण्यात आली आहे. फोनमध्ये सीम ट्रेच उपलब्ध नसणार.

    23:34 (IST) 7 Sep 2022
    कार क्रॅश डिटेक्शनची सुविधा

    आयफोन १४ मध्येही अपघात ओळखून आपत्कालीन यंत्रणांशी संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

    :

    23:32 (IST) 7 Sep 2022
    आयफोन १४ मध्ये सीमकार्ड ट्रे नसणार; कंपनीची मोठी घोषणा

    आयफोनमध्ये सामान्य सीमकार्ड नसणार. ई-सीमची ॲपलकडून घोषणा. फोनमध्ये सीम ट्रेच उपलब्ध नसणार. सध्या तरी ही सुविधा फक्त अमेरिकेपुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे.

    23:27 (IST) 7 Sep 2022
    IPhone 14 मध्ये असणार सर्वांत वेगवान प्रोसेसर

    ए१५ बायोनिक प्रोसेसर आयफोन १४ मध्ये असणार आहे. हा सर्वांत वेगवान प्रोसेसर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

    23:27 (IST) 7 Sep 2022
    आयफोन १४ आणि १४ प्लसचा फर्स्ट लूक

    आयफोन १४ आणि १४ प्लसची घोषणा करण्यात आली आहे. या फोनमध्ये वापरकर्त्यांना अधिक मोठा डिस्प्ले मिळणार आहे.

    23:25 (IST) 7 Sep 2022
    आयफोन १४ आणि १४ प्लसची घोषणा

    आयफोन १४ आणि १४ प्लसची घोषणा करण्यात आली आहे. या फोनमध्ये वापरकर्त्यांना अधिक मोठा डिस्प्ले मिळणार आहे. प्रथमच ॲपलने वाप्रकर्त्यांच्या अधिक मोठ्या आयफोनच्या मागणीकडे लक्ष दिलं आहे

    23:23 (IST) 7 Sep 2022
    Apple Watch Ultra डिझाइन

    ॲपल वॉचची आठव्या सिरीजचं डिझाइन आधीच्या वॉचप्रमाणेच असले तरी स्क्रीन मोठी आणि अधिक ब्राइट असेल असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. ही घड्याळं कोणत्याही परिस्थितीमध्ये काम करण्यासाठी अधिक सक्षम असतील असा कंपनीचा दावा आहे.

    23:20 (IST) 7 Sep 2022
    Apple Watch Ultra ची वैशिष्ट्ये

    ॲपल वॉचची आठवी सिरीज ही आधीच्या सिरीजपेक्षा अधिक ड्युरेबल म्हणजेच सक्षम, स्वीम-फ्रूफ, डस्ट फ्रूफ आणि क्रॅक रेझिसटन्स म्हणजेच काचेला तडा पडणार नाही या वैशिष्ट्यांसहीत उपलब्ध होणार आहे.

    23:12 (IST) 7 Sep 2022
    Apple Watch Ultra ची किंमत

    ॲपल वॉच अल्ट्राची किंमत ७९९ डॉलर असेल आणि ते २३ सप्टेंबर पासून सर्वत्र उपलब्ध होईल.

    23:05 (IST) 7 Sep 2022
    Apple Watch Ultra

    वैशिष्ट्ये :

  • प्रीमियम श्रेणीतील नवीन Apple Watch
  • अचूक जीपीएस यंत्रणा
  • वर्क आऊट मोड
  • धावण्याचा वेग अचूकपणे टिपणार
  • मोठी बॅटरी
  • अतिदुर्गम भागातही व्यवस्थित काम करणार
  • 23:01 (IST) 7 Sep 2022
    Apple Watch Series 8 ची वैशिष्ट्ये
  • शरीराचे तापमान मोजणार
  • अपघात ओळखून आपत्कालीन सेवांशी तातडीने संपर्क
  • १८ तासांची बॅटरी क्षमता
  • लो पॉवर मोड सुरू करून ३६ तास बॅटरी चालवण्याची क्षमता
  • आंतरराष्ट्रीय रोमिंग सुविधा
  • 22:59 (IST) 7 Sep 2022
    Apple Watch १६ सप्टेंबरपासून होणार उपलब्ध

    कमी बॅटरीमध्येही जास्तीत जास्त आवश्यक वैशिष्ट्ये काम करणार.

    22:56 (IST) 7 Sep 2022
    Apple Watch S E

    सेकड जनरेशन मधील आय वाचमध्ये महत्वपूर्ण बदल. २४९ ते २९९ डॉलर किंमत

    22:52 (IST) 7 Sep 2022
    Apple iPhone Launch 2022 Live Updates : महिलांच्या आरोग्याला प्राथमिकता

    मासिक पाळीचक्राची नियमितता आणि त्यातील बदल अचूकपणे टिपण्याची क्षमता. ही सर्व माहिती केवळ वापरकर्त्याकडेच राहणार.

    22:51 (IST) 7 Sep 2022
    सिरीज 8 ची घोषणा

    सिरीज 8 ची घोषणा! काठोकाठ पसरलेला डिस्प्ले, फिटनेसच्या वैशिष्ट्यांमध्ये वाढ, स्लिप ट्रॅकिंगसह शरीराचे तापमानही मोजणार

    22:50 (IST) 7 Sep 2022
    ॲपल वॉच म्हणजे..

    हार्डवेअर + सॉफ्टवेअर + वैयक्तिक जादुई अनुभव म्हणजे ॲपल वॉच - टीम कूक

    22:46 (IST) 7 Sep 2022
    टीम कुक यांच्या भाषणाला सुरुवात

    ॲपल कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी परिषदेत बोलताना सर्वप्रथम आय वॉचने सुरुवात केली.

    22:27 (IST) 7 Sep 2022
    आयफोन १४ चे भारतात उत्पादन कधीपासून सुरू होणार?

    नवीन आयफोनची घोषणा झाल्यानंतर त्याचे भारतात उत्पादन होण्यापर्यंत सहा ते आठ महिन्यांचा कालावधी जातो. भारतात वाढत असलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ॲपल दोन महिन्यातच भारतात उत्पादन सुरू करू शकते.

    22:26 (IST) 7 Sep 2022
    आयफोनच्या वेगवान पोर्टचा अखेरचा अध्याय?

    आयफोनच्या वेगवान चार्जिंगमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या लायटनिंग पोर्टची ही अखेरची आवृत्ती असणार आहे. कारण युरोपीय महासंघाने सर्व स्मार्टफोन्सना यूएसबी टाईप सी पोर्ट असणे बंधनकारक केले आहे. हा नियम २०२४ पासून लागू होणार असला तरी आयफोन १४ नंतर येणाऱ्या आयफोनमध्ये सी टाईप चार्जिंग असेल.

    22:24 (IST) 7 Sep 2022
    नव्या आयफोनच्या किमतीकडे जगाचे लक्ष

    जगभरात सध्या महागाई दर चढा असून आर्थिक मंदीचा झाकोळही अनेक देशांवर आहे. अशा परिस्थितीत ॲपल किंमतीच्या संदर्भातील तारेवरची कसरत कशी करणार याकडे जगभरातील अनेकांचे लक्ष आहे

    22:22 (IST) 7 Sep 2022
    अनावरणापूर्वी ॲपलच्या शेअरचा भाव १३ टक्क्यांनी खाली

    ॲपलच्या गुंतवणूकदारांचेही या सोहळ्याकडे बारिक लक्ष आहे. दरवर्षी नव्या उत्पादनाच्या अनावरणापूर्वी ॲपलच्या शेअरचा भाव सुमारे १० टक्क्यांनी खाली येतो. यंदाही तो १३ टक्क्यांनी खाली आला आहे. मात्र यात काळजीचे कारण नाही, असे बाजारपेठेतील तज्ज्ञांना वाटते. प्रतिवर्षी हेच होते आणि सोहळ्यानंतर आलेख वरच्या दिशेने जातो, असे गुंतवणूकदारांच्या एका गटाला वाटते असे 'ब्लूमबर्ग'ने म्हटले आहे

    22:20 (IST) 7 Sep 2022
    नवीन आयफोनला मिळणार सॅटेलाइट जोडणी?

    आयफोनमध्ये सॅटेलाइट नेटवर्कची सुविधा असेल, ही चर्चा आता अधिकाधिक पक्की होऊ लागली आहे. या परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेवरील आकाशातील ताऱ्यांच्या समूहाने बनलेला ॲपलचा लोगो त्याचीच साक्ष देत आहे, असा दावा केला जात आहे.

    22:18 (IST) 7 Sep 2022
    प्रोसेसर क्षमतेतही असू शकते तफावत

    आयफोन १४ मालिकेतील मोबाईलमध्ये कॅमेरा स्क्रीन यासारख्या वैशिष्ट्यांबरोबरच प्रोसेसर क्षमतेतही तफावत दिसून येईल .आयफोन १४ प्रो आणि प्रो मॅक्समध्ये नवीन बायोनिक ए१६ प्रोसेसर असेल तर इतर आयफोनमध्ये सध्याच्या बायोनिक ए१५ प्रोसेसरची अद्ययावत आवृत्ती असेल, असेही बोलले जात आहे.

    22:14 (IST) 7 Sep 2022
    आयफोन १४ सीरिज फोन्सची स्टोअरेज असणार दुप्पट? चर्चांना उधाण

    आयफोन १३ आणि त्याआधीच्या आयफोनमध्ये स्टोअरेज क्षमता १२८ जीबीपासून सुरू होते. मात्र नव्या आयफोनमध्ये स्टोअरेज दुप्पट करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

    22:11 (IST) 7 Sep 2022
    Apple Watch ठरणार आकर्षणाचे केंद्रबिंदू

    यंदाच्या कार्यक्रमात आयफोन १४ ची घोषणा होणार आहे. त्याचबरोबर ॲपलच्या अन्य उत्पादनांची नवीन आवृत्ती पाहायला मिळणार आहे. त्यातील आणखी एक प्रमुख आकर्षण असणार आहे ते म्हणजे आय वॉच सिरीज ८.

    22:09 (IST) 7 Sep 2022
    काही क्षणात होणार ॲपलच्या वार्षिक परिषदेला सुरुवात

    कॅलिफोर्नियातील ॲपल पार्कमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये काही क्षणात ॲपलच्या वार्षिक परिषदेला सुरुवात होणार आहे. काही वेळातच कंपनीचे सीईओ टीम कुक परिषदेला सुरुवात करतील. यंदा दोन वर्षांनंतर ॲपलच्या या परिषदेत प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष हजर असणार आहेत.

    21:48 (IST) 7 Sep 2022
    आजच्या कार्यक्रमात नवीन काय सादर होणार?

    अ‍ॅपलच्या दरवर्षीच्या कार्यक्रमाप्रमाणे यंदाही आयफोनसह अ‍ॅपलच्या इतर काही उत्पादनांच्या नवीन किंवा सुधारित आवृत्त्यांची घोषणा होणार आहे. यामध्ये आयफोन १४ हे प्रमुख आकर्षण असेल. आयफोन १४ मालिकेतील चार किंवा पाच फोनचे सादरीकरण आजच्या कार्यक्रमात होईल. याशिवाय अ‍ॅपल वॉच सिरीज आठ, आयपॅड प्रो, एअरपॉड्स प्रो ही उत्पादनेही आजच्या कार्यक्रमातून जगासमोर मांडली जाणार आहेत.

    21:40 (IST) 7 Sep 2022
    आयफोन १४मध्ये नवीन काय असेल?

    आयफोन १३च्या तुलनेत आयफोन १४ मालिकेत अधिक शक्तिशाली प्रोसेसर, कॅमेरा, अधिक बॅटरी क्षमता आणि झटपट चार्जिंगची सुविधा ही वैशिष्ट्ये असू शकतील. आयफोनच्या मागील दोन मालिकांमध्ये कंपनीने त्या-त्या श्रेणीत ‘मिनी’ आयफोन आणले होते. मात्र, यावेळी त्याला फाटा देऊन अ‍ॅपल अधिक मोठा डिस्प्ले असलेले आयफोन प्लस आणि प्रो मॅक्स आणणार, अशी चर्चा आहे. या दोन्ही आयफोनचा डिस्प्ले ६.७ इंच इतका असू शकतो.

    21:21 (IST) 7 Sep 2022
    IPhone 14 ची संभाव्य किंमत काय असेल?

    आयफोन १४ सीरिजच्या किमतीबाबत काही अंदाज बांधण्यात येत आहेत. काही मीडिया अहवालानुसार, आयफोन १४ ची संभाव्य किंमत ७४९ डॉलर्स म्हणजेच ५९,७८२ रुपये, आयफोन १४ मॅक्सची संभाव्य किंमत ८४९ डॉलर्स म्हणजेच ६७,७६२ रुपये, आयफोन १४ प्रोची संभाव्य किंमत १,०४९ डॉलर्स म्हणजेच ८३, ७२० रुपये आणि आयफोन १४ प्रो मॅक्सची संभाव्य किंमत १,१९४ डॉलर्स म्हणजेच ९५,२९२ रुपये इतकी असू शकते.

    Apple iPhone Launch 2022 Live | Apple Event September 2022 Live Updates in Marathi

    अ‍ॅपल लाँच इव्हेंट | अ‍ॅपल लाँच इव्हेंट लाइव्ह