Appleही एक मोठी टेक कंपनी आहे. या कंपनीचे आयफोन हे जगभरात लोकप्रिय आहेत. प्रत्येकाची इच्छा असते कि आपण एकदातरी आयुष्यात आयफोन वापरावा. अँड्रॉइड स्मार्टफोन्सपेक्षा आयफोनमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम आणि चांगले सिक्युरिटीचे फीचर्स असतात. यामुळे लोकांना त्यांच्या गोपनीयतेमध्ये अडचण येऊ नये म्हणून आयफोन वापरणे आवडत असते. Apple कंपनी आपल्या युजर्ससाठी iOS 16.3 हे अपडेट आणणार आहे. या अपडेटमध्ये तुम्हाला काय काय मिळणार ते जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय होणार फायदा ?

MacRumors च्या मते iOS 16.3 मध्ये काही सेटिंग बदलण्यात आल्या आहेत. म्हणजे ही सेटिंग अधिक स्पष्ट आणि सोपी झाली आहे. कंपनीने आता ‘कॉल विथ होल्ड’ बदलून ‘कॉल विथ होल्ड अँड रिलीज’ केले आहे . नवीन अपडेटमध्ये, तुम्हाला ‘Call Countdown’ ‘Call Silently’ असे दिसणार आहे. तसेच याच्या इमर्जन्सी s.o.s. च्या सेटिंगमध्ये बदल करण्यात आले आहेत.

हेही वाचा : Flipkart Sale 2023: मोठी सुट, २७ हजारांचे Airpods Pro फक्त १,१५० रुपयांत; जाणून घ्या फीचर्स

अपडेट कसे डाउनलोड कराल ?

Ste-1. तुमच्या फोनमधील सेटिंग ऑप्शन वर क्लिक करा व सेटिंग्ज ओपन करा.

Step-2. जनरलवर क्लीक करा आणि नंतर सॉफ्टवेअर अपडेटवर क्लिक करा.

Step-3. यानंतर iOS 16.3 हे अपडेट डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड आणि इन्स्टॉल यावर क्लिक करा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple has brought a new update of ios 16 3 for its users tmb 01
First published on: 24-01-2023 at 12:28 IST