अॅपल कंपनी एक दिग्गज टेक कंपनी आहे. अनेकांना अॅपलची उत्पादने वापरण्यास आवडते. यामध्ये कंपनीचे आयफोन खूप लोकप्रिय उत्पादन आहे. सध्या कंपनीचा आयफोन १२ हे मॉडेल फ्लिपकार्टवर स्वस्तात खरेदी करण्याची संधी खरेदीदारांची उपलब्ध आहे. आयफोन १२ हा कंपनीच्या सर्वात जास्त विक्री होणाऱ्या स्मार्टफोनपैकी एक फोन आहे. हा फोन ३ वर्षांपूर्वी लॉन्च करण्यात आला होता. होता. मात्र सध्या बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या मिड रेंज स्मार्टफोनमध्ये हा एक सर्वोत्कृष्ट फोन आहे. आयफोन १२ फ्लिपकार्टवर स्वस्तात कसा खरेदी करता येऊ शकतो, त्यासाठी खरेदीदारांना कोणकोणत्या ऑफर्स मिळणार आहेत ते जाणून घेऊयात.
iPhone 12 : फीचर्स
आयफोन १२ मध्ये सिरॅमिक शिल्ड आणि IP68 वॉटर रेजिस्टन्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. आयफोन १२ च्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास वापरकर्त्यांना १२ मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. तसेच यामध्ये नाइट मोड, ४ के डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंगसह १२ मेगापिक्सलचा ट्रू डेप्थ सेल्फी कॅमेरा मिळतो. तसेच व्हर्टिकल ड्युअल कॅमेरा सेटअप आणि ६४ जीबी स्टोरेज असणारा कंपनीचा शेवटचा फोन आहे. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.
आयफोन १२ सध्या सर्वात कमी किंमतीमध्ये उपलब्ध आहे. तसेच असे देखील होऊ शकते हा फोन खरेदी करण्याची शेवटची संधी तुमच्याकडे असेल. आयफोन १२ हा फोन ७९,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये लॉन्च करण्यात आला होता. हा फोन सर्वात जास्त विक्री होणाऱ्या आयफोन मॉडेलपैकी एक आहे. आयफोन १२ सध्या फ्लिपकार्टवरून खरेदीदारांना केवळ ४,८४९ रुप्यांमध्ह्ये खरेदी करता येऊ शकतो. आयफोन १२ या फोनवर फ्लिपकार्टवर ग्राहकांना ३९,१५० रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतो. आयफोन १५ सिरिज लॉन्च केल्यानंतर कंपनीने आयफोन १२ हे मॉडेल कंपनीच्या स्टोअरवरून काढून टाकलं आहे. तसेच लवकरच तो अन्य ई-कॉमर्स वेबसाइटवरून देखील काढून टाकण्यात येणार आहे.
आयफोन १२ फोन प्रीमियम फीचर्स असलेला व्हॅल्यू फॉर मनी स्मार्टफोन आहे. यामध्ये वापरकर्त्यांना ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले मिळतो. हूड अंतर्गत आयफोन १२ मध्ये A14 बायोनिक चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. आयफोन १२ सध्या फ्लिपकार्टवर ४३,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय फ्लिपकार्ट तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात ३९,१५० रुपयांचा डिस्काउंट देऊ शकतो. म्हणजेच सर्व ऑफर्सचा विचार केला तर खरेदीदारांना आयफोन १२ वर ३९१,५० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला हा फोन केवळ ४, ८४९ रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो.