ॲपल पुढील महिन्यात आपला पुढील पिढीचा आयफोन लॉंच करणार आहे. कंपनीने जाहीर केले आहे की ॲपल आयफोन १४ अधिकृतपणे ७ सप्टेंबर रोजी सादर केला जाईल. या सीरिजअंतर्गत, आयफोन १४, आयफोन १४ मॅक्स, आयफोन १४ प्रो आणि आयफोन प्रो मॅक्स ७ सप्टेंबर रोजी लाँच केले जाऊ शकतात. मात्र, आता अधिकृत लॉंचपूर्वीच आयफोन १४ प्रो चे कलर व्हेरियंट ऑनलाइन लीक झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आयफोन १४ सीरिजची माहिती सातत्याने समोर येत आहे. यामध्येच आता ॲपल आयफोन १४ प्रो मॉडेलचे कलर व्हेरिएंट समोर आले आहे.
ॲपल आयफोन १४ प्रोचे डमी मॉडेल्स चीनच्या मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट विबोवर पोस्ट करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयफोन १४ प्रो पाच कलर ऑप्शनमध्ये आणला जाईल. हँडसेट गोल्ड, ग्रेफाइट आणि सिल्व्हर रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असेल. याशिवाय यामध्ये निळा आणि जांभळ्या रंगाचाही समावेश असेल. यापूर्वी एका लीकमध्ये दावा करण्यात आला होता की आयफोन १४ आणि आयफोन १४ प्रो मॉडेल नवीन जांभळ्या रंगातदेखील आणले जातील. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पर्पल फिनिश प्रकार केवळ प्रो प्रकारासाठी उपलब्ध केला जाऊ शकतो.
तुमचा स्मार्टफोन 5G ला सपोर्ट करणार का? ‘या’ स्टेप्सच्या मदतीने करा चेक
याशिवाय, अनेक रिपोर्ट्समध्ये हेदेखील सांगितले आहे की जांभळ्या रंगाचा आयफोन १४ प्रो एका अनोख्या फिनिशसह लॉंच केला जाईल जो वेगवेगळ्या लाइट्समध्ये कलर टोन बदलेल. ॲपलने आपल्या आयफोन १२ सीरिजसाठी पर्पल कलरचा पर्यायदेखील उपलब्ध करून दिला आहे.
ॲपलने ७ सप्टेंबर २०२२ रोजी वार्षिक ॲपल इव्हेंट आयोजित करण्याची घोषणा केली आहे. यावेळी आयफोन १४ सीरिजमधील नवीन स्मार्टफोन व्यतिरिक्त कंपनी वॉच सीरीज ८ मॉडेलदेखील उपलब्ध करून देऊ शकते. याशिवाय, एक नवीन एंट्री-लेव्हल आयपॅड आणि एम२-चालित आयपॅड प्रोदेखील या कार्यक्रमात लॉंच केला जाईल.
iPhone vs Android : आयफोन आणि अँड्रॉइड फोनच्या किंमतीत इतकी तफावत का? जाणून घ्या यामागची कारणे
आयफोन १४ च्या प्रो मॉडेलमध्ये नवीन आणि वेगवान प्रोसेसर दिला जाऊ शकतो, तर आयफोन १४ लाइनअपमध्ये दिलेला ए१५ चिपसेट नॉन-प्रो मॉडेलमध्ये दिला जाऊ शकतो. प्रो मॉडेलला कॅमेरा स्पेसिफिकेशन्समध्ये मोठे अपग्रेड दिसण्याची अपेक्षा आहे. संपूर्ण आयफोन १४ मालिकेत रेकॉर्डिंग क्षमता आणि बॅटरीचे आयुष्य चांगले असल्याची चर्चा आहे.