scorecardresearch

Premium

४८ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह iPhone 15 आणि iPhone 15 प्लस भारतात लॉन्च; किती असणार किंमत?

आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लसमध्ये A16 Bionic चिपसेटचा सपोर्ट मिळणार आहे.

iphone 15 and 15 plus launch check price in india
खरेदीदार आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस पाच रंगांमध्ये खरेदी करू शकणार आहेत. (Image Credit-Apple)

काल कंपनीचा Wonderlust इव्हेंट पार पडला. यावेळी इव्हेंटची सुरूवात कंपनीचे सीईओ टीम कूक यांनी केली. त्यामध्ये Apple ने आपली बहुप्रतीक्षित अशी आयफोन १५ सिरीज भारत आणि जागतिक स्तरावर लॉन्च केली आहे. नवीन डिव्हाइसचे प्री बुकिंग हे १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर याची विक्री २२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तसेच कंपनीने आयफोन १५ सिरीजसह वॉच सिरीज ९ देखील लॉन्च केली आहे. कंपनीने भारतात दिल्ली आणि मुंबईमध्ये आपली अधिकृत रिटेल स्टोअर्स सुरू केली आहेत. त्यानंतर हा पहिलाच आयफोन लॉन्च असणार आहे.

आयफोन १५ चे फीचर्स

आयफोन १५ ला मागच्या वर्षीच्या तुलनेत काही मोठे अपडेट मिळाले आहेत. फ्रंट कॅमेरा आणि फेस आयडीसाठी नवीन डायनॅमिक आयलंड कट-आउटचा समावेश आयफोन १५ मध्ये करण्यात आला आहे. हे फिचर गेल्या वर्षीच्या प्रो मॉडेल्समधून घेतले गेले आहे. कंपनीने आयफोन १५ मध्ये मागील वर्षीच्या प्रो मॉडेल्समध्ये असणाऱ्या चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस या मॉडेलमध्ये A16 Bionic चिप देण्यात आली आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास या मॉडेल्समध्ये कंपनीने ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. जो आयफोन १४ व १४ प्लस पेक्षा चारपट जास्त आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

Google Pixel 8 series listed on Flipkart
VIDEO: ४ ऑक्टोबरला लॉन्च होणार गुगल Pixel 8 सिरीज; ५० मेगापिक्सलसह मिळणार…, एकदा पाहाच
Itel S23+ launch wiht 5,000 mAh battery
VIDEO: Itel ने भारतात लॉन्च केला ५० मेगापिक्सलचा AI कॅमेरा असणारा ‘हा’ स्मार्टफोन; किंमत फक्त…
iphone 15 series india price comparsion to usa dubai and china
अमेरिका, दुबई, जपानपेक्षा iPhone 15 Series भारतात स्वस्त आहे की महाग? जाणून घ्या किंमत
reliance jio 2545 and 2999 rs prepaid recharge plans benifits
वर्षभराचा रिचार्ज प्लॅन करायचा आहे? मग Reliance Jio ‘हे’ दोन प्लॅन्स वापरूनच पाहा, मिळतात ‘हे’ फायदे

हेही वाचा : खुशखबर! बहुप्रतीक्षित iPhone 15 सिरीज आणि Watch 9 अखेर लॉन्च; टाइप-सी पोर्टसह मिळणार ‘हे’ फीचर्स

आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस : भारतातील किंमत

आयफोन १५ ची भारतातील किंमत ७९,९०० रुपयांपासून सुरू होते. ही किंमत १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची आहे. तर आयफोन १५ प्लसच्या १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ८९,९०० रुपयांपासून सुरू होते. हे दोन्ही फोन्स खरेदीदार निळा, गुलाबी, पिवळा, हिरवा आणि काळ्या रंगांमध्ये खरेदी करू शकणार आहेत.

१२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या आयफोन १५ ची किंमत ७९,९०० रुपये, २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत ८९,९०० रुपये तर ५१२ जीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत १,०९,९०० रुपयांपासून सुरू होते. तर आयफोन १५ प्लसच्या १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत ८९,९०० रुपये, २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत ९९,९०० रुपये आणि ५१२ जीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत १,१९,९०० रुपयांपासून सुरू होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Apple iphone 15 and 15 plus price in india started at 79900 rs buy to five colours check details tmb 01

First published on: 13-09-2023 at 11:45 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×