Apple iPhone वापरणाऱ्या सर्व युजर्ससाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण आता वॉरंटी नसलेल्या आयफोनची बॅटरी बदलणे आता महाग होणार आहे. Cupertino-based आधारित कंपनी आयफोन १४ सिरीज वगळता सर्व आयफोनच्या मॉडेल्ससाठी वॉरंटी नसलेल्या फोनच्या बॅटरी बदलणे महाग होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्यस्थितीमध्ये आऊट ऑफ वॉरंटी सर्व्हिस फी फेब्रुवारी २०२३ च्या अखेरपर्यंत लागून होणार आहे. १ मार्च २०२३ पासून आधीच्या सर्व आयफोन मॉडेल्ससाठी बॅटरी बदलणे महाग होणार आहे. सर्व मॉडेल्ससाठी $२०म्हणजे (अंदाजे ₹१६५४) इतकी वाढू शकते. माहितीनुसार, Apple सध्या बहुतांश iPhone मॉडेल्सवर बॅटरी बदलण्यासाठी US मध्ये $६९ आणि भारतात सुमारे रु. ७,००० आकारते. यामध्ये १ मार्चपासून $२० ने वाढवले जाईल असे Apple चे म्हणणे आहे. प्रत्येक iPhone त्याच्या मर्यादित वॉरंटीमध्ये १ वर्षाचे हार्डवेअर दुरुस्ती आणि कव्हरेजसह ९० दिवस फ्री टेक्निकल सपोर्ट देतो. iPhone साठी AppleCare+ तुमचे कव्हरेज तुमच्या AppleCare+ खरेदीच्या तारखेपासून २ वर्षांपर्यंत वाढवते.

हेही वाचा : Consumer Electronic Show 2023: सर्वात मोठ्या टेक इव्हेन्टमध्ये सॅमसंग करणार ‘हे’ चार नवीन मॉनिटर्स लाँच

या किमतीतील वाढ फक्त AppleCare किंवा ‍AppleCare+ योजना नसलेल्या लोकांसाठी लागू होईल. जे या योजनेचे लाभार्थी आहेत. त्यांना अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाही MacRumours च्या रिपोर्टनुसार , Apple मॅक आणि ‘iPad’ साठी आउट-ऑफ-वॉरंटी बॅटरी बदलण्याची किंमत देखील वाढवणार आहे. त्या रिपोर्टनुसार MacBook Air ची बॅटरी रिप्लेसमेंट $३० ने वाढेल आणि MacBook Pro बॅटरीच्या किमती $५० ने वाढतील. त्याचप्रमाणे, नवीन iPad मॉडेल्सची किंमत $२० ने वाढेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Apple iphone battery prices will increase from march one tmb 01
First published on: 03-01-2023 at 13:28 IST