scorecardresearch

Apple ने सर्वात शक्तिशाली iPad Air केलं लाँच, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

अ‍ॅपल iPad Air चं नुकतंच अनावरण करण्यात आलं आहे. अ‍ॅपलचं प्रोडक्ट म्हटलं की या गॅजेटबाबत कमालीची उत्सुकता असते.

iPad_Airpad
Apple ने सर्वात शक्तिशाली iPad Air केलं लाँच, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या (Photo- Apple.Com)

अ‍ॅपल iPad Air चं नुकतंच अनावरण करण्यात आलं आहे. अ‍ॅपलचं प्रोडक्ट म्हटलं की या गॅजेटबाबत कमालीची उत्सुकता असते. या आयपॅडमध्ये सेंटर स्टेजसह नवीन अल्ट्रा वाइड फ्रंट कॅमेरा, 2x पर्यंत वेगवान ट्रान्सफर स्पीडसह USB-C पोर्ट दिला आहे. नवीन iPad Air शुक्रवार म्हणजेच ११ मार्चपासून ऑर्डर करता येणार आहे. तसेच १८ मार्चपासून स्टोअरमध्ये उपलब्ध असेल. या मॉडेलच्या किंमतीबाबत म्हणायचं तर, iPad Air चे वाय-फाय मॉडेल ५४,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह उपलब्ध आहेत. तर वाय-फाय + सेल्युलर मॉडेल ६८,९०० रुपयांपासून सुरू होतात. नवीन iPad Air ६४ जीबी आणि २५६ जीबी या दोन स्टोरेजसह उपलब्ध आहेत. स्पेस ग्रे, स्टारलाइट, गुलाबी, जांभळा आणि निळ्या रंगात आयपॉड मिळतील. आयपॅड एअरमध्ये ८-कोर सीपीयू आहे जो ६० टक्क्यांपर्यंत वेगवान परफॉर्मन्स देतो. तर ८-कोर जीपीयू मागील आयपॅड एअरच्या तुलनेत 2x पर्यंत वेगवान ग्राफिक्स परफॉर्मन्स आहे. सेंट्रल स्टेजसह अल्ट्रा-वाइड १२ एमपी फ्रंट कॅमेरा असून युजर्स फिरत असताना स्वयंचलितपणे पॅन होतो. याचबरोबत जेव्हा इतर लोक सामील होतात, तेव्हा कॅमेरा त्यांना देखील शोधतो. त्यांना संभाषणात समाविष्ट करण्यासाठी सहजतेने झूम आउट करतो. iPad Air च्या मागील बाजूस असलेला १२ एमपी वाइड कॅमेरा फोटो, 4K व्हिडिओ कॅप्चर आणि डॉक्युमेंट्स स्कॅन सक्षम आहे.

अ‍ॅपलचा दावा आहे की, मागच्या प्रोडक्टच्या तुलनेत यातील यूएसबी-सी पोर्ट 2x पर्यंत वेगवान आहे. 10Gbps पर्यंत डेटा ट्रान्सफरसह, त्यामुळे मोठे फोटो आणि व्हिडीओ इम्पोर्ट करणे सहज शक्य आहे. iPad Air मध्ये १०.९ -इंच लिक्विड रेटिना डिस्प्ले, ३.८ दशलक्ष पिक्सेल, ५०० निट्स ब्राइटनेस, पूर्ण लॅमिनेशन, एक P3 वाइड कलर गॅमट, ट्रू टोन आणि अँटी-रिफ्लेक्टीव्ह स्क्रीन कोटिंग आहे.आवाजाच्या बाबतीतही युजर्सना चांगला अनुभव मिळेल. नवीन आयपॅड एअर मॅजिक कीबोर्डशी सुसंगत आहे. त्याच्या फ्लोटिंग डिझाइन आणि अंगभूत ट्रॅकपॅडसह टायपिंग करण्यास सुलभ आहे.

आयपॅड एअरसोबत असलेल्या इतर वस्तूंच्या किंमतींचा विचार केला तर, स्मार्ट कीबोर्ड फोलिओ १४,३१० रुपयांना उपलब्ध आहे. अॅपल पेन्सिल स्वतंत्रपणे खरेदीसाठी उपलब्ध असून १०,९०० रुपयांना मिळेल. मॅजिक कीबोर्ड नवीन आयपॅडसाठी २७,९०० रुपयांना कृष्णधवल रंगात उपलब्ध असून ३० पेक्षा जास्त भाषांसाठी लेआउटसह तयार करण्यात आला आहे. नवीन iPad Air साठी स्मार्ट कीबोर्ड फोलिओ १५,९००, स्मार्ट फोलिओ ७५०० रुपयात काळा, पांढरा, इलेक्ट्रिक ऑरेंज, गडद चेरी, इंग्लिश लॅव्हेंडर आणि मरीन ब्लू या रंगात उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Apple launch powerful ipad air know price and feature rmt

ताज्या बातम्या