scorecardresearch

Premium

आता जगभरात भारताचा डंका; iPhone 15 सिरीजच्या ‘या’ मॉडेल्समध्ये ISRO चे GPS; जाणून घ्या…

NavIC हे एक स्वतंत्र स्टॅन्ड अलोन नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम आहे.

NavIC isro system use in iphone pro and pro max model
Apple ने त्यांच्या कोणत्याही आयफोन मॉडेलला NavIC सपोर्ट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. (Image Credit-Apple/@isro/twitter)

Apple कंपनीने १२ सप्टेंबर रोजी आपली आयफोन १५ सिरीज लॉन्च केली आहे. Wonderlust हा कंपनीचा इव्हेंट कॅलिफोर्निया पार पडला. आयफोन १५ सिरीजमध्ये आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. या इव्हेंटदरम्यान आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स हँडसेट भारताच्या GPS च्या NavIC (नेव्हिगेशन विथ इंडियन कॉन्स्टेलेशन) ला सपोर्ट करतील असे कंपनीने सांगितले. Apple कंपनीने त्यांच्या कोणत्याही आयफोन मॉडेलला NavIC सपोर्ट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस हे मॉडेल्स NavIC ला सपोर्ट करत नाहीत हे लक्षात घेणे आवश्यक आहे.भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) द्वारा संचालित NavIC हे आयफोन १५ मध्ये Galileo आणि GLONASS च्या इतर GPS सिस्टीमसह हँडसेटमध्ये उपलब्ध असणार आहे.

काय आहे NavIC?

NavIC हे एक स्वतंत्र स्टॅन्ड अलोन नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम आहे जी २००६ मध्ये मंजूर करण्यात आली होती आणि २०११ च्या अखेरपर्यंत सिस्टीम पूर्ण होण्याची शक्यता होती. तथापि NavIC सिस्टीम २०१८ मध्ये कार्यान्वित झाली. ISRO नुसार, ही प्रादेशिक नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम मुळात भारताची स्थिती, नेव्हिगेशनसाठी स्थापन करण्यात आली होती. याआधी NavIC ला IRNSS (इंडियन रीजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम) म्हणूनही ओळखले जात असे. याबाबतचे वृत्त ndtv ने दिले आहे.

Lava Blaze Pro 5G launch india with 50 mp camera
Lava ने भारतात लॉन्च केला ‘हा’ स्वस्त फोन; ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि मिळणार…
Itel S23+ launch wiht 5,000 mAh battery
VIDEO: Itel ने भारतात लॉन्च केला ५० मेगापिक्सलचा AI कॅमेरा असणारा ‘हा’ स्मार्टफोन; किंमत फक्त…
bsnl offer 299 rs plan with daily 3 gb deta
रिलायन्स जिओ, एअरटेलपेक्षा BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळतो दररोज ३ जीबी डेटा, जाणून घ्या
honor 90 5g launch with 200 mp camera
फोटोग्राफर्ससाठी खुशखबर! २०० मेगापिक्सलच्या जबरदस्त कॅमेऱ्यासह Honor चा ‘हा’ स्मार्टफोन भारतात लॉन्च

हेही वाचा : भारतात आजपासून iPhone 15 Series चे प्री बुकिंग सुरू; फोन कसा खरेदी करायचा? जाणून घ्या

NavIC कसे काम करते ?

NavIC सात सॅटेलाइट आणि ग्राउंड स्टेशनच्या नेट्वर्कसह डिझाईन करण्यात आले आहे. याचा वापर सध्या मर्यादित आहे. सध्या हे फक्त देशामध्ये सार्वजनिक वाहनांच्या ट्रेकिंगसाठी वापरले जात आहे. याशिवाय, अधिकाऱ्यांनी या सिस्टीमचा वापर खोल समुद्रात जाणाऱ्या मच्छिमारांना आपत्कालीन इशारा किंवा चेतावणी देण्यासाठी केला आहे. जिथे नेटवर्क कनेक्टिव्हीटी नसते तिथे माहिती देण्यासाठी आणि नैसर्गिक आपत्तींचा मागोवा घेण्यासाठी देखील NavIC चा वापर केला जातो. ISRO ने माहिती दिली की ७ सॅटेलाइट आणि ग्राउंड स्टेशन्स २४/७ कार्यरत असतात. यापैकी काही सॅटेलाइट भूस्थिर कक्षेत” ठेवण्यात आले आहेत.

”ग्राउंड नेटवर्कमध्ये एक नियंत्रण केंद्र, अचूक वेळ साधणारी सुविधा, नेटवर्क आणि अखंडपणे निरीक्षण करणारी स्टेशन्स आणि टू-वे रेजिंग स्टेशन्सचा समावेश आहे” असे इस्रो म्हणाले. NavIC सिस्टीम SPC (स्टँडर्ड पोझिशन सर्व्हिस) नागरी वापरकर्त्यांसाठी आणि RS (प्रतिबंधित सेवा) धोरणात्मक वापरकर्त्यांसाठी आहे. याच्या कव्हरेजमध्ये देश आणि देशाच्या सीमेपलीकडे १,५०० किमीपर्यंतचा प्रदेश समाविष्ट आहे.

हेही वाचा : Vodafone-Idea चे ‘हे’ आहेत ३० दिवसांची वैधता असणारे प्लॅन्स; ओटीटीसह युजर्सना मिळणार…

इस्रोने सांगितले , ”NavIC सिग्नल्स वापरकर्त्यांना २० मीटरपेक्षा चांगली जागेची अचूकता आणि ५० ns पेक्षा चांगली वेळेची अचूकता प्रदान करते. NavIC एसपीएस सिग्नल हे जीपीएस GLONASS, Galileo आणि BeiDou या इतर जागतिक नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) सिग्नलसह इंटरऑपरेबल आहेत.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Apple use isro gps navic navigation system use an iphone 15 pro and 15 pro max tmb 01

First published on: 15-09-2023 at 15:57 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×