वोडाफोन आयडिया ही देशातील सर्वात मोठी तिसऱ्या क्रमांकांची कंपनी आहे. व्हीआय कंपनीला भारतात अजून आपले ५ जी नेटवर्क सुरु करता आलेले नाही. मात्र ते लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. कंपनी आपल्या करत असते. ज्यात त्यांना मिळतात. कंपनीकडे असे अनेक प्लॅन्स आहेत ज्याची वैधता ३० दिवसांची आहे. तर कंपनीकडे ३६८,३६९ आणि २९६ रुपयांचे तीन प्लॅन्स आहेत. या प्लॅन्सबद्दल जाणून घेऊयात.
वोडाफोन आयडियाचे ३० दिवसांची वैधता असणारे प्लॅन्स
व्हीआयचा २९६ रुपयांचा प्लॅन : वोडाफोन आयडियाच्या ३० दिवसांच्या प्लॅन्समध्ये २९६ रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला २५ जीबी डेटा वापरण्यासाठी मिळतो. तसेच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस करणे असे अनेक फायदे मिळतात. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना व्हीआय मुव्हीज आणि टीव्ही क्लासिक मोफत मिळते. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.
व्हीआयचा ३६८ रुपयांचा प्लॅन : व्हीआयच्या ३६८ रुपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोजचा २ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस करण्याचे फायदे मिळतात. तसेच SunNXT टीव्ही प्लस मोबाइल, व्हीआय मुव्हीज आणि टीव्ही व्हीआयपी या ओटीटी प्लॅटफॉर्मचा समावेश आहे.
व्हीआयचा ३६९ रुपयांचा प्लॅन : वोडाफोन आयडियाचा ३६९ रुपयांचा प्लॅन ३६८ रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये एकमेव फरक आहे तो म्हणजे ओटीटी प्लॅटफोरमचे मिळणारे फायदे. या प्लॅनमध्ये सर्व वापरकर्त्यांना अबनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि दररोज २ जीबी डेटा वापरायला मिळतो. या प्लॅनमध्ये ३० दिवसांसाठी सोनी लिव्ह मोबाइलचे फायदे मिळतात. व्हीआय हिरो अनलिमिटेडसह व्हीआय मुव्हीज आणि टीव्ही व्हीआयपीचे फायदे देखील या प्लॅनमध्ये मिळतात.