Apple WWDC 2022: वर्ल्डवाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्स २०२२ इव्हेंट आजपासून सुरू होणार आहे आणि हा कार्यक्रम सर्व विकसकांसाठी विनामूल्य आयोजित केला जाईल. कंपनी या इव्हेंटमध्ये macOS आणि WatchOS व्यतिरिक्त नवीनतम iPadOS, iOS, tvOS ची घोषणा करू शकते. जर तुम्हाला हा इव्हेंट घरी बसून पाहायचा असेल तर तुम्ही इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीमिंग कसे पाहू शकाल आणि या इव्हेंटवर कोणत्या गोष्टींचे लक्ष आहे, तसेच याविषयी माहिती घ्या.

असे पाहा इव्हेंट स्ट्रीमिंग

हा इव्हेंट भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता सुरू होईल. जर तुम्हाला घरी बसून इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीमिंग पहायचे असेल, तर सर्वात चांगली गोष्ट म्हणजे इव्हेंट पाहण्यासाठी तुम्हाला साइन-अप करण्याची गरज नाही आणि तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. तुमच्याकडे अॅप्पल डिव्हाइस असल्यास, उदाहरणार्थ iPhone, MacBook किंवा iPad, तुम्ही Safari वर जाऊन अॅप्पलच्या अधिकृत साइटला भेट देऊन कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकता. त्याच वेळी, जे डेव्हलपर आहेत ते अॅपल डेव्हलपर वेबसाइटद्वारे इव्हेंटचे स्ट्रीमिंग पाहण्यास सक्षम असतील.

‘या’ गोष्टींकडे असेल सर्वांचे लक्ष

अॅप्पल वर्ल्डवाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्स २०२२ इव्हेंटचा फोकस सॉफ्टवेअर अपडेट्सवर असेल आणि कंपनी tvOS 16 सोबत iPhone साठी iOS 16, iPad साठी iPadOS 16, Watch साठी watchOS 9, Mac साठी macOS 13 लाँच करू शकते. बीटा आवृत्ती विकसकासाठी उपलब्ध करून दिली जाईल आणि नंतर तीइतर लोकांसाठी उपलब्ध केली जाईल. एवढेच नाही तर कंपनी या कार्यक्रमादरम्यान M2 चिपसेटने सुसज्ज असलेला आपला नवीन MacBook Air लाँच करू शकते.