Apple ही दिग्गज टेक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्रॉडक्ट्स कंपनी लॉन्च करत असते. Apple ने त्यांची वर्ल्ड वाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) २०२३ ची घोषणा केली आहे. हा Apple चा वार्षिक इव्हेंट आहे. या इव्हेंट अगोदर WWDC23 Swift स्टुडंट चॅलेंजच्या विजेत्यांची घोषणा झाली आहे. अस्मी जैन या चॅलेंजची विजेती ठरली आहे. जी मध्येप्रदेशची रहिवासी आहे.

मध्यप्रदेशच्या इंदूरची रहिवाशी असलेली २० वर्षीय अस्मी जैन ही मेडी-कॅप्स विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. Apple WWDC23 स्विफ्ट स्टुडंट चॅलेंजमध्ये स्विफ्ट कोड भाषेचा वापर करुन ओरिजिनल Apps तयार करायचे असतात.या चॅलेंजमध्ये ३० देशांमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. याअंतर्गत आरोग्यसेवा,स्पोर्ट्स, मनोरंजन आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित अ‍ॅप डेव्हलप करायचे होते. याबाबतचे वृत्त zeenews.india ने दिले आहे.

Mr. Gay Nepal 2024
‘मिस्टर गे नेपाळ २०२४’ चा किताब लक्ष्मण मगर यांनी जिंकला; आता लंडनमध्ये करणार प्रतिनिधित्व
Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
pv sindhu
सिंधूची उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेतून माघार; थॉमस चषकासाठी भारताचा मजबूत संघ
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार

हेही वाचा : ChatGpt च्या माध्यमातून इंजिनिअरिंगच्या पेपरमध्ये केली कॉपी ,कमवले १ कोटींहून अधिक रुपये; नेमकं काय केलं?

अ‍ॅपलचे वर्ल्डवाईड डेव्हलपर रिलेशनचे उपाध्यक्ष सुसान प्रेस्कॉट यांनी विजेत्यांची घोषणा करताना सांगितले, ”आम्ही आमच्या स्विफ्ट स्टुडंट चॅलेंजमध्ये प्रवेश करणाऱ्या तरुण डेव्हलपर्सकडे असणारी प्रतिभा पाहून आम्ही थक्क झालो आहोत. या वर्षातील सबमिशनने केवळ पुढील पिढीच्या उपकरणांची निर्मिती करण्याची वचनबद्धता दर्शवली नाही. मात्र त्यांनी नवीन टेक्नॉलॉजी आणि डिव्हाईस स्वीकारण्याची आणि त्यांना मूळ आणि रचनात्मक पद्धतीने तयार करण्याची इच्छा देखील दर्शवली.”

App तयार करण्याची आयडिया कुठून मिळाली ?

इंदूरच्या मेडी-कॅप्स विद्यापीठामध्ये शिकत असलेल्या अस्मी जैन हिच्या एका मित्राच्या काकांवर मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांना डोळ्यांमध्ये काहीतरी त्रास झाला आणि त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. अस्मी जैनच्या मित्राच्या काकांना डोळ्यांची हालचाल करता येत नव्हती. हे पाहून अस्मीने एक असे अ‍ॅप तयार केले जे वापरकर्त्याच्या डोळ्यांची झालेली हालचाल ट्रॅक करू शकेल. या अ‍ॅपच्या मदतीने लोक व्यायामही करू शकतात. हे अ‍ॅप त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे ज्यांना डोळ्यांचा गंभीर आजार आहे. लोकांना त्यांच्या चेहऱ्याचा व्यायाम करण्यास मदत करेल असे एक अ‍ॅप तयार करण्याचे अस्मीचे पुढील ध्येय आहे.

५ जूनपासून सुरु होणार अ‍ॅपलचा WWDC इव्हेंट

अ‍ॅपलचा हा इव्हेंट अगदी थोड्याच दिवसांवर येऊन ठेपला आहे. कंपनीने याची एक लाईनअप शेअर केली आहे. ५ जून रोजी कंपनीचे सीईओ टीम कुक आणि मुख्य अधिकाऱ्यांच्या भाषणाने इव्हेंटची सुरुवात होणार आहे. मुख्य भाषण हे थेट प्रसारित केले जाणार आहे.  Apple चा इव्हेंट WWDC २०२३ ५ जून २०२३ ते ९ जून २०२३ या कालावधीत होणार आहे. Apple WWDC 2023 कीनोट इव्हेंट ५ जून रोजी रात्री १०.३० IST वाजता लाईव्ह प्रसारित होणार आहे. हा इव्हेंट तुम्ही Apple TV, Apple YouTube पेज आणि Apple इव्हेंट्स पेजवर पाहू शकणार आहात.