एका अहवालानुसार, असं समोर आलंय की, मेटा-मालकीचे इन्स्टाग्राम आपल्या वापरकर्त्यांच्या एक्टिविटी , मजकूर निवड, मजकूर इनपुट आणि पासवर्ड माहिती ट्रॅक करू शकते. फेलिक्स क्रॉसने केलेल्या विश्लेषणात असे आढळून आले की आयओएस वरील इन्स्टाग्राम आणि फेसबूक दोन्ही थर्ड पार्टी अॅप्ससाठी ॲप्पल द्वारे ऑफर केलेल्या ब्राउजर ऐवजी त्यांचे स्वतःचे अॅप-मधील ब्राउझर वापरतात. फेलिक्स क्रॉसच्या मते, त्यांच्या कस्टम बिल्ट ब्राउझरमधून, इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या सर्व लिंक्स आणि वेबसाइट्समध्ये Meta Pixel नावाचा ट्रॅकिंग JavaScript कोड इंजेक्ट करतात. हा कोड मेटाला वापरकर्त्यांच्या संमतीशिवाय त्यांचे संभाषण ट्रैक करण्याची परवानगी देतो. हे इन्स्टाग्रामला वापरकर्त्यांच्या किंवा वेबसाइट प्रदात्याच्या संमतीशिवाय बाह्य वेबसाइटवर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे परीक्षण करण्याची अनुमती देते.

आपल्या ब्राउझरचा करतात वापर

तसंच, MacRumors यांच्या अहवालानुसार बहुतेक अॅप्स वेबसाइट लोड करण्यासाठी ॲपलच्या Safari ब्राउझरचा वापर करतात, परंतु इन्स्टाग्राम आणि फेसबुक त्यांचे स्वतःचे इन-अॅप ब्राउझर वापरून वेबसाइट लोड करतात. तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा तुम्ही वेबसाइट लिंकवर टॅप करता, लिंक स्वाइप करता किंवा इन्स्टाग्रामवर जाहिरातींद्वारे काहीही खरेदी करण्यासाठी लिंक टॅप करता तेव्हा ते डीफॉल्ट ब्राउझर गुगल क्रोम किंवा सफारी मध्ये उघडते.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच
Why stress test of mutual fund is important
तुमच्या म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट काय सांगते? म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट महत्त्वाची का?

( हे ही वाचा: ३ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय iPhone 13! लवकरच घरी आणा तुमच्या स्वप्नातला फोन)

सर्व वेबसाइट्सवर इंजेक्ट केले जातात कोड

इन्स्टाग्राम अॅप सर्व वेबसाइट्समध्ये त्याचा ट्रॅकिंग कोड इंजेक्ट करते, जे फोटो शेअरिंग साइटला वापरकर्त्यांनी जाहिरातींवर क्लिक केल्यावर सर्व परस्पर संवादांचे निरीक्षण करण्यास अनुमती देते. यामध्ये पासवर्ड, पत्ता, प्रत्येक टॅप, मजकूर निवड आणि स्क्रीनशॉट यासारखे सर्व फॉर्म इनपुट समाविष्ट आहेत.

मेटाने दिले यासंदर्भात स्पष्टीकरण

मेटा म्हणते की ‘मेटा पिक्सेल’ हे तुमच्या वेबसाइटवरील विजिटर एक्टिविटी ट्रॅक करण्यासाठी तयार केले गेले आहे. जे त्याच्या कस्टम-बिल्ट ब्राउझरवर वापरकर्त्यांच्या सर्व क्रियाकलापांवर लक्ष ठेवते. कंपनीचं म्हणणं असं आहे की, असा कोणताही पुरावा नाही आहे की, मेटाने यूजर्सचा डेटा क्लेक्ट केला आहे. किंवा ते वापरकर्त्यांचा डेटा संकलित करण्यास सक्षम आहेत.