अ‍ॅपल आयफोन १४ सिरीजच्या लाँचनंतर आयफोन १३ आणि १२ च्या किंमतींमध्ये घट झाली आहे. तसेच फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन सेलवरही किंमतींमध्ये मोठी सूट देण्यात आली. त्यामुळे आयफोन बाळगण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठी ही सुवर्णसंधीच ठरली. फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलमध्ये आयफोन १३ हा ५५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये विक्रीला निघाला होता. मात्र आता हा सेल संपला आहे. पण तरीही ग्राहकांसाठी हा फोन घेण्याची संधी आहे.

फ्लिपकार्टच्या दसरा सेलमध्ये आयफोन १३ हा फोन ५९ हजार ९९० रुपयांना मिळत आहे. संकेतस्थळावर त्याची लिस्टेड किंमत ६९ हजार ९०० रुपये आहे. फोनवर ९ हजार ९१० रुपयांची सूट देण्यात आली आहे. तसेच, फ्लिपकार्टने ऑफर देखील दिल्या आहेत. याने अजून मोठ्या बचतीसह हा फोन तुम्हाला मिळू शकतो.

(‘या’ सेलमध्ये कमी किंमतीत iphone 14 घेण्याची संधी, जाणून घ्या ऑफर)

ही आहे ऑफर

एचडीएफसीच्या डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डने ५ हजार रुपयांवरील ट्रान्झॅक्शन केल्यास तुम्हाला ५०० रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळणार आहे. तसेच, एचडीएफसीच्या डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डने ५ हजार रुपयांवरील नॉन ईएमआय ट्रान्झॅक्शन केल्यास तुम्हाला १ हजार रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. यासह इतरही ऑफर्स देण्यात आले आहेत.

एक्सचेंज ऑफरमध्ये मोठी सूट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक्स्चेंज ऑफरमध्ये फोनवर मोठी सूट मिळत आहे. या ऑफरमध्ये फोनवर १६ हजार ९०० रुपयांपर्यंतची सूट आहे. मिळणारी सूट ही फोनचा मॉडेल आणि काही अटींवर अवलंबून असणार आहे. दरम्यान आयफोन १३ च्या फीचरबाबत बोलायचे झाले तर फोनमध्ये १२८ जीबीची स्टोरेज आहे. तसेच फोनच्या मागील बाजूस १२ मेगापिक्सेलचे २ कॅमेरे असून सेल्फीसाठी देखील फोनच्या पुढील भागात १२ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये वेगाने कार्य होण्यासाठी ए १५ बायोनिक चीप प्रोसेसर देण्यात आला आहे.